ऑस्ट्रेलियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
मेलबर्न ग्रांप्री सर्किट, मेलबर्न
Albert Lake Park Street Circuit in Melbourne, Australia.svg
शर्यत माहिती
फेऱ्या ५८
सर्किटची लांबी ५.३०३ किमी (३.२९५ मैल)
शर्यत लांबी ३०७.५७४ किमी (१९१.११८ मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती ७६
पहिली शर्यत १९२८
शेवटची शर्यत २०१२
सर्वाधिक विजय (चालक) जर्मनी मायकेल शुमाकर (४)
सर्वाधिक विजय (संघ) इटली फेर्रारी (१०)

ऑस्ट्रेलियन ग्रांप्री (इंग्लिश: Australian Grand Prix) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत ऑस्ट्रेलिया देशाच्या मेलबर्न शहरामधील मेलबर्न ग्रांप्री सर्किट ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.

१९२८ सालापासून सलग खेळवण्यात आलेली ही शर्यत फॉर्म्युला वनमध्ये १९८५ सालापासून समाविष्ट करण्यात आली. १९८५ ते १९९५ दरम्यान ही शर्यत साउथ ऑस्ट्रेलियामधील ॲडलेड शहरामध्ये खेळवली जात असे. १९९६ सालापासून ऑस्ट्रेलियन ग्रांप्री मेलबर्नमध्येच आहे.


बाह्य दुवे[संपादन]