Jump to content

अठरावी लोकसभा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(१८ वी लोकसभा या पानावरून पुनर्निर्देशित)
भारताची लोकसभा
भारताची अठरावी लोकसभा
प्रकार
प्रकार द्विसभागीय राष्ट्रीय विधिमंडळ
इतिहास
नेते
अध्यक्ष ओम श्रीकृष्ण बिर्ला, भारतीय जनता पक्ष
(२६ जून २०२४ पासून)
उपाध्यक्ष रिक्त (२६ जून २०२४ पासून),
सभागृह नेता
(पंतप्रधान)
नरेंद्र दामोदरदास मोदी, भारतीय जनता पक्ष
(२६ जून २०२४ पासून)
विरोधी पक्षनेता राहुल राजीव गांधी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
(२६ जून २०२४ पासून)
संरचना
सदस्य ५४३
निवडणूक
मागील निवडणूक २०१९
बैठक ठिकाण
संसद भवन, नवी दिल्ली, भारत
संकेतस्थळ
लोकसभा संकेतस्थळ
तळटिपा

भारताच्या कनिष्ठ सभागृहाचा नवीन कार्यकाळ (२०२४ ते २०२९) अर्थात १८वी लोकसभा २०२४ लोकसभा निवडणुकीद्वारे निर्मित झाली. १९ एप्रिल २०२४ ते १ जून २०२४ अश्या ७ चरणांमध्ये मतदान झाले व ४ जून २०२४ रोजी निकाल जाहीर झाले. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला २९३ जागांसह सभागृहात स्पष्ट बहुमत मिळाल्याने नरेंद्र दामोदरदास मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. असे करणारे मोदी हे पहिलेच काँग्रेसेतर पंतप्रधान आहेत. २६ जून २०२४ रोजी ओम बिर्ला हे सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष म्हणून निवडले गेले. तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांची विरोधीपक्षनेतेपदी निवड करण्यात आली.

निकाल जाहीर झाल्यानंतर निर्वाचित सदस्यांच्या शपथविधीसाठी भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय जनता पक्षाचे खासदार भर्तृहरी माहताब यांना लोकसभेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. १८व्या लोकसभा २४ जून २०२४ रोजी पहिल्यांदा बसली. पहिल्या दोन दिवशी सदस्यांचा केवळ शपथविधी पार पाडला. व तदनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही सभागृहांना आपल्या मंत्रीमंडळाची ओळख करून दिली.

१८व्या लोकसभेच्या दुसऱ्या अधिवेशनात गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहाच्या पटलावर आणलेल्या वक्फ दुरुस्ती विधेयक आणि मुसलमान वक्फ रद्द विधेयक या दोन विधेयकांमुळे प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या प्रचंड विरोधानंतर अखेर सरकारने ही दोन विधेयके संयुक्त संसदीय समितीकडे पाठवली. २०२४ च्या हिवाळी अधिवेशनादरम्यान समितीने अहवाल सादर करण्यासाठी आणखी वेळ वाढवून मिळावा या करता अर्ज दिला. तत्पश्चात सभागृहाने अहवाल सादर करण्यासाठी समितीस २०२५ अर्थसंकल्प अधिवेशनापर्यंतची मुदतवाढ दिली.

संख्याबळ

[संपादन]
आघाडी पक्ष सदस्य संख्या गटनेता मतदारसंघ
सरकार
राष्ट्रीय लोकशाही आघाडी

(२९३)

