२००८ फॉर्म्युला वन हंगाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००८ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम
मागील हंगाम: २००७ पुढील हंगाम: २००९
यादी: देशानुसार | हंगामानुसार
लुइस हॅमिल्टन, ९८ गुणांसोबत २००८ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.
फिलिपे मास्सा, ९७ गुणांसोबत २००८ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.
किमी रायकोन्नेन, ७५ गुणांसोबत २००८ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.

२००८चा फॉर्म्युला वन हंगाम हा फॉर्म्युला वन अजिंक्यपदाचा ५९वा हंगाम होता. या हंगामाची सुरवात मार्च १६ रोजी झाली व नोव्हेंबर २ला शेवट झाली. या हंगामात एकुन १८ शर्यती घेण्यात आल्या.

लुइस हॅमिल्टनला २००८चे चालक अजिंक्यपद ऐका गुणावरुन मिळाले. त्याने शेवटच्या शर्यतीत टिमो ग्लोकला शेवटच्या कोपर्यात गाठुन मागे टाकले. त्यामुळे त्या शर्यतीत त्याला ५वे स्थान मिळाले, व फिलिपे मास्साचे ५वे स्थान गेले. २००७वा फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद जिंकणारा किमी रायकोन्नेन, २००८ फॉर्म्युला वन अजिंक्यपदी तिसर्या स्थानात आला. त्याने या हंगामात दोन शर्यती जिंकल्या होत्या. स्कुदेरिआ फेरारीला २००८चे कारनिर्माता अजिंक्यपद मिळाले.[१]लुइस हॅमिल्टनहा सर्वात लहान वयात अजिंक्यपद जिंकणारा या पदवीच्या मानकरी झाला व डेमन हिल नंतर ग्रेट ब्रिटनसाठी अजिंक्यपद जिंकणारा तो एकमेव चालक ठरला. डेमन हिल ने ग्रेट ब्रिटनसाठी १९९६ फॉर्म्युला वन हंगामात अजिंक्यपद मिळावले होते.[२]

एकुन अकरा कारनिर्मात्या संघांनी या अजिंक्यपदासाठी भाग घेतला. सुपर आगुरी एफ१ संघाने मे ६ रोजी या हंगामातुन माघार घेतली, त्यांची आर्थिक स्थिती बिघडल्यामुळे त्यांना फक्त ४ शर्यती पूर्ण करून माघार घ्यावी लागली. २००८चा फॉर्म्युला वन हंगामात काही नविन कायदे सुद्धा अमलात आणण्यात आले, जसे ट्रॅक्शन कंट्रोल, लाँच कंट्रोल व इंजिन ब्रेकींग रिड्कशन या इलेक्ट्रॉनिक यंत्रांवर प्रतिबंध. २००१चा फॉर्म्युला वन हंगामात त्यांच्यावरील प्रतिबंध हटवण्यात आले होते.

२००८ फॉर्म्युला वन हंगामात दोन नविन सर्किटांचा समावेश झाला, त्यात वेलेंशिया स्ट्रीट सर्किटमरीना बे स्ट्रीट सर्किटचा समावेश आहे. वेलेंशिया स्ट्रीट सर्किट येथे युरोपियन ग्रांप्री आयोजीत झाली व मरीना बे स्ट्रीट सर्किट येथे सिंगापूर ग्रांप्री आयोजीत करण्यात आली. सिंगापूर ग्रांप्री ही फॉर्म्युला वन इतीहासातील पहिली रात्री चालणारी शर्यत होती. होंडा रेसिंग एफ१ कार्निर्मात्या संघाने त्यांची आर्थिक स्थिती बिघडल्यामुळे फॉर्म्युला वन मधुन माघार घेतली. नंतर रॉस ब्रानने हा संघ विकत घेतला, व नविन संघाचे नाव ब्रॉन जीपी म्हणून ठेवले. ब्रॉन जीपी कार्निर्माता संघने त्यांच्या गाड्यांसाठी मर्सिडिज-बेंझ इंजिनांचा वापर केला. २००८ फॉर्म्युला वन हंगाम हा शेवटचा हंगाम होता जेथे खाचे असलेले टायर वापरले गेले. खाचे असलेले टायर वापरण्याच्या प्रथेची सुरवात १९९८ फॉर्म्युला वन हंगामापासुन झाली होती. २००९ फॉर्म्युला वन हंगामापासुन गुळगुळीत टायर वापरण्याच्या प्रथेची सुरवात झाली.

फॉर्म्युला वनच्या इतिहासात पहिल्यांदा असे झाले की सर्व संघानी त्यांच्या दोघ्या चालकांचा वापर पूर्ण हंगामात केला, व पहील्यांदा ट्रॅक्शन कंट्रोलच्या बिना गाड्या चालवण्यात आल्या होत्या.

हंगामाअधिल माहीती[संपादन]

परीक्षण[संपादन]

२ वेळा विश्वविजेता असलेल्या फर्नांदो अलोन्सो, सर्किट डी वॅलेन्सिया येथे रेनोल्ट आर.२८ फॉर्म्युला वन गाडीचे परीक्षण करतांना.

सर्वात पहील्या परीक्षण सत्राची सुरवात जानेवारी १४, इ.स. २००८ रोजी सर्किटो पर्मनान्टे डी जेरेझ येथे झाली. स्कुदेरिआ फेरारी, मॅकलारेन आणि टोयोटा रेसिंग या कारनिर्मात्या संघांनी त्यांच्या २००८ फॉर्म्युला वन हंगामात चालवण्याच्या गाड्यांचे परीक्षण केले. विलियम्स एफ१ने त्यांची रुपांतरीत केलेल्या विलियम्स एफ.डब्ल्यु.२९ गाडीचे परीक्षण केले व रेनोल्ट एफ१ आणि रेड बुल रेसिंग कारनिर्मात्या संघांनी त्यांच्या २००७ फॉर्म्युला वन हंगामात सामील झालेल्या गाड्यांचे परीक्षण केले. होंडा रेसिंग एफ१, स्कुदेरिआ टोरो रोस्सो, सुपर आगुरी एफ१ आणि फोर्स इंडिया कारनिर्मात्या संघांनी सुद्दा या परीक्षण सत्रात भाग घेतले. बी.एम.डब्ल्यू. सौबर या संघाने भाग नाही घेतला कारण ते त्यांची बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ.१.०८ गाडी तैयार करण्यात गुंतलेले होते.[३]

