फेब्रुवारी २२
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| << | फेब्रुवारी २०१३ | >> | ||||
| सो | मं | बु | गु | शु | श | र |
| १ | २ | ३ | ४ | ५ | ||
| ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
| १३ | १४ | १ | १६ | १७ | १८ | १९ |
| २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ | २६ |
| २७ | २८ | |||||
फेब्रुवारी २२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५३ वा किंवा लीप वर्षात ५३ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
ठळक घटना [संपादन]
इ.स.पू. तेरावे शतक [संपादन]
- १२९० - इजिप्तचा फेरो राम्सेस दुसर्याचा राज्याभिषेक.
तेरावे शतक [संपादन]
- १२८१ - मार्टिन चौथा पोप पदी.
- १२८८ - निकोलस चौथा पोप पदी.
पंधरावे शतक [संपादन]
- १४९५ - फ्रांसचा चार्ल्स आठव्याने नेपल्सचे राज्य बळकावले.
अठरावे शतक [संपादन]
- १७४४ - तुलोनची लढाई सुरू.
एकोणिसावे शतक [संपादन]
- १८१९ - स्पेनने फ्लोरिडाचा प्रदेश अमेरिकेला ५०,००,००० अमेरिकन डॉलरच्या मोबदल्यात विकला.
- १८४७ - बोयना व्हिस्ताची लढाई - अमेरिकेच्या ५,००० सैनिकांनी मेक्सिकोच्या १५,००० सैनिकांना पळवून लावले.
- १८६५ - टेनेसीने नवीन संविधान अंगिकारले व गुलामगिरी बेकायदा ठरवली.
- १८८९ - उत्तर डाकोटा, दक्षिण डाकोटा, मॉँटाना व वॉशिंग्टन अमेरिकेची राज्ये झाली.
विसावे शतक [संपादन]
- १९४२ - दुसरे महायुद्ध - फिलिपाईन्समध्ये पराभव अटळ दिसताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डिलानो रूझवेल्टने जनरल डग्लस मॅकआर्थरला माघार घ्यायचा हुकुम दिला.
- १९४८ - चेकोस्लोव्हेकियात क्रांति सुरू.
- १९७९ - सेंट लुशियाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९८० - बर्फावरील चमत्कार - लेक प्लॅसिड येथे तेराव्या हिवाळी ऑलिंपिक खेळात अमेरिकेच्या आइस हॉकी संघाने बलाढ्य अश्या सोवियेत संघाला हरवले.
एकविसावे शतक [संपादन]
- २००२ - एम.एच.४७-ई जातीचे हेलिकॉप्टर फिलिपाईन्सजवळ समुद्रात कोसळले. १० ठार.
जन्म [संपादन]
- १४०३ - चार्ल्स सातवा, फ्रांसचा राजा.
- १७३२ - जॉर्ज वॉशिंग्टन, अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- १८५७ - रॉबर्ट बेडेन-पॉवेल, बॉय स्काउट्सचा संस्थापक.
- १८५७ - हाइनरिक हर्ट्झ, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८५९ - जॉर्ज पामर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८८९ - ओलाव बेडेन-पॉवेल, गर्ल गाईड्सची संस्थापिका.
- १९१७ - जॅक रॉबर्टसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९१८ - रॉबर्ट वाडलो, ८ फूट ११ ईंच (२७२ से.मी.) उंचीचा जगातील सगळ्यात उंच पुरूष.
- १९२१ - जीन-बेडेल बोकासा, मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४१ - हिपोलितो मेजिया, डोमिनिकन प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४४ - रणजित फर्नान्डो, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६३ - विजय सिंग, फिजीचा गोल्फ खेळाडू.
- १९६३ - डेव्हन माल्कम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९८३ - शॉन टेट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
मृत्यू [संपादन]
- १३७१ - डेव्हिड दुसरा, स्कॉटलंडचा राजा.
- १९२१ - सलीम अल-मुबारक अल-सबाह, कुवैतचा अमीर.
- १९४४ - महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी.
- २००९ - डॉ.लक्ष्मण देशपांडे, मराठी लेखक, दिग्दर्शक व कलाकार.
प्रतिवार्षिक पालन [संपादन]
- स्वातंत्र्य दिन - सेंट लुशिया.
बाह्य दुवे [संपादन]
- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी २२ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
फेब्रुवारी २० - फेब्रुवारी २१ - फेब्रुवारी २२ - फेब्रुवारी २३ - फेब्रुवारी २४ - (फेब्रुवारी महिना)