भारतीय जनता पक्ष २४० नरेंद्र दामोदरदास मोदी वाराणसी
तेलुगू देशम पक्ष १६ किंजरापू राममोहन नायडू श्रीकाकुलम
जनता दल (संयुक्त) १२ ललन सिंह मुंगेर
शिवसेना डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे कल्याण
लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) चिराग रामविलास पासवान हाजीपूर
जनता दल (धर्मनिरपेक्ष) हरदनहळ्ळी देवेगौडा कुमारस्वामी मंड्या
जन सेना पक्ष बालाशौरी वल्लभनेनी मछलीपट्टणम
राष्ट्रीय लोक दल डॉ. राजकुमार सांगवान बागपत
अपना दल (सोनेलाल) अनुप्रिया आशिष पटेल मिर्झापूर
आसाम गण परिषद फणीभूषण रमेश चौधरी बारपेटा
अखिल झारखंड विद्यार्थी संघ पक्ष चंद्र प्रकाश चौधरी गिरिडीह
हिंदुस्तानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) जितनराम रामजीत मांझी गया
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनील दत्तात्रय तटकरे रायगड
सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा डॉ. इंद्र सिंह सुब्बा सिक्कीम
संयुक्त जनता पक्ष, लिबरल जोयंता बसुमतरी कोक्राझार
विरोधी आघाडी
भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

(२३७)

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ९९ राहुल राजीव गांधी राय बरेली
समाजवादी पक्ष ३७ अखिलेश मुलायम यादव कन्नौज
अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस २८ सुदीप बंदोपाध्याय दक्षिण कोलकाता
द्रविड मुन्नेत्र कळघम २२ थलीकोट्टाई राजतेवर बालू श्रीपेरुंबुदुर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अरविंद गणपत सावंत दक्षिण मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार सुप्रिया सदानंद सुळे बारामती
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) अमरा राम सिकर
राष्ट्रीय जनता दल मिसा भारती शैलेशकुमार यादव जहानाबाद
आम आदमी पक्ष गुरमीत सिंह मीत हायर संगरुर
इंडियन युनियन मुस्लिम लीग ई.टी. मुहम्मद बशीर मलप्पुरम
झारखंड मुक्ति मोर्चा विजय कुमार हंसडक राजमहल
अपक्ष राजेश रंजन पप्पू यादव
मोहम्मद हनीफा
विशाल प्रकाश पाटील
पूर्णिया
लद्दाख
सांगली
भारतीय कम्युनिस्ट पक्ष के. सुब्बरायन तिरुप्पूर
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) लिबरेशन सुदामा प्रसाद अराह
जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स आगा सय्यद रुहुल्ला मेहदी श्रीनगर
विदुतलै चिरुतैगल कच्ची डॉ. थोलकप्पियान तिरुमावलवन चिदंबरम
भारत आदिवासी पक्ष राजकुमार शंकरलाल रौत बांसवाडा
केरळ काँग्रेस ॲड. फ्रान्सिस जॉर्ज कोट्टायम
मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम दुराई वायको तिरुचिरापल्ली
राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष ॲड. हनुमान रामदेव बेनिवाल नागौर
भारतीय क्रांतिकारी समाजवादी पक्ष ॲड. एन.के. प्रेमचंद्रन कोल्लम
आझाद समाज पक्ष (कांशी राम) ॲड. चंद्रशेखर गोवर्धनदास आझाद नगीना
इतर/तटस्थ गट

(१२)

युवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्ष पेद्दरेड्डी वेंकट मिधून रेड्डी राजमपेट
व्हॉइस ऑफ द पीपल पक्ष डॉ. रिकी अँड्र्यु सिंग्कॉन शिलाँग
शिरोमणी अकाली दल हरसिम्रत कौर बादल भटिंडा
अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ॲड. असदुद्दीन सलाहुद्दीन ओवैसी हैदराबाद
झोरम पीपल्स मूव्हमेंट रिचर्ड वानलालहमंगाइहा मिझोरम
अपक्ष उमेशभाई बाबूभाई पटेल
शेख अब्दुल रशीद
अमृतपाल सिंह
सरबजीतसिंह बियंतसिंह खालसा
दमण आणि दीव
बारामुल्ला
खदूर साहिब
फरीदकोट
रिक्त
(१)
एकूण ५४३