मग जानेवारी २२, इ.स. २००८ रोजी परीक्षण सर्किट डी वॅलेन्सिया येथे हलवण्यात आले. पहील्या दिवशी फक्त रेनोल्ट आणि विलियम्स हजर झाले व त्यांनी त्यांच्या या हंगामात चालवीण्यात येणार्या गाड्यांचे परीक्षण केले.[४]. पुढच्या तीन दिवसात सुपर आगुरी एफ१ संघ सोडून बाकी सर्व संघ वॅलेन्सिया येथील परीक्षणात सामील झाले. पुढे हे परीक्षण फेब्रुवारी १, इ.स. २००८ रोजी सर्किट डी काटलुन्या येथे हलवण्यात आले व पुन्हा सुपर आगुरी एफ१ संघ सोडून बाकी सर्व संघ परीक्षणात सामील झाले. परीक्षणाच्या पहिल्याच दिवशी काझुकी नाकाजिमाने त्याची विलियम्स एफ.डब्ल्यु.३० गाडीचा अपघात केला.[५]लुइस हॅमिल्टन वर वंशविव्देष करण्यात आला. विलियम्स एफ१ला तिसर्या दिवशी परीक्षणातुन माघार घ्यावी लागली कारण त्यांना काझुकी नाकाजिमाच्या गाडीच्या अपघाता नंतर आलेले बिघाड सुधरवयाचे होते. पुढे फेब्रुवारी ४, इ.स. २००८ रोजी स्कुदेरिआ फेरारी आणि टोयोटा एफ१, हे दोघे संघ त्यांच्या फेरारी एफ.२००८टोयोटा टी.एफ.१०८[६] गाड्यांच्या परीक्षणासाठी बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट येथे गेले. पुढे हे परीक्षण फेब्रुवारी १२, इ.स. २००८ रोजी सर्किटो पर्मनान्टे डी जेरेझ येथे पुन्हा सुरु झाले. पहिल्या दिवशी रेड बुल रेसिंग आणि विलियम्स एफ१ संघांनीच परीक्षण केले.[७]. दुसर्या दिवशी स्कुदेरिआ फेरारी आणि टोयोटा एफ१ सोडून बाकी सरव्या संघानी परीक्षण केले. स्कुदेरिआ फेरारी आणि टोयोटा एफ१ हे दोघे संघ बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट येथे परीक्षण करत असल्यामुळे, सर्किटो पर्मनान्टे डी जेरेझ येथील परीक्षणात सहभागी नाही होऊ शकले. सर्किटो पर्मनान्टे डी जेरेझ येथे परीक्षणासाठी सुपर आगुरी एफ१ संघ पहिल्यांदा सामील झाले, व त्या संघने तेथे सुपर आगुरी एस.ए.०७.बी या गाडीचे परीक्षण केले. या गाडीच्या परीक्षणाआधी त्यांना त्यांच्या सुपर आगुरी एस.ए.०८ गाडीचे उदघाटन पुढे ढकलवे लागले व वॅलेन्सिया येथील परीक्षणात सुद्दा सामील नाही होता आले.[८]

पुढे हे परीक्षण फेब्रुवारी १९, इ.स. २००८ रोजी सर्किट डी काटलुन्या येथे सुरु झाले. बी.एम.डब्ल्यू. सौबर संघ सर्किटो पर्मनान्टे डी जेरेझ येथे परीक्षण करत असल्यामुळे सामील नाही झाले.[९]सुपर आगुरी एफ१ संघाने दुरचित्रवाहीणी व व्रूतपत्राच्या वार्ताहारांना प्रश्न-उत्तराच्या सभेचे आश्वासन दिले असतानाही, ते तेथे हाजर नाही जाले. सुपर आगुरी एफ१ संघाने त्यांची वास्तु स्थिती त्यांच्या नियंत्रणाच्या बाहेर गेल्यामुळे, त्यांना हाजर नाही होता आले असे कारण सांगितले. पहिल्या दिवशी परीक्षणावेळेत सर्किट डी काटलुन्या येथे खुप पाऊस झाला, तरीपण रेड बुल रेसिंग, विलियम्स एफ१, रेनोल्ट एफ१ आणि टोयोटा एफ१ संघ परीक्षणासाठी सामील झाले. निको रॉसबर्गने विलियम्स एफ१साठी त्या दिवसाची सर्वात जलद फेरी मारुन, अव्वल वेळ नोंदवला.

परीक्षणाच्या दुसर्या दिवशी स्कुदेरिआ फेरारी सामील झाले, व फिलिपे मास्साने पाउस पडत असतांनाही त्यांच्यासाठी त्या दिवसाचा अव्वल वेळ नोंदवला. परीक्षणाच्या शेवटच्या दिवशी मॅक्लरीन सुद्दा सामील झाले व काझुकी नाकाजिमाने विलियम्स एफ१साठी त्या दिवसाचा अव्वल वेळ नोंदवला. शेवटचे परीक्षण फेब्रुवारी २५, इ.स. २००८ रोजी सुरु झाले व सुपर आगुरी एफ१ संघ सोडून बाकी सर्व संघ परीक्षणात सामील झाले. पहिल्या दिवशी लुइस हॅमिल्टनने मॅक्लरीनसाठी त्या दिवसाचा अव्वल वेळ नोंदवला. त्याने स्कुदेरिआ फेरारी संघाच्या किमी रायकोन्नेनमिखाएल शुमाखरला मागे टाकत हा वेळ नोंदवला. परीक्षणाच्या दुसर्या दिवशी मॅक्लरीनने स्कुदेरिआ फेरारीवर वर्चस्व ठेवत दोघ्या मॅक्लरीन चालकांनी स्कुदेरिआ फेरारीच्या चालकांना मागे टाकले व शेवटच्या दिवशी यार्नो त्रुल्ली ने टोयोटा एफ१साठी त्या दिवसाचा अव्वल वेळ नोंदवला.

हंगामाचा आढावा[संपादन]

२००८ फॉर्म्युला वन हंगाम हा फॉर्म्युला वन खेळातील सर्वात चुरशीच्या लढतीच्या सामन्यांचा हंगाम होता. किमी रायकोन्नेनने लुइस हॅमिल्टनला पहील्या अर्ध्या हंगाम चुरशीची लढत दिली व दुसर्या अर्ध्या हंगामात फिलिपे मास्साने त्याला चांगलेच आव्हान दिले. पण शेवटी लुइस हॅमिल्टनने फिलिपे मास्साकडुन फक्त एका गुणावरुन २००८चे अजिंक्यपद पटकावले.

