डिसेंबर १३
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
डिसेंबर १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४७ वा किंवा लीप वर्षात ३४८ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
ठळक घटना आणि घडामोडी [संपादन]
सोळावे शतक [संपादन]
- १५४५ - ट्रेंटची समिती सुरू.
- १५७७ - सर फ्रांसिस ड्रेक पृथ्वी प्रदक्षिणेला प्लिमथ, इंग्लंड येथून निघाला.
सतरावे शतक [संपादन]
- १६४२ - एबेल जान्स्झून तास्मान न्यू झीलँडला पोचला.
एकोणिसावे शतक [संपादन]
- १८६२ - अमेरिकन यादवी युद्ध - फ्रेडरिक्सबर्गच्या लढाईत कॉन्फेडरेट जनरल रॉबर्ट ई. लीने युनियन जनरल ऍम्ब्रोस ई. बर्नसाइडला हरविले.
विसावे शतक [संपादन]
- १९३७ - दुसरे चीनी-जपानी युद्ध-नानजिंगची लढाई - जपानी सैन्याने नानजिंग काबीज केले.
- १९३८ - ज्यूंचे शिरकाण - साख्सेनहौसेनहून आणलेल्या १०० कैद्यांनी हांबुर्गजवळील नॉएनगॅम कॉन्सेन्ट्रेशन कॅम्प बांधला.
- १९३९ - दुसरे महायुद्ध-रिव्हर प्लेटची लढाई - ब्रिटीश नौदलाच्या क्रुझर एच.एम.एस. एक्झेटर, एच.एम.एस. अजॅक्स व एच.एम.एन.झेड.एस. अकिलिसशी दिलेल्या झुंजीत पराभव अटळ दिसत असता जर्मनीच्या कॅप्टन हान्स लँग्सडॉर्फने आपली पॉकेट बॅटलशिप अॅडमिरल ग्राफ स्पी बुडविली.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - हंगेरी व रोमेनियाने अमेरिकेविरूद्ध युद्ध पुकारले.
- १९७४ - माल्टा गणतंत्र झाले.
- १९७७ - अमेरिकन सरकारचे डी.सी.३ जातीचे विमान एव्हान्सव्हिल प्रादेशिक विमानतळाजवळ कोसळले. २९ ठार. मृतांमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ एव्हान्सव्हिलचा बास्केटबॉल संघ.
- १९८१ - पोलंडमध्ये जनरल वॉयसियेक यारूझेल्स्कीने लश्करी कायदा (मार्शल लॉ) लागू केला.
- १९९६ - कोफी अन्नान संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीसपदी.
- २००० - आदल्या दिवशी अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या बुश वि. गोर खटल्याच्या निकालानंतर अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणूकीत ऍल गोरनी हार मान्य केली.
एकविसावे शतक [संपादन]
- २००१ - पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाचही अतिरेकी व सुरक्षा कर्मचार्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.
- २००२ - ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
- २००२ - सायप्रस, चेक प्रजासत्ताक, एस्टोनिया, हंगेरी, लात्व्हिया,
लिथुएनिया, माल्टा, पोलंड, स्लोव्हेकिया व स्लोव्हेनिया या देशांना युरोपीय संघात मे १, २००५ ला प्रवेश देण्याचा ठराव मंजूर.
- २००३ - इराकी अध्यक्ष सद्दाम हुसेनला तिक्रीतजवळ पकडले.
- २००३ - प्रसिद्ध बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांना ऑफिसर ऑफ आर्टस ऍन्ड लिटरेचर हा फ्रान्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी किताब जाहीर.
जन्म [संपादन]
- १५२१ - पोप सिक्स्टस पाचवा.
- १५३३ - एरिक चौदावा, स्वीडनचा राजा.
- १५५३ - चौथा हेन्री, फ्रान्सचा राजा.
- १५८५ - हॉथोर्न्डेनचा विल्यम ड्रमोंड, स्कॉटिश कवी.
- १६७८ - यॉंग्झेंग, चीनी सम्राट.
- १८१६ - वेर्नर बॉन सीमेन्स, सीमेन्स उद्योग समूहाचा पाया घालणार्या सीमेन्सचा जन्म
- १८१८ - मेरी टॉड लिंकन, अब्राहम लिंकनची पत्नी.
- १८५४ - थॉमस वॉट्सन, अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलचा मदतनीस.
- १९१३ - आर्ची मूर, मुष्टियोद्धा
- १९२४ - विद्याधर पुंडलिक, साहित्यिक
- १९२८ - सरिता पदकी, बालवाङ्मय लेखिका
मृत्यू [संपादन]
- १०४८ - अल बिरूनी, ईराणी गणितज्ञ.
- ११२४ - पोप कॅलिक्स्टस दुसरा.
- १२०४ - फ्रेडरिक दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १९८६ - स्मिता पाटील, हिंदी चित्रपट अभिनेत्री
- १९९४ - विश्वनाथ अण्णा ऊर्फ तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक.
- १९९६ - श्रीधर पुरुषोत्तम लिमये ऊर्फ शिरुभाऊ, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक.
- २००५ - रामानंद सागर, हिंदी चित्रपट निर्माता, निर्देशक.
प्रतिवार्षिक पालन [संपादन]
- माल्टा - प्रजासत्ताक दिन
बाह्य दुवे [संपादन]
- बीबीसी न्यूजवर डिसेंबर १३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर ११ - डिसेंबर १२ - डिसेंबर १३ - डिसेंबर १४ - डिसेंबर १५- (डिसेंबर महिना)