१८व्या लोकसभेसाठीच्या पोट-निवडणूक

[संपादन]
क्र. तारीख मतदारसंघ राज्य/कें.प्र. मूळ खासदार पक्ष पोट-निवडणूक कारण निर्वाचित खासदार पक्ष
१३ नोव्हेंबर २०२४ वायनाड केरळ राहुल राजीव गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राजीनामा प्रियंका रॉबर्ट वाड्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२० नोव्हेंबर २०२४ नांदेड महाराष्ट्र वसंत बळवंत चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस निधन रविंद्र वसंतराव चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अघोषित बशीरहाट पश्चिम बंगाल हाजी नुरुल इस्लाम अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस निधन अजून निवड झालेली नाही

१८व्या लोकसभेत पारीत झालेले कायदे

[संपादन]

१८व्या लोकसभेत पटलावर ठेवलेले विधेयके (पारित होणे बाकी)

[संपादन]
क्र. पटलावर ठेवल्याची तारिख विधेयकाचे नाव द्वारे मांडले विधेयक मांडणारा पक्ष विभाग/मंत्रालय विधेयकाचे उदिष्ट
२६ जुलै २०२४ राज्यघटना (दुरुस्ती) विधेयक, २०२४ ॲड. डीन कुरियाकोसे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिक्षण मंत्रालय राज्यघटनेत दुरुस्ती : नवीन अनुच्छेद ४९अ समाविष्ट करणे
२६ जुलै २०२४ राज्यघटना (दुरुस्ती) विधेयक, २०२४ डॉ. शशी चंद्रशेखर थरूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कायदा आणि न्याय मंत्रालय राज्यघटनेत दुरुस्ती : अनुच्छेद ८१ मध्ये दुरुस्त्या करणे
२६ जुलै २०२४ राज्यघटना (दुरुस्ती) विधेयक, २०२४ ॲड. राजीव प्रताप रुडी भारतीय जनता पक्ष पर्यावरण आणि वन मंत्रालय राज्यघटनेत दुरुस्ती : अनुच्छेद ४८अ आणि ५१अ मध्ये दुरुस्त्या करणे
२६ जुलै २०२४ राज्यघटना (दुरुस्ती) विधेयक, २०२४ रविंद्र श्यामनारायण शुक्ला भारतीय जनता पक्ष गृह मंत्रालय राज्यघटनेत दुरुस्ती : परिशिष्ठ ८ मध्ये दुरुस्ती करून भोजपुरी भाषा अधिकृत भाषा म्हणून समाविष्ट करणे
२६ जुलै २०२४ राज्यघटना (दुरुस्ती) विधेयक, २०२४ ॲड. डीन कुरियाकोसे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस श्रम मंत्रालय राज्यघटनेत दुरुस्ती : अनुच्छेद ४३अ मध्ये दुरुस्त्या करणे
२६ जुलै २०२४ वरिष्ठ माध्यमिक स्तरापर्यंत शाळांची स्थापना विधेयक, २०२४ ॲड. चंद्रशेखर गोवर्धनदास आझाद आझाद समाज पक्ष (कांशी राम) शिक्षण मंत्रालय वरिष्ठ माध्यमिक स्तरापर्यंत शाळांची स्थापना करून सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची तरतूद
२६ जुलै २०२४ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (दुरुस्ती) विधेयक, २०२४ शफी पारंबिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ग्रामीण विकास मंत्रालय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम, २००५ मध्ये दुरुस्ती करणे
२६ जुलै २०२४ विमान भाडे नियामक मंडळ विधेयक, २०२४ शफी पारंबिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नागरी उड्डाण मंत्रालय विमान भाडे निश्चिती व देखरेख करण्यासाठी नियामक मंडळाची स्थापना करणे
२६ जुलै २०२४ स्वमग्नता विस्तार विकार (ओळख आणि उपचार) विधेयक, २०२४ बेनी थॉमस बेहानन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आरोग्य मंत्रालय स्वमग्नता विस्तार विकाराचे रुग्णांवर लवकर व फायदेशीर उपचार पद्धती विकसित करणे