संघ आणि चालक[संपादन]

२००८ फॉर्म्युला वन हंगामात एकुन ७ संघांनी एफ.ओ.एम. बरोबरच्या करारावरुन भाग घेतला व अजून ४ संघांनी जी.पी.एम.ए बरोबर २००६ स्पॅनिश ग्रांप्रीच्या वेळी एका कबुलीपत्रीकेवर सही केली होती म्हणून त्यांनी ही २००८ हंगामात सहभाग घेतला. सर्व संघांना २ जागा देण्याता आल्या. २००८ फॉर्म्युला वन हंगामात एकुन ११ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २००८ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २००८ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २००८ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतीहासीक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.[१०]

संघ कारनिर्माता चेसिस इंजिन† टायर चालक क्र. रेस चालक शर्यत क्र. चालक क्र परीक्षण चालक
इटली स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो स्कुदेरिआ फेरारी फेरारी एफ.२००८[११] फेरारी ०५६ फिनलंड किमी रायकोन्नेन[१२] सर्व ३१ इटली लुका बाडोर[१३]
स्पेन मार्क जीनी[१३]
जर्मनी मिखाएल शुमाखर[१४]
ब्राझील फिलिपे मास्सा[१५] सर्व
जर्मनी बी.एम.डब्ल्यू. सौबर बी.एम.डब्ल्यू. सौबर बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ.१.०८[१६] बी.एम.डब्ल्यू. पी.८६/८ जर्मनी निक हाइडफेल्ड[१७] सर्व ३२ ऑस्ट्रिया ख्रिस्टियन क्लेन[१८]
एस्टोनिया मार्को अस्मेर[१८]
पोलंड रोबेर्ट कुबिचा[१७] सर्व
फ्रान्स आय.एन.जी रेनोल्ट एफ१ रेनोल्ट एफ१ रेनोल्ट आर.२८[१९] रेनोल्ट आर.एस.२७ स्पेन फर्नांदो अलोन्सो[२०] सर्व ३३ ब्राझील लुकास डी ग्रासी[२१]
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन[२२]
जपान सकोन यामामोटो[२३]
ब्राझील नेल्सन आंगेलो पिके सर्व
युनायटेड किंग्डम ए.टी.& टी. विलियम्स एफ१ विलियम्स एफ१ विलियम्स एफ.डब्ल्यू.३०[२४] टोयोटा आर.व्ही.एक्स.०८[२५] जर्मनी निको रॉसबर्ग[२६] सर्व ३४ जर्मनी निको हल्केनबर्ग[२७]
जपान काझुकी नाकाजिमा[२६] सर्व
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग रेड बुल रेसिंग रेड बुल आर.बी.४[२८] रेनोल्ट आर.एस.२७ युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड[२९] सर्व ३५ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी[३०]
१० ऑस्ट्रेलिया मार्क वेबर[३१] सर्व
जपान पॅनोसॉनिक टोयोटा रेसिंग टोयोटा रेसिंग टोयोटा टी.एफ.१०८[३२] टोयोटा आर.व्ही.एक्स.०८ ११ इटली यार्नो त्रुल्ली[३३] सर्व ३६ जपान कमुइ कोबायाशी[३४]
१२ जर्मनी टिमो ग्लोक[३५] सर्व
इटली स्कुदेरिआ टोरो रोस्सो स्कुदेरिआ टोरो रोस्सो टोरो रोस्सो एस.टी.आर.२बी[३६]
टोरो रोस्सो एस.टी.आर.३[३७]
फेरारी ०५६ १४ फ्रान्स सेबास्तिआं बूर्दे[३८] सर्व ३७ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले[३९]
१५ जर्मनी सेबास्टियान फेटेल[४०] सर्व
जपान होंडा रेसिंग एफ१ होंडा रेसिंग एफ१ होंडा आर.ए.१०८[४१] होंडा आर.ए.८०८.इ १६ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन[४२] सर्व ३८ ऑस्ट्रिया एलेक्सांडर वुर्झ[४३]
युनायटेड किंग्डम अँथनी डेविडसन[४४]
युनायटेड किंग्डम माइक कॉन्वे[४५]
इटली लुका फिलिप्पी[४६]
१७ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो[४७] सर्व
जपान सुपर आगुरी एफ१ सुपर आगुरी एफ१ सुपर आगुरी एस.ए.०८[४८] होंडा आर.ए.८०८.इ १८ जपान ताकुमा सातो[१०] १-४ ३९
१९ युनायटेड किंग्डम अँथनी डेविडसन[१०] १-४
भारत फोर्स इंडिया फोर्स इंडिया फोर्स इंडिया व्ही.जे.एम.-०१[४९] फेरारी ०५६[५०] २० जर्मनी आद्रियान सुटिल[५१] सर्व ४० इटली विटांटोनियो लिउझी[५१]
२१ इटली ज्यांकार्लो फिजिकेल्ला[५१] सर्व
युनायटेड किंग्डम वोडाफोन मॅक्लरीन मर्सिडीज मॅक्लरीन मॅक्लरीन एम.पी.४-२३[५२] मर्सिडीज एफ.ओ.१०८.व्ही २२ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन[५३] सर्व ४१ स्पेन पेड्रो डी ला रोसा[५४]
युनायटेड किंग्डम गॅरी पफेट्ट[५४]
२३ फिनलंड हेइक्कि कोवालायनन[५५] सर्व
 • सर्व इंजिन फॉर्म्युला वनच्या २.४ लिटर व्हि.८ इंजिनच्या नियमाप्रमाणे आहेत. हा नियम २००६ फॉर्म्युला वन हंगामात अमलात आणला गेला होता.
 • सुपर आगुरी एफ१ संघाने माघार घेतली कारण त्यांची आर्थिक परिस्थिती खराब झाली होती.

