सेबास्टियान फेटेलने ३९७ गुणांसोबत २०१३ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक मिळवुन सलग चौथ्या वर्षी अजिंक्यपद पटकावले.फर्नांदो अलोन्सो, २४२ गुणांसोबत २०१३ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.मार्क वेबर, १९९ गुणांसोबत २०१३ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक. मार्क वेबरचे हे शेवटचे वर्ष होते.
२०१३ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए.फॉर्म्युला वन शर्यतीचा ६४वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १९ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात ११ संघांच्या एकूण २३ चालकांनी सहभाग घेतला. १७ मार्च २०१३ रोजी ऑस्ट्रेलिया मध्ये पहिली तर २४ नोव्हेंबर रोजी ब्राझील मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.
२०१३ फॉर्म्युला वन हंगामात एकुन ११ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २०१३ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१३ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१३ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.[१]
खालिल रचना वापरून प्रत्येक शर्यतीत पहिल्या दहा वर्गीकृत चालकांना असे गुण दिले जातात:
निकालातील स्थान
१ला
२रा
३रा
४था
५वा
६वा
७वा
८वा
९वा
१०वा
गुण
२५
१८
१५
१२
१०
८
६
४
२
१
पूर्ण गुण प्रदान करण्यासाठी, शर्यत विजेत्याने नियोजित शर्यतीच्या किमान अंतराच्या ७५% पूर्ण करणे आवश्यक आहे. शर्यत विजेत्याने शर्यतीच्या ७५% पेक्षा कमी अंतर पूर्ण केल्यास, जर किमान दोन पूर्ण फेऱ्या असतील तर त्याला १/२ गुण प्रदान करण्यात येतील.[note १] शर्यतीच्या समारोपानंतर जर टाय झाल्यास, "काऊंट-बॅक" प्रणालीचा वापर करून टायब्रेकर करण्यात येतो, ज्या मध्ये चालकाच्या सर्वात उत्तम निकाल लक्षात घेउन, गुण दिले जातात.[note २]
^जर शर्यतीत दोन फेऱ्या पूर्ण केल्या जाऊ शकत नाहीत अशा घटनेत कोणतेही गुण दिले जात नाहीत आणि शर्यत रद्द केली जाते.[३३]
^जर दोन किंवा अधिक चालकांना अथवा कारनिर्मात्यांना "सर्वात उत्तम निकाल" प्रणालीप्रमाणे जर समान गुण, समान वेळेस मिळाले तर त्यांचा पुढील उत्तम निकाल वापरला जाईल. पुढे जर या प्रणालीमुळे जर दोन किंवा अधिक चालकांना अथवा कारनिर्मात्यांना जर समान गुण, समान वेळेस मिळाले तर एफआयए योग्य ठरेल अशा निकषांनुसार विजेता नामांकीत करेल.[३३]