१० २६ जुलै २०२४ केंद्रीय शैक्षणिक संस्था (प्रवेश आरक्षण) (दुरुस्ती) विधेयक, २०२४ डॉ. निशिकांत दुबे भारतीय जनता पक्ष शिक्षण मंत्रालय केंद्रीय शैक्षणिक संस्था (प्रवेशातील आरक्षण) अधिनियम मध्ये दुरुस्त्या करणे
११ २६ जुलै २०२४ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (दुरुस्ती) विधेयक, २०२४ सी.एन. नटराजन अण्णादुराई द्रविड मुन्नेत्र कळघम ग्रामीण विकास मंत्रालय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम, २००५ मध्ये कलम ३ दुरुस्ती करणे
१२ २६ जुलै २०२४ पूर आणि दुष्काळ नियंत्रण विधेयक, २०२४ डॉ. आलोक जयश्रीराम सुमन जनता दल (संयुक्त) जलशक्ती मंत्रालय पूर/दुष्काळासंबंधी कामांसाठी राष्ट्रीय पूर आणि दुष्काळ नियंत्रण मंडळाची स्थापना करणे
१३ २६ जुलै २०२४ प्लॅस्टिक एकल वापर (नियंत्रण) विधेयक, २०२४ डॉ. निशिकांत दुबे भारतीय जनता पक्ष पर्यावरण आणि वन मंत्रालय सन २०२५ पर्यंत एकल वापर असलेल्या प्लॅस्टिकचा वापर बंद करण्यासाठी योजना
१४ २६ जुलै २०२४ कलाकार (सामाजिक सुरक्षा) विधेयक, २०२४ रविंद्र श्यामनारायण शुक्ला भारतीय जनता पक्ष संस्कृती मंत्रालय कलाकारांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय कलाकार सामाजिक सुरक्षा सल्लागार मंडळाची स्थापना करणे
१५ २६ जुलै २०२४ अधिवक्ता (दुरुस्ती) विधेयक, २०२४ डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे शिवसेना कायदा आणि न्याय मंत्रालय अधिवक्ता अधिनियम, १९६१ मध्ये दुरुस्त्या करणे
१६ २६ जुलै २०२४ तर्कशुद्ध विचार प्रसार विधेयक, २०२४ बेनी थॉमस बेहानन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिक्षण मंत्रालय तर्कसंगत विचार आणि विचारमंथनाला प्रोत्साहन देणारे वातावरण निर्माण करणे
१७ २६ जुलै २०२४ ग्रीनफील्ड पायाभूत सुविधा विकास मंडळ विधेयक, २०२४ ॲड. राजीव प्रताप रुडी भारतीय जनता पक्ष रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ग्रीनफील्ड पायाभूत सुविधा विकास मंडळाची स्थापना करणे
१८ २६ जुलै २०२४ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय (खाजगी क्षेत्र) आरक्षण विधेयक, २०२४ ॲड. चंद्रशेखर गोवर्धनदास आझाद आझाद समाज पक्ष (कांशी राम) सामाजिक न्याय मंत्रालय खाजगी क्षेत्रामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांना आरक्षण देणेबाबत
१९ २६ जुलै २०२४ बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क (दुरुस्ती) विधेयक, २०२४ डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे शिवसेना शिक्षण मंत्रालय बालके (मोफत व सक्तीचे) शिक्षण हक्क अधिनियम, २००९ मध्ये कलम २,३,८,११,२९ दुरुस्त्या करणे
२० २६ जुलै २०२४ बिहार राज्य विशेष वित्तीय सहाय्य विधेयक, २०२४ डॉ. आलोक जयश्रीराम सुमन जनता दल (संयुक्त) अर्थ मंत्रालय बिहारला राष्ट्रीय कोशागारमधून विशेष वित्तीय सहाय्य प्रदान करणेबाबत
२१ २६ जुलै २०२४ रेबीज नियंत्रण विधेयक, २०२४ ॲड. डीन कुरियाकोसे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आरोग्य मंत्रालय रेबीज आजारावर उपाययोजना व त्यासंबंधीच्या तरतूदी/शिक्षा
२२ २६ जुलै २०२४ माहिती तंत्रज्ञान उद्योग (नियमन आणि विकास) आयोग विधेयक, २०२४ सी.एन. नटराजन अण्णादुराई द्रविड मुन्नेत्र कळघम माहिती तंत्रज्ञान मंत्रालय माहिती तंत्रज्ञान उद्योग (नियमन आणि विकास) आयोग स्थापन करणेबाबत
२३ २६ जुलै २०२४ अनाथ बालक (कल्याण आणि विकास) विधेयक, २०२४ डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे शिवसेना महिला व बाल विकास मंत्रालय अनाथ बालकांच्या शिक्षण, पोषण, विकास संबंधी