हंगामातील बदल[संपादन]

कायद्यांमधिल बदल[संपादन]

 • मायक्रोसॉफ्ट व मॅकलारेन इलेक्ट्रॉनिक सिस्टिमस या दोघा कंपन्यांच्या भागीदारीतमुळे बनलेल्या "मायक्रोसॉफ्ट एम.इ.एस" या कंपनीने "इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट" हे ठरवीलेले यंत्राचा पुरवठा केला.[५६]
 • ट्रॅक्शन कंट्रोल, लाँच कंट्रोल व इंजिन ब्रेकींग रिड्कशन या इलेक्ट्रॉनिक यंत्रांना प्रतिबंधीत करण्यात आले.[५७]
 • २००८ पासुन पुढील ५ वर्षे इंजिनमध्ये बदल करण्यास प्रतिबंध लागु करण्यात आला [५८] व एखाद्या हंगामात जर न ठरवता इंजिन बदलण्यात आले तर शर्यत सुरवातील १० जागा मागे जाण्याचे दंड नाही लागु होणार.[५९]
 • गाड्यांमधील इंधन हे कमीत कमी ५.७५% जिवाक्ष्णु मिश्रित असायला हवे.[६०]
 • गियरबॉक्स कमीतकमी ४ शर्यतींपर्यंत चालायला हवा. जर त्यामध्ये बदलण्यात आला, तर शर्यत सुरवातील ५ जागा मागे जाण्याचे दंड लागु होणार. जर एखाद्या चालकाने एखादी शर्यत पूर्ण नाही केली तर त्याला पुढच्या शर्यतीसाठी गियरबॉक्स बदल्यास परवानगी आहे.[६१]
 • चालकाच्या बैठकीच्या जागेचे संरक्षण वाढवण्यात आले.[६२]
 • जादा गाडीच्या वापरावर बंदी टाकण्यात आलेली व प्रत्येक संघाला दोनपेक्षा जास्त गाड्या वापरण्यावर सुद्धा बंदी आलेली होती. या संदर्भात गाडी म्हणजे अर्धवट बनवलेली गाडी ज्यामध्ये इंजिन, सस्पेन्शन, रेडियटर, तेल टाकी, साचा अथवा इतर गाडीचे भाग बसवलेले असल्यास, ती गाडी संपूर्ण गाडी म्हणून मानन्यात येईल.[६१]
 • ब्रिजस्टोन या कंपनीला २००८ ते २०१० फॉर्म्युला वन हंगामा पर्यंत, सर्व शर्यतींसाठी अधिक्रुत टायर पुरवठा करण्यासाठी नेमण्यात आले.[६३]. ब्रिजस्टोनला फॉर्म्युला वन शर्यतींसाठी अत्यंत ओल्या हवामानासाठी उपयुक्त असे टायर बनवण्यास नेमले गेले. या टायरांनामध्ये एक सफेद रंगाची रेषे आखण्यास सांगितले गेले, कारण त्यामुळे दुसर्या जातीच्या नरम ओल्या हवामानाचे टायर ओळखता येतील.[६४]
 • कोणत्याही संघाला २००८ फॉर्म्युला वन हंगामात ३०,००० कि.मी. (१८,६४२ मैल) पेक्षा जास्त परीक्षण करण्यास बंदी आहे.[६१]
 • पहील्या सराव फेरीची वेळ २० मिनीटांनी वाढवण्यात आली व शेवटच्या सराव फेरीची वेळ १० मिनीटांनी कमी करण्यात आली. शेवटच्या सराव फेरीत भाग घेणार्या संघांना, मुख्य शर्यतीच्या सुरवातीचे स्थान नेमण्यात आल्यावर पुन्हा गाडीमध्ये इंधन टाकण्यास मनाई करण्यात आली कारण, एकदा इंधन टाकल्यावर गाडीला पहील्या काही फेर्या, ते इंधन जाळण्यास कराव्यालागत व त्यामुळे दुसर्या संघांचा वेळ वाया जात असे.
 • बहरैन ग्रांप्री पासुन एक नियम लागु करण्यात आला, ज्या मध्ये मुख्य शर्यतीत पात्र ठरण्यासाठी, एक सर्कीट फेरी पूर्ण करण्यास लागणार्‍या वेळेत, एक वेळ ठरवण्यात आली. ज्या चालकाने ह्या कमीतकमी वेळेत पूर्ण फेरी नाही केली, तो चालक मुख्य शर्यतीसाठी अपात्र ठरेल. हा नियम लागु करण्यामागे कारण होते की, जेव्हा एखादी कार पिट्सकडे वळायाची तेव्हा ते कमी वेगात जायचे, जे मागून येणाऱ्या दुसऱ्या गांड्यांसाठी धोकादायक ठरले असते. २००८ मलेशियन ग्रांप्री मध्ये असेच घडले होते, जेव्हा लुइस हॅमिल्टनहिक्की कोवालाइन पिट्सकडे वळले व त्यामूळे निक हाइडफेल्डफर्नांदो अलोन्सो ला अडथळा निर्माण झाला होता. लुइस हॅमिल्टनहिक्की कोवालाइन च्या या चुकीमुळे त्यांना मुख्य शर्यतीत सुरवातील ५ जागा मागे जाण्याचे दंड लागु झाले. प्रत्येक शर्यतीत हा कमीतकमी फेरी वेळ, वेगळा ठेवण्यात आला होता, उदा. बहरैन ग्रांप्रीसाठी १:३९ मिनीटे कमीतकमी फेरी वेळ ठरवण्यात आला होता.
 • फॉर्म्युला वन मधुन सुपर आगुरी एफ१च्या मागारा नंतर, मुख्य शर्यतीसाठीची पात्रता पधती बदलण्यात आली. मे ८, इ.स. २००८ रोजी एफ.आय.एने शर्यतीच्या पात्रतेचे नवीन नियम जाहीर केले. पहिल्या सराव फेरीत आता ५ चालक अपात्र ठरतील ज्यांचा सारावातील फेरी वेळ इतरांपेक्षा जास्त असेल. आधी ६ चालक अपात्र ठरत असत. यामुळे आता जास्त चालक दुसऱ्या सराव फेरीसाठी पात्र ठरत. दुसऱ्या ते तिसऱ्या फेरीच्या पात्रता नियमांमध्ये काही बदल नाही करण्यात आला.[६५]

संघांमधील बदल[संपादन]

चालकांमधील बदल[संपादन]

राल्फ शुमाखरने फॉर्म्युला वन मध्ये १० वर्ष भाग घेतल्यावर, २००८ फॉर्म्युला वन हंगामात भाग नाही घेतला. टोयोटा रेसिंग संघात त्याच्या जागी टिमो ग्लोकला घेण्यात आले.

