मे ८
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मे ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२८ वा किंवा लीप वर्षात १२९ वा दिवस असतो.
| << | मे २०१३ | >> | ||||
| सो | मं | बु | गु | शु | श | र |
| १ | २ | ३ | ४ | ५ | ||
| ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
| १३ | १४ | १ | १६ | १७ | १८ | १९ |
| २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ | २६ |
| २७ | २८ | २९ | ३० | ३१ | ||
अनुक्रमणिका |
ठळक घटना आणि घडामोडी [संपादन]
सोळावे शतक [संपादन]
- १५४१ - स्पॅनिश शोधक हर्नान्दो दि सोटो मिसिसिपी नदीच्या मुखाजवळ पोचला. त्याने या नदीचे नाव रियो दे एस्पिरितु सांतो असे ठेवले.
अठरावे शतक [संपादन]
- १७९४ - फ्रेंच क्रांतीच्या काळात सरकारी नोकर असलेल्या रसायनशास्त्रज्ञ आँत्वान लेवॉइझियेला पकडून खटला चालवण्यात आला व संध्याकाळच्या आत त्याचा गिलोटिन वर वध केला गेला.
एकोणिसावे शतक [संपादन]
- १८४६ - मेक्सिकन-अमेरिकन युद्ध-पॅलो आल्टोची लढाई.
- १८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - दक्षिणेने रिचमंड, व्हर्जिनिया आपली राजधानी असल्याचे जाहीर केले.
- १८८६ - डॉ.जॉन स्टाइथ पेम्बरटनने कोका कोला प्रथमतः तयार केले.
- १८९६ - इंग्लिश काउंटी क्रिकेट स्पर्धेत यॉर्कशायरने वॉरविकशायर विरुद्ध ८८७ धावांची विक्रमी खेळी केली.
- १८९९ - रँड वधाच्या प्रकरणी फितुरी करणार्या द्रविड बंधूंना ठार मारणार्या वासुदेव चाफेकर यांना फाशी.
विसावे शतक [संपादन]
- १९०२ - मार्टिनिक बेटावर माउंट पेली या ज्वालामुखीचा उद्रेक. सेंट पिएर हे शहर उद्ध्वस्त. ३०,००० ठार.
- १९३३ - महात्मा गांधींचे २१-दिवसांचे उपोषण चालू.
- १९४५ - दुसरे महायुद्ध-युरोप विजय दिन - जर्मनीची दोस्त राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती. युरोपमधील युद्ध समाप्त.
- १९४५ - सेटीफची कत्तल - फ्रांसच्या सैन्याने अल्जीरियात हजारो नागरिकांना ठार मारले.
- १९७३ - अमेरिकेच्या दक्षिण डाकोटा राज्यातील वुन्डेड नी येथील मूळ अमेरिकन व्यक्तिंचा ७१ दिवस चाललेला वेढा बिनशर्त शरणागती नंतर उठला.
- १९७४ - कॅनडाचे सरकार अल्पमतात येउन कोसळले.
- १९८४ - सोवियेत संघाने लॉस एंजेल्समधील तेविसावे ऑलिंपिक खेळांवर बहिष्कार टाकला.
- १९८४ - डेनिस लॉर्टीने कॅनडातील क्वेबेक प्रांताच्या विधानसभेत गोळ्या चालवल्या. ३ ठार. १३ जखमी.
- १९९७ - चायना सदर्न एरलाइन्सचे बोईंग ७३७ जातीचे विमान शेंझेन विमानतळावर उतरत असताना कोसळले. ३५ ठार.
एकविसावे शतक [संपादन]
- २००७ - उत्तर आयर्लंडमध्ये सत्तांतर.
जन्म [संपादन]
- १७५३ - मिगेल हिदाल्गो, मेक्सिकोचा स्वातंत्र्यसैनिक.
- १८२८ - ज्यॉँ हेन्री ड्युनांट, रेड क्रॉसचा संस्थापक.
- १८८४ - हॅरी ट्रुमन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१६ - स्वामी चिन्मयानंद, भारतीय तत्त्वज्ञानी.
- १९२५ - अली हसन म्विन्यी, टांझानियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३८ - जावेद बर्की, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७० - मायकेल बेव्हन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६१ - रियाझ पूनावाला, संयुक्त अरब अमिरातीचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू [संपादन]
- ५३५ - पोप जॉन दुसरा.
- १२७८ - दुआनझॉँग, चीनी सम्राट.
- १३१९ - हाकोन पाचवा, नॉर्वेचा राजा.
- १७७३ - अली बे अल-कबीर, इजिप्तचा सुलतान.
- १८१९ - कामेहामेहा, हवाईचा राजा.
- १९८२ - अनिल उर्फ कवि अनिल, मराठी कवी.
प्रतिवार्षिक पालन [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
- बीबीसी न्यूजवर मे ८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मे ६ - मे ७ - मे ८ - मे ९ - मे १० - (मे महिना)