२४ २६ जुलै २०२४ रेल्वे (दुरुस्ती) विधेयक, २०२४ डॉ. आलोक जयश्रीराम सुमन जनता दल (संयुक्त) रेल्वे मंत्रालय रेल्वे अधिनियम, १९८९ मध्ये नवीन कलम २४अ समाविष्ट करणे
२५ २६ जुलै २०२४ राज्यघटना (अनुसूचित जमाती) आदेश (दुरुस्ती) विधेयक, २०२४ सी.एन. नटराजन अण्णादुराई द्रविड मुन्नेत्र कळघम आदिवासी व्यवहार मंत्रालय राज्यघटना (अनुसूचित जमाती) आदेश, १९५० मधील परिशिष्ठ दुरुस्त करणेबाबत
२६ २६ जुलै २०२४ अतिवृष्टी, चक्रीवादळ व इतर कारणांमुळे आलेल्या पुराचे बळी (पुनर्वसन आणि कल्याण) विधेयक, २०२४ डॉ. निशिकांत दुबे भारतीय जनता पक्ष जलशक्ती मंत्रालय राष्ट्रीय पूर बळी पुनर्वसन आणि कल्याण मंडळाची स्थापना करणेबाबत
२७ २६ जुलै २०२४ पारंपारिक मच्छीमार (संरक्षण आणि कल्याण) विधेयक, २०२४ रविंद्र श्यामनारायण शुक्ला भारतीय जनता पक्ष मत्स्यव्यवसाय मंत्रालय पारंपारिक मच्छीमारांच्या बाबतीत राष्ट्रीय पारंपारिक मच्छीमार संरक्षण मंडळाची स्थापना करणेबाबत
२८ २६ जुलै २०२४ केरळ उच्च न्यायालय (तिरुवनंतपूरम खंडपीठ स्थापना) विधेयक, २०२४ डॉ. शशी चंद्रशेखर थरूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कायदा आणि न्याय मंत्रालय केरळ उच्च न्यायालयाचे तिरुवनंतपूरम येथे कायमस्वरुपी खंडपीठ स्थापन करणेबाबत
२९ २६ जुलै २०२४ तृतीयपंथी नागरिक (हक्क संरक्षण) (दुरुस्ती) विधेयक, २०२४ डॉ. शशी चंद्रशेखर थरूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय तृतीयपंथी नागरिक (हक्क संरक्षण) अधिनियम, २०१९ मध्ये नवीन कलमे ८अ आणि १३अ समाविष्ट करणेबाबत
३० २६ जुलै २०२४ जिल्हा विकास आणि संनियंत्रण समिती (केंद्रीय क्षेत्र आणि केंद्र पुरस्कृत योजना अंमलबजावणी) विधेयक, २०२४ ॲड. राजीव प्रताप रुडी भारतीय जनता पक्ष ग्रामीण विकास मंत्रालय प्रत्येक जिल्ह्यात केंद्र पुरस्कृत योजना अंमलबजावणीवर देखरेख करण्यासाठी समिती गठित करणेबाबत
३१ २६ जुलै २०२४ निवासी शाळा (अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती) विधेयक, २०२४ ॲड. चंद्रशेखर गोवर्धनदास आझाद आझाद समाज पक्ष (कांशी राम) शिक्षण मंत्रालय अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा स्थापनेबाबत
३२ १ ऑगस्ट २०२४ आपत्ती व्यवस्थापन (दुरुस्ती) विधेयक, २०२४ भारत सरकार गृह मंत्रालय गृह मंत्रालय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मध्ये दुरुस्ती करणेबाबत
३३ ५ ऑगस्ट २०२४ गोवा विधानसभा अनुसूचित जमाती प्रतिनिधित्व फेरनियोजन विधेयक, २०२४ भारत सरकार कायदा आणि न्याय मंत्रालय कायदा आणि न्याय मंत्रालय गोवा विधानसभा मधील अनुसूचित जमातींचे प्रतिनिधित्वाबाबत फेरनियोजन करणेबाबत
३४ ८ ऑगस्ट २०२४ वक्फ (दुरुस्ती) विधेयक, २०२४ भारत सरकार अल्पसंख्याक मंत्रालय अल्पसंख्याक मंत्रालय वक्फ अधिनियम, १९९५ मध्ये दुरुस्ती करणेबाबत
३५ ८ ऑगस्ट २०२४ मुसलमान वक्फ (रद्द करणे) विधेयक, २०२४ भारत सरकार अल्पसंख्याक मंत्रालय अल्पसंख्याक मंत्रालय मुसलमान वक्फ अधिनियम, १९२३ रद्द करणेबाबत
३६ ९ ऑगस्ट २०२४ राज्यघटना (दुरुस्ती) विधेयक, २०२४ ॲड. पी.पी. चौधरी भारतीय जनता पक्ष कायदा आणि न्याय मंत्रालय राज्यघटनेत दुरुस्ती : अनुच्छेद ५८ दुरुस्त करणे