स्पर्धेच्या कार्यक्रमातील बदल[संपादन]

नविन बनवलेला मरीना बे स्ट्रीट सर्किट, जेथे सिंगापूर ग्रांप्री आयोजीत करण्यात आली

हंगामाचे वेळपत्रक[संपादन]

एफ.आय.ए संघटनेने २००८ फॉर्म्युला वन हंगामाचे वेळपत्रक ऑक्टोबर २४, इ.स. २००७ रोजी जाहीर केला. या हंगामात सिंगापूर ग्रांप्रीसाठी मरीना बे स्ट्रीट सर्किटयुरोपियन ग्रांप्रीसाठी वेलेंशिया स्ट्रीट सर्किट, या दोन नविन सर्किटांचा समावेश करण्यात आला. सिंगापूर ग्रांप्री ही फॉर्म्युला वन इतीहासातील पहिली रात्री चालणारी शर्यत होती.

फेरी अधिक्रुत रेस नाव ग्रांप्री सर्किट शहर तारिख वेळ
स्थानिय GMT
ऑस्ट्रेलिया आय.एन.जी. ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलियन ग्रांप्री मेलबर्न ग्रांप्री सर्किट मेलबर्न मार्च १६ १५:३० ०४:३०
मलेशिया पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री मलेशियन ग्रांप्री सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट कुलालंपूर मार्च २३ १५:०० ०७:००
बहरैन गल्फ एर बहरैन ग्रांप्री बहरैन ग्रांप्री बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट साखीर, मनामा एप्रिल ६ १४:३० ११:३०
स्पेन ग्रान प्रिमीयो डी इस्पाना तेलेफोनिका स्पॅनिश ग्रांप्री सर्किट डी काटलुन्या बार्सिलोना एप्रिल २७ १४:०० १२:००
तुर्कस्तान पेट्रोल ओफिसी तुर्की ग्रांप्री तुर्की ग्रांप्री इस्तंबूल पार्क इस्तंबूल मे ११ १५:०० १२:००
मोनॅको ग्रांप्री डी मोनॅको मोनॅको ग्रांप्री सर्किट डी मोनॅको माँटे-कार्लो मे २५ १४:०० १२:००
कॅनडा ग्रांप्री डु कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री सर्किट गिलेस विलेनेउ माँत्रियाल जून ८ १३:०० १७:००
फ्रान्स ग्रांप्री डी फ्रान्स फ्रेंच ग्रांप्री सर्किट डी नेवेर्स मॅग्नी-कौर्स मॅग्नी कौर्स जून २२ १४:०० १२:००
युनायटेड किंग्डम सान्तान्देर ब्रिटिश ग्रांप्री ब्रिटिश ग्रांप्री सिल्वेरस्टोन सर्किट सिल्वेरस्टोन जुलै ६ १३:०० १२:००
१० जर्मनी ग्रोसर प्रिस सान्तान्देर वॉन डुस्चलँड जर्मन ग्रांप्री हॉकेंहिम्रिंग होकनहाइम जुलै २० १४:०० १२:००
११ हंगेरी आय.एन.जी. माग्यर नागीदिज हंगेरियन ग्रांप्री हंगरोरिंग बुडापेस्ट ऑगस्ट ३ १४:०० १२:००
१२ युरोप तेलेफोनिका ग्रांप्री ऑफ युरोप युरोपियन ग्रांप्री वेलेंशिया स्ट्रीट सर्किट वेलेंशिया ऑगस्ट २४ १४:०० १२:००
१३ बेल्जियम आय.एन.जी. बेल्जियम ग्रांप्री बेल्जियम ग्रांप्री सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस स्पा सप्टेंबर ७ १४:०० १२:००
१४ इटली ग्रान प्रीमिओ सान्तान्देर डी'इटालिया इटालियन ग्रांप्री अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा मोंझा सप्टेंबर १४ १४:०० १२:००
१५ सिंगापूर सिंगटेल सिंगापूर ग्रांप्री सिंगापूर ग्रांप्री मरीना बे स्ट्रीट सर्किट सिंगापूर सप्टेंबर २८ २०:०० १२:००
१६ जपान फुजी टेलेविजन जपान ग्रांप्री जपान ग्रांप्री फुजी स्पीडवे ओयामा ऑक्टोबर १२ १३:३० ०४:३०
१७ चीन सिनोपेक चिनी ग्रांप्री चिनी ग्रांप्री शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट शांघाय ऑक्टोबर १९ १५:०० ०७:००
१८ ब्राझील ग्रांडे प्रीमियो दो ब्राझिल ब्राझिलियन ग्रांप्री अटोड्रोम जोस कार्लोस पेस साओ पाउलो नोव्हेंबर २ १४:०० १६:००

हंगामाचे निकाल[संपादन]

ग्रांप्री[संपादन]

