मिखाएल शुमाखर, १४८ गुणांसोबत २००४ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.रुबेन्स बॅरीकेलो, ११४ गुणांसोबत २००४ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.जेन्सन बटन, ८५ गुणांसोबत २००४ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.
२००४ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए.फॉर्म्युला वन शर्यतीचा ५८वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १८ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १० संघांच्या एकूण २१ चालकांनी सहभाग घेतला. ७ मार्च २००४ रोजी ऑस्ट्रेलियामध्ये पहिली तर २४ ऑक्टोबर रोजी ब्राझील मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.
२००४ फॉर्म्युला वन हंगामात एकुन १० संघांनी भाग घेतला. खालील यादीत २००४ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २००४ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २००४ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.