३७ ९ ऑगस्ट २०२४ केरळ उच्च न्यायालय (पलक्कड खंडपीठ स्थापना) विधेयक, २०२४ व्ही.के. श्रीकांदन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कायदा आणि न्याय मंत्रालय केरळ उच्च न्यायालयाचे पलक्कड येथे कायमस्वरुपी खंडपीठ स्थापन करणेबाबत
३८ ९ ऑगस्ट २०२४ व्यावसायिक अभ्यासक्रम (प्रवेश परिक्षा बंदी) विधेयक, २०२४ कणी खदारमीरा नवस इंडियन युनियन मुस्लिम लीग शिक्षण मंत्रालय व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील प्रवेश परिक्षांवर बंदी आणणे
३९ ९ ऑगस्ट २०२४ राज्यघटना (दुरुस्ती) विधेयक, २०२४ ॲड. पी.पी. चौधरी भारतीय जनता पक्ष कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय राज्यघटनेत दुरुस्ती : परिशिष्ठ ७ दुरुस्त करणे
४० ९ ऑगस्ट २०२४ राष्ट्रीय युवा आयोग विधेयक, २०२४ स्मिता उदय वाघ भारतीय जनता पक्ष क्रीडा मंत्रालय युवकांसाठी शिक्षण आणि सक्षमीकरण कार्यक्रम राबवण्यासाठी युवक आयोग स्थापन करणे
४१ ९ ऑगस्ट २०२४ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (दुरुस्ती) विधेयक, २०२४ ॲड. एन.के. प्रेमचंद्रन भारतीय क्रांतिकारी समाजवादी पक्ष ग्रामीण विकास मंत्रालय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम, २००५ मध्ये कलम ३ आणि परिशिष्ठ २ दुरुस्त करणे
४२ ९ ऑगस्ट २०२४ सेंद्रिय शेती प्रोत्साहन विधेयक, २०२४ राजकुमार चहार भारतीय जनता पक्ष कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणेबाबत
४३ ९ ऑगस्ट २०२४ अनाथ (सरकारी पदांवर आरक्षण व कल्याण) विधेयक, २०२४ जनार्दन सिंह सिगरीवाल भारतीय जनता पक्ष सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय सरकारी पदांवर अनाथ नागरिकांना आरक्षण व कल्याणकारी योजना देणेबाबत
४४ ९ ऑगस्ट २०२४ अन्न सुरक्षा आणि मानके (दुरुस्ती) विधेयक, २०२४ काथीर आनंद द्रविड मुन्नेत्र कळघम आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, २००६ मध्ये दुरुस्ती करणे
४५ ९ ऑगस्ट २०२४ आयकर संग्रह (दृश्य प्रतिनिधित्व) विधेयक, २०२४ श्रीरंग चंदू 'अप्पा' बारणे शिवसेना अर्थ मंत्रालय देशातील आयकर संग्रहाचे पद्धतशीर विवरण देणेबाबत
४६ ९ ऑगस्ट २०२४ राज्यघटना (दुरुस्ती) विधेयक, २०२४ ॲड. मनीष विश्वनाथ तिवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस गृह मंत्रालय राज्यघटनेत दुरुस्ती : राज्यसभेमध्ये चंदिगढ केंद्रशासित प्रदेशामधून निर्वाचित खासदार पाठवणे बाबत
४७ ९ ऑगस्ट २०२४ राज्यघटना (दुरुस्ती) विधेयक, २०२४ ॲड. पी.पी. चौधरी भारतीय जनता पक्ष जलशक्ती मंत्रालय राज्यघटनेत दुरुस्ती : परिशिष्ठ ७ दुरुस्त करणे
४८ ९ ऑगस्ट २०२४ ग्रामीण श्रम कल्याण निधी विधेयक, २०२४ जनार्दन सिंह सिगरीवाल भारतीय जनता पक्ष श्रम व रोजगार मंत्रालय ग्रामीण कामगारांसाठी ग्रामीण श्रम कल्याण निधी गठित करणेबाबत
४९ ९ ऑगस्ट २०२४ अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (दुरुस्ती) विधेयक, २०२४ व्ही.के. श्रीकांदन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अधिनियम, १९५६ मध्ये नवीन कलम ३अ समाविष्ट करणे
५० ९ ऑगस्ट २०२४ तमिळनाडू राज्य (प्राचीन स्मारके, पुरातत्व स्थळे व अवशेष) विशेष आर्थिक सहाय्य विधेयक, २०२४ काथीर आनंद द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थ मंत्रालय तमिळनाडू राज्यातील प्राचीन स्मारके, पुरातत्व स्थळे व अवशेष यांच्या दुरुस्ती,देखभाल करिता राष्ट्रीय कोषागारातून विशेष वित्तीय सहाय्य प्रदान करणेबाबत