शर्यत क्र. ग्रांप्री पोल पोझिशन जलद फेरी विजेता चालक विजेता कारनिर्माता माहिती
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियन ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन फिनलंड हेइक्कि कोवालायनन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम मॅक्लरीन-मर्सिडीज माहिती
मलेशिया मलेशियन ग्रांप्री ब्राझील फिलिपे मास्सा जर्मनी निक हाइडफेल्ड फिनलंड किमी रायकोन्नेन इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
बहरैन बहरैन ग्रांप्री पोलंड रोबेर्ट कुबिचा फिनलंड हेइक्कि कोवालायनन ब्राझील फिलिपे मास्सा इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
स्पेन स्पॅनिश ग्रांप्री फिनलंड किमी रायकोन्नेन फिनलंड किमी रायकोन्नेन फिनलंड किमी रायकोन्नेन इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
तुर्कस्तान तुर्किश ग्रांप्री ब्राझील फिलिपे मास्सा फिनलंड किमी रायकोन्नेन ब्राझील फिलिपे मास्सा इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
मोनॅको मोनॅको ग्रांप्री ब्राझील फिलिपे मास्सा फिनलंड किमी रायकोन्नेन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम मॅक्लरीन-मर्सिडीज माहिती
कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन फिनलंड किमी रायकोन्नेन पोलंड रोबेर्ट कुबिचा जर्मनी बी.एम.डब्ल्यू. सौबर माहिती
फ्रान्स फ्रेंच ग्रांप्री फिनलंड किमी रायकोन्नेन फिनलंड किमी रायकोन्नेन ब्राझील फिलिपे मास्सा इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
युनायटेड किंग्डम ब्रिटिश ग्रांप्री फिनलंड हेइक्कि कोवालायनन फिनलंड किमी रायकोन्नेन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम मॅक्लरीन-मर्सिडीज माहिती
१० जर्मनी जर्मन ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी निक हाइडफेल्ड युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम मॅक्लरीन-मर्सिडीज माहिती
११ हंगेरी हंगेरीयन ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन फिनलंड किमी रायकोन्नेन फिनलंड हेइक्कि कोवालायनन युनायटेड किंग्डम मॅक्लरीन-मर्सिडीज माहिती
१२ युरोप युरोपियन ग्रांप्री ब्राझील फिलिपे मास्सा ब्राझील फिलिपे मास्सा ब्राझील फिलिपे मास्सा इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१३ बेल्जियम बेल्जियम ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन फिनलंड किमी रायकोन्नेन ब्राझील फिलिपे मास्सा इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१४ इटली इटालियन ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल फिनलंड किमी रायकोन्नेन जर्मनी सेबास्टियान फेटेल इटली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी माहिती
१५ सिंगापूर सिंगापूर ग्रांप्री ब्राझील फिलिपे मास्सा फिनलंड किमी रायकोन्नेन स्पेन फर्नांदो अलोन्सो फ्रान्स रेनोल्ट एफ१ माहिती
१६ जपान जपान ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ब्राझील फिलिपे मास्सा स्पेन फर्नांदो अलोन्सो फ्रान्स रेनोल्ट एफ१ माहिती
१७ चीन चायनीज ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम मॅक्लरीन-मर्सिडीज माहिती
१८ ब्राझील ब्राझिलियन ग्रांप्री ब्राझील फिलिपे मास्सा ब्राझील फिलिपे मास्सा ब्राझील फिलिपे मास्सा इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती

चालक[संपादन]

क्र. चालक ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
बहरैन
बहरैन
स्पॅनिश
स्पेन
तुर्की
तुर्कस्तान
मोनॅको
मोनॅको
कॅनेडी
कॅनडा
फ्रेंच
फ्रान्स
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
युरोपि
युरोप
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
चिनी
चीन
ब्राझि
ब्राझील
गुण
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन १३ मा. १० १२ ९८
ब्राझील फिलिपे मास्सा मा. मा. १३ १७ १३ ९७
फिनलंड किमी रायकोन्नेन मा. मा. १८ १५ ७५
पोलंड रोबेर्ट कुबिचा मा. मा. ११ ११ ७५
स्पेन फर्नांदो अलोन्सो १० मा. १० मा. ११ मा. ६१
जर्मनी निक हाइडफेल्ड १४ १३ १० १० ६०
फिनलंड हेइक्कि कोवालायनन मा. १२ १० १० मा. मा. ५३
जर्मनी सेबास्टियान फेटेल मा. मा. मा. मा. १७ १२ मा. मा. ३५
इटली यार्नो त्रुल्ली मा. १० १३ १६ १३ मा. मा. ३१
१० जर्मनी टिमो ग्लोक मा. मा. ११ १३ १२ ११ १२ मा. ११ मा. २५
११ ऑस्ट्रेलिया मार्क वेबर मा. १२ १० मा. १२ मा. १४ २१
१२ ब्राझील नेल्सन आंगेलो पीके मा. ११ मा. मा. १५ मा. मा. मा. ११ मा. १० मा. मा. १९
१३ जर्मनी निको रॉसबर्ग १४ मा. मा. १० १६ १० १४ १२ १४ ११ १५ १२ १७
१४ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो अ.घो. १३ ११ मा. १४ १४ मा. १६ १६ मा. १७ मा. १३ ११ १५ ११
१५ जपान काझुकी नाकाजिमा १७ १४ मा. मा. १५ १४ १३ १५ १४ १२ १५ १२ १७
१६ युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड मा. १८ १२ मा. मा. १३ ११ १७ ११ १६ मा. १० मा.
१७ फ्रान्स सेबास्तिआं बूर्दे मा. १५ मा. मा. मा. १३ १७ ११ १२ १८ १० १८ १२ १० १३ १४
१८ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मा. १० मा. ११ ११ ११ मा. मा. १७ १२ १३ १५ १५ १४ १६ १३
१९ इटली ज्यांकार्लो फिजिकेल्ला मा. १२ १२ १० मा. मा. मा. १८ मा. १६ १५ १४ १७ मा. १४ मा. १७ १८
२० जर्मनी आद्रियान सुटिल मा. मा. १९ मा. १६ मा. मा. १९ मा. १५ मा. मा. १३ १९ मा. मा. मा. १६
२१ जपान ताकुमा सातो मा. १६ १७ १३
२२ युनायटेड किंग्डम अँथनी डेविडसन मा. १५ १६ मा.
क्र. चालक ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
बहरैन
बहरैन
स्पॅनिश
स्पेन
तुर्की
तुर्कस्तान
मोनॅको
मोनॅको
कॅनेडी
कॅनडा
फ्रेंच
फ्रान्स
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
युरोपि
युरोप
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
चिनी
चीन
ब्राझि
ब्राझील
गुण

† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

 • Bold - Pole
 • Italics - Fastest Lap
रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल
सुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पुर्ण, गुण मिळाले निळा पुर्ण, गुणांशिवाय
निळा पुर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपुर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)
पांढरा सुरवात नाही (सु.ना.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) रिक्त जखमी (जख.)
रिक्त वर्जीत (वर्जी.) रिक्त प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) रिक्त हाजर नाही (हा.ना.) रिक्त हंगामातुन माघार (हं.मा.) रिक्त स्पर्धा रद्द (स्प.र.)

