मार्च ९
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| << | मार्च २०१३ | >> | ||||
| सो | मं | बु | गु | शु | श | र |
| १ | २ | ३ | ४ | |||
| ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
| १२ | १३ | १४ | १ | १६ | १७ | १८ |
| १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
| २६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ | |
मार्च ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६८ वा किंवा लीप वर्षात ६९ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
ठळक घटना[संपादन]
सहावे शतक[संपादन]
- ५९० - बहराम सहावा पर्शियाच्या राजेपदी.
एकोणिसावे शतक[संपादन]
- १८४७ - मेक्सिकन-अमेरिकन युद्ध - अमेरिकेने मेक्सिकोच्या व्हेरा क्रुझ शहरावर चढाई केली.
विसावे शतक[संपादन]
- १९३५ - अॅडॉल्फ हिटलरने जर्मन वायुदल लुफ्तवाफेची स्थापना केल्याचे जाहीर केले.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या बी.२९ बॉम्बफेकी विमानांनी जपानची राजधानी टोक्योवर तुफान बॉम्बहल्ले केले. १,००,०००पेक्षा अधिक मृत्युमुखी.
- १९५७ - अलास्काच्या अँड्रियानोफ द्वीपसमूहाजवळ समुद्रात रिश्टर मापनपद्धतीनुसार ९.१ तीव्रतेचा भूकंप झाला त्यामुळे ५० फूटी त्सुनामी तयार झाले.
- १९५९ - बार्बी या बाहुलीच्या विक्रीस सुरुवात.
- १९६७ - जोसेफ स्टालिनची मुलगी स्वेतलाना अलिलुयेवाने अमेरिकेला पळ काढला.
- १९७६ - इटलीच्या कॅव्हालीझ स्की रिसॉर्टवर केबलकारला अपघात. ४२ ठार.
एकविसावे शतक[संपादन]
जन्म[संपादन]
- १२८५ - गो-निजो जपानी सम्राट.
- १६२९ - अलेक्सिस पहिला, रशियाचा झार.
- १८८७ - फिल मीड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८९० - व्याचेस्लाव्ह मोलोटोव्ह, रशियन राजकारणी.
- १८९४ - फ्रांक अर्नाऊ, जर्मन कवी, लेखक.
- १९२९ - डेसमंड हॉइट, गुयानाचा पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष.
- १९४३ - बॉबी फिशर, अमेरिकन बुद्धिबळ खेळाडू.
मृत्यू[संपादन]
- १२०२ - स्वेर, नॉर्वेचा राजा.
- १८८८ - कैसर विल्हेम पहिला, जर्मनीचा सम्राट.
- १९७१ - के. आसिफ, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक.
- १९९२ - मेनाकेम बेगिन, इस्रायेलचा पंतप्रधान.
- २००३ - बर्नार्ड डोवियोगो, नौरूचा राष्ट्राध्यक्ष.
प्रतिवार्षिक पालन[संपादन]
- शिक्षक दिन - लेबेनॉन
बाह्य दुवे[संपादन]
- बीबीसी न्यूजवर मार्च ९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च ७ - मार्च ८ - मार्च ९ - मार्च १० - मार्च ११ - (मार्च महिना)