१८व्या लोकसभेत पटावर मांडलेली विधेयके (पारित होऊन राज्यसभेत प्रलंबित)

[संपादन]
क्र. पटलावर ठेवल्याची तारिख पारित केल्याची तारिख विधेयकाचे नाव द्वारे मांडले विधेयक मांडणारा पक्ष विभाग/मंत्रालय विधेयकाचे उदिष्ट
३१ जुलै २०२४ ९ ऑगस्ट २०२४ भारतीय वायुयान विधेयक, २०२४ भारत सरकार नागरी उड्डाण मंत्रालय नागरी उड्डाण मंत्रालय विमान निर्मिती,खरेदी-विक्री संबंधी

प्रथम १८व्या लोकसभेत पटलावर ठेवून पारित झालेले कायदे

[संपादन]
अधिनियम क्र. विधेयकाचे नाव द्वारे मांडले विधेयक मांडणारा पक्ष लोकसभा पारित तारिख राज्यसभा पारित तारिख राष्ट्रपतींची संमती राजपत्रात प्रकाशित
१३/२०२४ जम्मू आणि काश्मीर विनियोग (क्रमांक ३) अधिनियम, २०२४ भारत सरकार अर्थ मंत्रालय ३० जुलै २०२४ ८ ऑगस्ट २०२४ १३ ऑगस्ट २०२४ १३ ऑगस्ट २०२४
१४/२०२४ विनियोग (क्रमांक २) अधिनियम, २०२४ भारत सरकार अर्थ मंत्रालय ५ ऑगस्ट २०२४ ८ ऑगस्ट २०२४ १४ ऑगस्ट २०२४ १४ ऑगस्ट २०२४
१५/२०२४ अर्थ संकल्प अधिनियम, २०२४ भारत सरकार अर्थ मंत्रालय १४ ऑगस्ट २०२४ १५ ऑगस्ट २०२४ १६ ऑगस्ट २०२४ १६ ऑगस्ट २०२४

सदस्य

[संपादन]