फेब्रुवारी २७
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| << | फेब्रुवारी २०१३ | >> | ||||
| सो | मं | बु | गु | शु | श | र |
| १ | २ | ३ | ४ | ५ | ||
| ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
| १३ | १४ | १ | १६ | १७ | १८ | १९ |
| २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ | २६ |
| २७ | २८ | |||||
फेब्रुवारी २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५८ वा किंवा लीप वर्षात ५८ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना
[संपादन] सोळावे शतक
- १५६० - बर्विकचा तह - इंग्लंड व स्कॉटलंडने फ्रान्सला स्कॉटलंडमधून घालवून देण्याचे ठरवले.
- १५९४ - हेन्री चौथा फ्रान्सच्या राजेपदी.
[संपादन] अठरावे शतक
- १७०० - न्यू ब्रिटन या पापुआ न्यू गिनीतील बेटाचा शोध लागला.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८०१ - वॉशिंग्टन डी.सी. अमेरिकन काँग्रेसच्या अखत्यारीत आले.
- १८४४ - डॉमिनिकन प्रजासत्ताकला हैती पासून स्वातंत्र्य.
- १८७९ - सॅकेरिन या साखरेसारख्या मानवनिर्मित गोड पदार्थाचा शोध.
[संपादन] विसावे शतक
- १९०० - ब्रिटिश लेबर पार्टीची स्थापना.
- १९१२ - वि. वा. शिरवाडकर यांचा जन्म.
- १९३३ - जर्मनीच्या संसदभवनाला आग लागली.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - जपानच्या लढाऊ विमानांनी अमेरिकेचे विमानवाहू जहाज यू.एस.एस. लँगली बुडवले.
- १९४३ - बेर क्रीक, मॉन्टाना येथे एका खाणीत स्फोट. ७४ ठार.
- १९५१ - अमेरिकेच्या संविधानातील २१वा बदल - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची कारकीर्द जास्तीत जास्त दोन मुदतीं(८ वर्षे)पुरतीच.
- १९६३ - हुआन बोश डॉमिनिकन प्रजासत्ताकच्या राष्ट्राध्यक्षपदी आले.
- १९६७ - डॉमिनिकाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९८९ - व्हेनेझुएलामध्ये जनक्षोभ.
- १९९१ - कुवैतला इराकी सैन्यापासून मुक्ती.
- १९९९ - ओलुसेगुन ओबासान्जो नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
[संपादन] एकविसावे शतक
- २००२ - लंडनच्या स्टॅन्स्टेड विमानतळावर रायनएर फ्लाइट २९६ला आग.
- २००२ - गुजरातच्या गोधरा रेल्वे स्थानकात साबरमती एक्सप्रेसला आग लावण्यात आली. ५८ हिंदू यात्रेकरू ठार. या घटनेचा सूड म्हणून उसळलेल्या जातीय दंग्यांमध्ये १,००० हून अधिक व्यक्तींचे प्राण गेले.
- २००४ - फिलिपाईन्समध्ये अबु सयफ या अतिरेकी गटाने फेरीवर बॉम्बस्फोट घडवले, ११६ ठार.
- २००७ - शांघाय रोखे बाजारातील भाव एका दिवसात ९ टक्क्यांनी कोसळले.
- २०१० - चिलीमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.८ तीव्रतेचा भूकंप.
[संपादन] जन्म
- २७२ - कॉन्स्टन्टाईन पहिला, रोमन सम्राट.
- १८०७ - हेन्री वॅड्सवर्थ लाँगफेलो, इंग्लिश कवि.
- १९०२ - जॉन स्टाइनबेक, अमेरिकन लेखक.
- १९०६ - माल मॅथिसन, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९१० - केली जॉन्सन, अमेरिकन विमान तंत्रज्ञ.
- १९१२ - कुसुमाग्रज, मराठी कवी, नाटककार.
- १९२० - रेज सिम्पसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९२४ - नॉर्मन मार्शल, वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू.
- १९२८ - एरियेल शरोन, इस्राइलचे पंतप्रधान.
- १९३४ - राल्फ नेडर, अमेरिकन राजकारणी, ग्राहक-हक्क चळवळीची नेता.
- १९३९ - लेस्टर किंग, वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू.
- १९४४ - ग्रेम पोलॉक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९४७ - ऍशली वुडकॉक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६६ - इनामुल हक, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.
- १९७४ - जिमी माहर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- १९२१ - शोफील्ड हे, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४७ - एफ.ए. मॅककिनन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८७ - आनंदीबाई गोपाळराव जोशी, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
- जागतिक मराठी भाषा दिवस
- स्वातंत्र्य दिन - डॉमिनिकन प्रजासत्ताक.
- स्वातंत्र्य दिन - डॉमिनिका.
[संपादन] बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी २७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
फेब्रुवारी २५ - फेब्रुवारी २६ - फेब्रुवारी २७ - फेब्रुवारी २८ - फेब्रुवारी २९ - (फेब्रुवारी महिना)