कारनिर्माते[संपादन]

क्र. कारनिर्माता गाडी क्र. ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
बहरैन
बहरैन
स्पॅनिश
स्पेन
तुर्किश
तुर्कस्तान
मोनॅको
मोनॅको
कॅनेडी
कॅनडा
फ्रेंच
फ्रान्स
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरी
हंगेरी
युरोपि
युरोप
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
चिनी
चीन
ब्राझि
ब्राझील
गुण
इटली स्कुदेरिआ फेरारी मा. मा. १८ १५ १७२
मा. मा. १३ १७ १३
युनायटेड किंग्डम मॅक्लरीन-मर्सिडिज २२ १३ मा. १० १२ १५१
२३ मा. १२ १० १० मा. मा.
जर्मनी बी.एम.डब्ल्यू. सौबर १४ १३ १० १० १३५
मा. मा. ११ ११
फ्रान्स रेनोल्ट एफ१ १० मा. १० मा. ११ मा. ८०
मा. ११ मा. मा. १५ मा. मा. मा. ११ मा. १० मा. मा.
जपान टोयोटा एफ१ ११ मा. १० १३ १६ ११ मा. मा. ५६
१२ मा. मा. ११ १३ १२ ११ १२ मा. १३ मा.
इटली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १४ मा. १५ मा. मा. मा. १३ १७ ११ १२ १८ १० १८ १२ १० १३ १४ ३९
१५ मा. मा. मा. मा. १७ १२ मा. मा.
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ मा. १८ १२ मा. मा. १३ ११ १७ ११ १६ मा. १० मा. २९
१० मा. १२ १० मा. १२ मा. १४
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-टोयोटा रेसिंग १४ मा. मा. १० १६ १० १४ १२ १४ ११ १५ १२ २६
१७ १४ मा. मा. १५ १४ १३ १५ १४ १२ १५ १२ १७
जपान होंडा रेसिंग एफ१ १६ मा. १० मा. ११ ११ ११ मा. मा. १७ १२ १३ १५ १५ १४ १६ १३ १४
१७ अ.घो. १३ ११ मा. १४ १४ मा. १६ १६ मा. १७ मा. १३ ११ १५
१० भारत फोर्स इंडिया-स्कुदेरिआ फेरारी २० मा. मा. १९ मा. १६ मा. मा. १९ मा. १५ मा. मा. १३ १९ मा. मा. मा. १६
२१ मा. १२ १२ १० मा. मा. मा. १८ मा. १६ १५ १४ १७ मा. १४ मा. १७ १८
११ जपान सुपर आगुरी एफ१-होंडा रेसिंग एफ१ १८ मा. १६ १७ १३ WD
१९ मा. १५ १६ मा. WD
क्र. कारनिर्माता गाडी क्र. ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
बहरैन
बहरैन
स्पॅनिश
स्पेन
तुर्किश
तुर्कस्तान
मोनॅको
मोनॅको
कॅनेडी
कॅनडा
फ्रेंच
फ्रान्स
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरी
हंगेरी
युरोपि
युरोप
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
चिनी
चीन
ब्राझि
ब्राझील
गुण

† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

 • Bold - Pole
 • Italics - Fastest Lap
रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल
सुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पुर्ण, गुण मिळाले निळा पुर्ण, गुणांशिवाय
निळा पुर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपुर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)
पांढरा सुरवात नाही (सु.ना.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) रिक्त जखमी (जख.)
रिक्त वर्जीत (वर्जी.) रिक्त प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) रिक्त हाजर नाही (हा.ना.) रिक्त हंगामातुन माघार (हं.मा.) रिक्त स्पर्धा रद्द (स्प.र.)

हेसुद्धा पाहा[संपादन]

 1. फॉर्म्युला वन
 2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
 3. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
 4. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
 5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ[संपादन]

