विजयनगरचे साम्राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विजयनगर साम्राज्य या पानावरून पुनर्निर्देशित)

दक्षिणी भारतातील हंपी ही राजधानी असलेले राज्य हे विजयनगर साम्राज्य म्हणून ओळ्खले जाते. वरंगळच्या दोन हरिहर व बुक्क या भावांनी विजयनगरच्या साम्राज्याची पायाभरणी केली. हे पाच भाऊ होते. या भावांपैकी तिघे पूर्व किनार्‍यावरील नेल्लोर ते पश्चिम किनार्‍यावरचे बेळगाव येथे राज्य करत होते. होते. महाराष्ट्र हा हरिहरच्या अंमलाखाली होता. दुसरा भाऊ होता कंप. याचे उदयगिरीराज्य नावाचे राज्य होते. मधला भाऊ बुक्क. त्याच्या ताब्यात होयसळांचे हळेबीड, पेनुगोंडचा किल्ला व आसपासचा प्रदेश होता. त्याच्याही दक्षिणेकडे शिमोगाजवळील अरग येथे एक भाऊ राज्य करत असे व शेवटचा भाऊ बुक्कच्या हाताखाली सरदार होता. इस्लामशी टक्कर घेऊन हिंदू धर्माचे रक्षण करणे हे भावंडांचे ध्यय होते. यांनी अत्यंत हुशारीने विजयनगर ही मध्यवर्ती सत्ता मानून आपले साम्राज्य उभे केले होते.

बुक्करायाचा कंपराय नावाच मुलगा होता. त्याने वीरबल्लाळच्या ताब्यात असलेले मदुरा काबीज केले. कंपरायही बुक्कप्रमाणे मोठा शूर व कर्तबगार होता त्याच्या कारकिर्दीत त्याने दाखवलेल्या कर्तबगारीची वर्णने त्याच्या पत्‍नीने लिहिलेल्या एका “कम्पराजविजयम” या संस्कृत काव्यग्रंथात आली आहेत.. त्याने बुक्कराय राजाच्या मृत्यूनंतर दुसरा हरिहर असे नाव धारण करून स्वतःला विजयनगरच्या साम्राज्याचा पहिला सम्राट म्हणून घोषित केले.

वंशावळ[संपादन]

पहिला राजवंश संगमा - या राजवंशाने विजयनगरवर साधारणपणे शंभर वर्षे राज्य केले असे समजले जाते.
  • हरिहरराय-१: १३३६-१३५६
  • बुक्कराय-१: १३५६-१३७७
  • हरिहरराय-२: १३७७-१४०४
  • विरूपाक्षराय: १४०४-१४०५
  • बुक्कराय-२: १४०५-१४०६
  • देवराय-१: १४०६-१४२२
  • देवराय-२: १४२४-१४४६
  • रामचंद्रराय: १४२२
  • वीरविजय बुक्कराय: १४२२-१४२४
  • देवराय-२: १४२४-१४४६
  • मल्लिकार्जुनराय: १४४६-१४६५
  • विरूपाक्षराय-२: १४६५-१४८५
सालुव घराणे
  • नरसिंहदेवराय: १४८५-१४९१
  • तिम्मा भूपाल: १४९१
  • नरसिंहराय-१: १४९१-१५०५
तुलुव घराणे
  • नरसानायक: १४९१-१५०३
  • वीरनरसिंहराय: १५०३-१५०९
  • कृष्णदेवराय: १५०९-१५२९
  • अच्युतदेवराय: १५२९-१५४२
  • सदाशिवराय: १५४२-१५७०
अरविदू घराणे
  • अलियरामराय: १५४२-१५६५
  • तुरुमलदेवराय: १५६५-१५७२
  • श्रीरंग-१: १५७२-१५८६
  • वेंकट-२: १५८६-१६१४
  • श्रीरंग-२: १६१४
  • रामदेव: १६१७-१६३२
  • वेंकट-३: १६३२-१६४२
  • श्रीरंग-३: १६४२-१६४६.


इ .सं १३२३ मध्ये मध्ये वरंगळचे राज्य तुघलकने पादाक्रांत केले त्यवेळी हरिहर आणि बुक्कराय यांना तुघलकांनी बंदी बनवून दिल्लीला नेले. काही दिवसांनी त्यांची सुटका करवून तुघलकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांना दक्षिणेकडे पाठविले. .तेथे त्यांनी इ .स. १३३६ मध्ये डोंगरांनी व जंगलांनी वेढलेल्या भागात नवी वसाहत स्थापन करून तिला शृंगेरीच्या स्वामी विद्यारण्य सरस्वती यांच्या आशीर्वादाने विजयनगर हे नाव दिले. पुढे हेच विजयनगर साम्राज्य साहित्य व संस्कृतीचे विशाल दालन ठरले . विरुपाक्ष राय (दुसरा) याची हत्या करवून नरसिहराय याने संगम घराण्याची सत्ता संपुष्टात आणली आणि साळुव घराण्याचा पाया घातला. परंतु हे घराणे फार काळ सत्तेवर राहू शकले नाही .लवकरच तुलुव घराण्याच्या वीर नरसिंहराय याने सत्ता ताब्यात घेतली . प्रसिद्ध राजा कृष्णदेवराय (१५०९-१५२९) याच वंशाचा होता .


हेही पाहा[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.