ऑक्टोबर १९
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| << | ऑक्टोबर २०१२ | >> | ||||
| सो | मं | बु | गु | शु | श | र |
| १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
| ८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
| १५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
| २२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
| २९ | ३० | ३१ | ||||
ऑक्टोबर १९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २९२ वा किंवा लीप वर्षात २९३ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] तेरावे शतक
- १२१६ - इंग्लंडच्या राजा जॉनच्या मृत्युपश्चात त्याचा नऊ वर्षांचा मुलगा हेन्री राजेपदी.
[संपादन] पंधरावे शतक
- १४६६ - थॉर्नचा तह.
- १४६९ - अरागॉनच्या राजा अरागॉनचे कास्तियाच्या इझाबेलाशी लग्न. यानंतर कास्तिया व अरागॉन राज्ये एकत्र होऊन स्पेनच्या राष्ट्राचा पाया घातला गेला.
[संपादन] अठरावे शतक
- १७८१ - यॉर्कटाउन, व्हर्जिनिया येथे लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या वतीने त्याची तलवार जॉर्ज वॉशिंग्टनच्या हवाली करून ब्रिटिश सैन्याने अमेरिकेसमोर शरणागती पत्करली.
- १७८९ - जॉन जेचा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायाधीशपदी शपथविधी.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८१२ - नेपोलियन बोनापार्टने मॉस्कोच्या सीमेवरुन माघार घेतली.
- १८१३ - लीपझीगच्या लढाईत नेपोलियन बोनापार्टचा सडकून पराभव.
[संपादन] विसावे शतक
- १९१२ - ऑट्टोमन साम्राज्यानेने त्रिपोली इटलीच्या हवाली केले.
- १९२१ - डॅल्लास, टेक्सास येथील लव्ह फील्ड विमानतळाचे उद्घाटन.
- १९२१ - पोर्तुगालच्या पंतप्रधान अँतोनियो ग्रान्होसह अनेक राजकारण्यांची लिस्बनमध्ये हत्या.
- १९३३ - जर्मनीने लीग ऑफ नेशन्समधून अंग काढून घेतले.
- १९३३ - इथियोपियावर आक्रमण केल्याबद्दल लीग ऑफ नेशन्सने इटलीवर आर्थिक बंदी घातली.
- १९४४ - दुसरे महायद्ध - अमेरिकेच्या सैन्याचे फिलिपाईन्समध्ये आगमन.
- १९५० - चीनने तिबेटच्या काम्डो शहर काबीज करून तिबेटवरील चढाई सुरू केली.
- १९५० - चीनने यालु नदीपल्याड ५०,००० सैनिक पाठवून संयुक्त राष्ट्रांच्या सैन्यावर चढाई केली.
- १९५४ - चो ओयूवर पहिली चढाई.
[संपादन] जन्म
- १८७१ - डॉ. वॉल्टर कॅनन, वैद्यकीय चिकित्सेसाठी क्ष किरणांचा सर्वप्रथम उपयोग करणारा.
- १९०२ - दिवाकर कृष्ण तथा दिवाकर कृष्ण केळकर, मराठी कथाकार.
- १९१० - चंद्रशेखर सुब्रमण्यम - नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९२० - पांडुरंगशास्त्री आठवले, स्वाध्याय परिवाराचे संस्थापक.
- १९२५ - डॉ. वा.द. वर्तक, वनस्पतिशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक.
- १९५४ - प्राची चिकटे, बाल साहित्यिक.
- १९५९ - प्रिया तेंडुलकर. अभिनेत्री आणि मराठी कथालेखिका.
[संपादन] मृत्यू
- १९३४ - विश्वनाथ कार, उडिया लेखक व समाजसुधारक. १८९६ मध्ये त्यांनी एक छापखाना काढून उत्कल साहित्य नावाचे नियतकालिक काढले.
- १९३७ - अर्नेस्ट रुदरफोर्ड, इंग्लिश अणुशास्त्रज्ञ.
- १९९५- बेबी नाझ, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- २००२- मेहली मेहता, अमेरिकन यूथ सिंफनी ऑर्केस्ट्रा संचालक.
- २००६- श्रीविद्या, दाक्षिणात्य भारतीय अभिनेत्री.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
ऑक्टोबर १७ - ऑक्टोबर १८ - ऑक्टोबर १९ - ऑक्टोबर २० - ऑक्टोबर २१ - ऑक्टोबर महिना