 1. २००८ फॉर्म्युला वन हंगामचे अजिंक्यपद वर्गवारी
 2. "लुइस हॅमिल्टन सर्वात लहान वयात अजिंक्यपद जिंकणारा या पदवीच्या मानकरी", हेराल्ड सन डोट सीओ डोट एयु, २००८-११-०३. 
 3. "स्पेन येथे २००८ फॉर्म्युला वन हंगामाची सुरवात", फॉर्म्युला वन, २००८-०१-१४. 
 4. "वॅलेन्सिया पहिला दिवस - अलोन्सोचा पुढाकार", फॉर्म्युला वन, २००८-०१-२२. 
 5. "बार्सिलोना येथे पहिला दिवस - हॅमिल्टनने बनवले आदर्श", फॉर्म्युला वन, २००८-०२-०२. 
 6. "बहरैन येथे पहिल्या दिवस - फेरारी पहिल्या व दुसर्या क्रमांकावर", फॉर्म्युला वन, २००८-०२-०४. 
 7. "जेरेझ येथे पहिला दिवस - स्पेन येथे रेड बुलची विलियम्स वर आघाडी", फॉर्म्युला वन, २००८-०२-१२. 
 8. "जेरेझ येथे दुसरा दिवस – मॅक्लरीनची जबरदस्त सुरवात", फॉर्म्युला वन, २००८-०२-१३. 
 9. "बार्सिलोना पहिला दिवस - रॉसबर्गने पावसात बनवले नवीन आदर्श", फॉर्म्युला वन, २००८-०२-२०. 
 10. १०.० १०.१ १०.२ "२००८ फॉर्म्युला वन हंगामात भाग घेतलेले संघ", फॉर्म्युला वन डॉट कॉम, २००८-०१-०४. 
 11. "Ferrari unveil the F2008". 
 12. "Ferrari confirm Räikkönen, Massa for ‘07". 
 13. १३.० १३.१ Ferrari Team Profile.
 14. "Michael Schumacher to test drive for Ferrari". 
 15. "Ferrari extend Massa's contract to 2010". 
 16. "F1.08 a 'radical evolution', says Rampf". 
 17. १७.० १७.१ "BMW Sauber retain Heidfeld and Kubica for 2008". 
 18. १८.० १८.१ "Klien and Asmer join BMW Sauber as test drivers". 
 19. "R28 designed for optimum tyre performance". 
 20. "Alonso to partner Piquet at Renault for 2008". 
 21. "Di Grassi named third driver at Renault".  [मृत दुवा]
 22. "Romain Grosjean looks forward".  [मृत दुवा]
 23. "Renault signs Yamamoto as test driver". 
 24. "New Williams breaks cover in Spain". 
 25. "टोयोटा engines for Williams in 2007".  [मृत दुवा]
 26. २६.० २६.१ "Williams confirm Rosberg, Nakajima for 2008". 
 27. "Hülkenberg confirmed as Williams tester for 2008". 
 28. "Red Bull debut the RB4 at Jerez". 
 29. "Red Bull confirm Coulthard for 2008". 
 30. "Buemi confirmed as Red Bull test and reserve driver". 
 31. "Webber aims to improve on 2007". 
 32. "Longer wheelbase, new aero concept for latest टोयोटा". 
 33. "Trulli commits to टोयोटा future". 
 34. "Kobayashi announced as टोयोटा third driver". 
 35. "Glock to race for टोयोटा in 2008". 
 36. "Vettel: Starting ’08 with ’07 car has advantages". 
 37. "New Toro Rosso hits the track in Spain". 
 38. "Bourdais secures 2008 Toro Rosso seat". 
 39. "Hartley  – I'm Toro Rosso test driver". 
 40. "Vettel to stay at Toro Rosso for 2008". 
 41. "Honda targeting points at every race". 
 42. "Honda keep Button & Barrichello". 
 43. "Wurz signs to Honda as test and reserve driver". 
 44. "Davidson returns for Barcelona test". 
 45. "Driver Profiles". 
 46. "Filippi still seeking Formula 1 drive". 
 47. "Barrichello staying with Honda for 2008". 
 48. "February launch for new Super Aguri". 
 49. "Force India usher in a new era at Mumbai launch". 
 50. "Exclusive interview – Spyker's Dr Vijay Mallya". 
 51. ५१.० ५१.१ ५१.२ "Fisichella, Sutil, Liuzzi confirmed at Force India". 
 52. "McLaren launch the MP4-23 in Stuttgart". 
 53. "Hamilton commits to McLaren until 2012". 
 54. ५४.० ५४.१ "Kovalainen confirmed at McLaren". 
 55. "Kovalainen to partner Hamilton at McLaren for 2008". 
 56. "मायक्रोसॉफ्ट व मॅकलारेन इलेक्ट्रॉनिक सिस्टिमसने इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटचे पुरवठा करण्याचे आश्वासन दिले.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २००६-१२-११. 
 57. "ट्रॅक्शन कंट्रोल २००८ फॉर्म्युला वन हंगामात प्रतिबंधीत", फॉर्म्युला वन डॉट कॉम, २००७-०३-३०. 
 58. "इंजिनमध्ये बदल करण्यास प्रतिबंध ५ वर्ष करण्यात आला.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २००८-०१-१३. 
 59. "सर्व संघानी इंजिन बदल्यावर लागु होणाऱ्या दंडाच्या नियमाचे बद्दल झाल्याचे समर्थन केले.", आय.टि.व्हि-एफ.वन डॉट कॉम, २००८-०१-१८. 
 60. "२००८ फॉर्म्युला वन हंगामातील नियमातील बदल.", फॉर्म्युला वन डॉट कॉम, २००८-०१-१८. 
 61. ६१.० ६१.१ ६१.२ "२००८ फॉर्म्युला वन हंगामातील नवीन नियम.", एफवानकंप्लिट डॉट कॉम, २००८-०३-०९. 
 62. "२००८ फॉर्म्युला वन हंगामात चालकाच्या बैठकीच्या जागेचे संरक्षण वाढणार", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २००७-०९-२६. 
 63. "फक्त ब्रिजस्टोन हे टायर पुरवठा करण्यास नेमले गेले.", फॉर्म्युला वन डॉट कॉम, २००७-०७-०६. 
 64. "ब्रिजस्टोन अत्यंत ओल्या हवामानासाठी उपयुक्त असे टायरांवर सफेद रंगाची रेष आखतील.", फॉर्म्युला वन डॉट कॉम, २००८-०७-०३. 
 65. "सुपर आगुरी एफ१च्या मागारा नंतर, मुख्य शर्यतीसाठीची पात्रता पधती बदलण्यात आली.", आय.टि.व्ही-एफ.१ डॉट कॉम, २००८-०५-०८. 
 66. "स्पायकर एफ१चे नवीन मालक", फॉर्म्युला वन डोट कॉम, २००७-०५-१०. 
 67. "प्रोड्राइव्ह एफ१हा २००८ फॉर्म्युला वन हंगामाचा १२व संघ", फॉर्म्युला वन डोट कॉम, २००६-०४-२८. 
 68. "प्रोड्राइव्ह एफ१ २००८ हंगामात भाग नाही घेणार.", फॉर्म्युला वन डोट कॉम, २००७-११-२३. 
 69. "सुपर आगुरी एफ१ने ३० नोकर्‍या कमी केल्या.", ऑटोस्पोर्ट डॉट कॉम, २००७-११-२०. 
 70. "एका भारतीय कंपनीचा सुपर आगुरी एफ१ला विकत घेण्याचा प्रस्ताव", ऑटोस्पोर्ट डॉट कॉम, २००८-०१-३१. 
 71. "ताकुमा सातो आणि अँथनी डेविडसनची जागा अजून पक्की नाही.", ऑटोस्पोर्ट डॉट कॉम, २००८-०१-०४. 
 72. "सुपर आगुरी एफ१ने २००८ फॉर्म्युला वन हंगामासाठी नविन भागिदर व चालक जाहीर केले", सुपर आगुरी एफ१ अधिक्रुत संकेतस्थळ, २००८-०३-१०. 
 73. "सुपर आगुरी एफ१ने फॉर्म्युला वन मधुन माघार घेतली", ऑटोस्पोर्ट डॉट कॉम, २००८-०५-०६. 
 74. "सिंगापूर येथे २००८ हंगामातील रात्री चालणारी शर्यत", फॉर्म्युला वन डोट कॉम, २००७-०५-११. 
 75. "सिंगापूर ग्रांप्रीसाठी सराव आणि पात्रता फेर्‍या रात्री चालणार.", फॉर्म्युला वन डोट कॉम, २००८-०१-३१. 
 76. "इंडियानापोलिस २००८ फॉर्म्युला वन हंगामात अमेरिकन ग्रांप्री नाही आयोजीत करणार.", ऑटोस्पोर्ट डॉट कॉम. 
 77. "फ्रेंच ग्रांप्री संकटात", आय.टि.व्ही-एफ.१ डॉट कॉम, २००७-०३-२७. 
 78. फ्रेंच ग्रांप्री सर्किट डी नेवेर्स मॅग्नी-कौर्स येथेच आयोजीत होणार.

बाह्य दुवे[संपादन]

 1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