एप्रिल २१
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
एप्रिल २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १११ वा किंवा लीप वर्षात ११२ वा दिवस असतो.
| << | एप्रिल २०१३ | >> | ||||
| सो | मं | बु | गु | शु | श | र |
| १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
| ८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
| १ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
| २२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
| २९ | ३० | |||||
अनुक्रमणिका |
ठळक घटना आणि घडामोडी [संपादन]
इ.स.पू. आठवे शतक [संपादन]
- ७५३ - रोम्युलसने रोम शहराच्या उभारणीस सुरुवात केली.
अठरावे शतक [संपादन]
- १७९२ - ब्राझिलच्या स्वातंत्र्यसेनानी तिरादेन्तेसचा वध.
एकोणिसावे शतक [संपादन]
- १८३६ - सान जेसिंटोची लढाई - सॅम ह्युस्टनच्या नेतृत्त्वाखालील टेक्सासच्या सैन्याने मेक्सिकन सैन्याला हरवले.
विसावे शतक [संपादन]
- १९१८ - पहिले महायुद्ध - जर्मनीच्या रेड बेरोन नावाने ओळखला जाणाऱ्या लढाउ वैमानिक मॅन्फ्रेड फोन रिक्टोफेनचा लढाईत अंत.
- १९३० - कोलंबस, ओहायो येथील तुरुंगात आग. ३२० ठार.
- १९४४ - फ्रांसमध्ये स्त्रीयांना मताधिकार प्राप्त.
- १९६० - ब्राझिलची राजधानी रियो दि जानेरोहून ब्राझिलियाला हलवण्यात आली.
- १९६६ - इथियोपियाच्या हेल सिलासीचे जमैकात आगमन. रासतफारी पंथातील एक महत्त्वाची घटना.
- १९६७ - ग्रीसमध्ये कर्नल जॉर्ज पापादोपोलसने सत्ता बळकावली.
- १९७५ - व्हियेतनाम युद्ध - दक्षिण व्हियेतनामच्या राष्ट्राध्यक्ष जुआन लॉकचे सैगोनहून पलायन.
- १९८७ - श्रीलंकेत कोलंबो येथे बॉम्बस्फोट. १०६ ठार.
- १९८९ - चीनची राजधानी बैजिंगच्या त्येनानमेन चौकात १,००,००० विद्यार्थी जमण्यास सुरुवात झाली.
- १९९७ - भारतीय पंतप्रधान म्हणून इंद्रकुमार गुजराल यांचा शपथविधी.
एकविसावे शतक [संपादन]
जन्म [संपादन]
- १७२९ - कॅथेरिन दुसरी, रशियाची सम्राज्ञी.
- १९०९ - ज.द. गोंधळेकर, मराठी चित्रकार.
- १९२६ - एलिझाबेथ दुसरी, इंग्लंडची राणी.
- १९३६ - जेम्स डॉब्सन, ख्रिस्ती धर्मप्रसारक.
- १९४४ - ग्विटी नोविन, इराणी-कॅनेडियन चित्रकार, ग्राफिक संकल्पक.
- १९७६ - शब्बीर अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू [संपादन]
- ७४८ - गेन्शो, जपानी सम्राज्ञी.
- १०१३ - पोप अलेक्झांडर दुसरा.
- १५०९ - सातवा हेन्री, इंग्लंडचा राजा.
- १९१० - सॅम्युएल क्लेमेन्स तथा मार्क ट्वेन, अमेरिकन लेखक.
- १९१८ - मॅन्फ्रेड फोन रिक्टोफेन, जर्मन लढाउ वैमानिक.
- १९३८ - अल्लामा इकबाल, भारतीय कवी.
- १९७१ - फ्रांस्वा डुव्हालिये, हैतीचा हुकुमशहा.
- १९७३ - आर्थर फॅडेन, ऑस्ट्रेलियाचा तेरावा पंतप्रधान.
- १९८५ - टँक्रेडो दि अल्मेडा नीव्ह्स, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
प्रतिवार्षिक पालन [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
- बीबीसी न्यूजवर एप्रिल २१ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल १९ - एप्रिल २० - एप्रिल २१ - एप्रिल २२ - एप्रिल २२ - (एप्रिल महिना)