सेबास्टियान फेटेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सेबास्टियान फेटेल
Sebastian Vettel 2012 Bahrain GP.jpg
जन्म ३ जुलै, १९८७ (1987-07-03) (वय: ३०)
हेप्पनहाइम, हेसेन, पश्चिम जर्मनी
फॉर्म्युला वन अजिंक्यपद कारकीर्द
राष्ट्रीयत्व जर्मनी ध्वज जर्मनी
२०१४ संघ रेड बुल-रेनो
२०१४ कार क्रमांक 1
स्पर्धा १२०
अजिंक्यपदे ४ (२०१०, २०११, २०१२, २०१३)
विजय ३९
पोडियम ६२
Career points १,४५१
पोल पोझिशन ४५
सर्वात जलद फेऱ्या २२
पहिली शर्यत २००७ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री
पहिला विजय २००८ इटालियन ग्रांप्री
अखेरची विजय २०१२ भारतीय ग्रांप्री
अखेरची शर्यत २०१३ ब्राझिलियन ग्रांप्री
२०१३ स्थान पहिला (३९७ गूण)

सेबास्टियान फेटेल‎ (जर्मन: Sebastian Vettel ; जर्मन उच्चारण: zeˈbasti̯an ˈfɛtəl) (३ जुलै, इ.स. १९८७ ; हेपेनहाइम, हेसेन, पश्चिम जर्मनी - हयात) हा फॉर्म्युला वन शर्यतींमधील चालक आहे. सध्या (इ.स. २०११) रेड बुल रेसिंग संघाचा चालक व २०१०, २०११, २०१२२०१३ ह्या सलग चार हंगामांचा विजेता आहे. २००९ च्या मोसमात सेबास्टियान फेटेल ने आपल्या फॉर्म्युला वन कारकिर्दीची सुरवात केली. रेड बुल रेसिंग संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाच्या दौडीत दुसऱ्या स्थानापर्यंत झेप घेतली. असे करणारा तो सर्वात कमी वयाचा चालक ठरला. तसेच रेड बुल संघासाठी त्यांचे पहिले पोल स्थान आणि पहिला शर्यत विजय हि मिळवला. त्यानंतर च्या मोसमातच सर्वात कमी वयाचा फॉर्म्युला वन विश्व विजेता चालक बनण्याचा मान त्याने पटकावला. पहिल्या अजिंक्यपदानंतर २०११, २०१२ व २०१३ च्या मोसमात त्याने पुन्हा फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाला गवसणी घातली.

व्यक्तिगत जीवन[संपादन]

सेबास्टियान फेटेल चा जन्म पश्चिम जर्मनीतील हेपेनहाइम या शहरात झाला. सेबास्टियान ला एक लहान भाऊ, फाबिआन आणि दोन मोठया बहिणी मेलनी आणि स्टेफनी आहेत.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: