भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
आघाडी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | political coalition, राजकीय युती | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
स्थापना |
| ||
| |||
भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी (इंग्रजी मध्ये: Indian National Developmental Inclusive Alliance I.N.D.I.A) किंवा इंडिया (ब्लॉक) ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखालील २७ भारतीय राजकीय पक्षांची एक मोठी राजकीय आघाडी आहे.[१] २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार पाडणे हे ह्या युतीचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.[२]
काही स्त्रोतांनी ह्या आघाडीच्या नावाच्या सूचनेचे श्रेय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे नेते राहुल गांधी यांना दिले आहे, [३] तर इतरांनी असे नमूद केले आहे की ते तृणमूल काँग्रेसच्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुचवले होते.[४]
इतिहास
[संपादन]पहिली बैठक: पाटणा, बिहार: एकतेसाठी समन्वय
[संपादन]पाटणा, बिहार येथे २३ जून २०२३ रोजी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांची पहिली बैठक झाली, जेव्हा नवीन युतीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या बैठकीला १६ विरोधी पक्ष उपस्थित होते. [५]
दुसरी बैठक: बेंगळुरू, कर्नाटक: औपचारिक स्थापना
[संपादन]बंगळूर, कर्नाटक येथे झालेल्या दुसऱ्या विरोधी पक्षांची बैठक यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली, जेव्हा युतीचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला आणि यादीत आणखी १० पक्ष जोडले गेले. युतीचे नाव निश्चित करण्यात आले आणि त्याला इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स असे नाव देण्यात आले.[६]
तिसरी बैठक: मुंबई, महाराष्ट्र: प्राथमिक योजना
[संपादन]३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२३ दरम्यान मुंबईत विरोधी पक्षांची तिसरी बैठक झाली. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते आणि सोनिया गांधी, राहुल गांधी आणि ५ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. दोन दिवसांच्या चर्चेमध्ये, युतीने आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रमुख निवडणूक मुद्द्यांवर चर्चा केली, समन्वय समिती तयार केली आणि २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुका 'शक्यतोपर्यंत' एकत्र लढण्यासाठी तीन कलमी ठराव मंजूर केला. [७] [८]
सदस्य पक्ष
[संपादन]युतीचे ४० सदस्य पक्ष आहेत: [९][१०]
संदर्भ
[संपादन]- ^ "Opposition names alliance INDIA in run-up to 2024 elections". The Economic Times (इंग्रजी भाषेत). 20 July 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 July 2023 रोजी पाहिले.
- ^ Hrishikesh, Cherylann Mollan & Sharanya (18 July 2023). "Opposition meeting: 26 Indian parties form alliance to take on PM Modi". BBC News. 20 July 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 July 2023 रोजी पाहिले.
- ^ Nair, Sobhana K. (18 July 2023). "Picking the name INDIA for alliance, Opposition parties frame 2024 battle as BJP vs the country". The Hindu. 21 July 2023 रोजी पाहिले.
- ^ Ghosh, Poulomi (19 July 2023). "'Who gave INDIA name? Who can't arrive at consensus…': BJP's dig 10 points". Hindustan Times. 21 July 2023 रोजी पाहिले.
- ^ "Tenets of unity: On the Opposition meet in Patna". The Hindu. 25 June 2023.
- ^ "Opposition alliance named 'INDIA', 11-member coordination committee to decide on all important issues". द टाइम्स ऑफ इंडिया. 2023-07-19. ISSN 0971-8257. 19 July 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-07-19 रोजी पाहिले.
- ^ "Live Updates: INDIA bloc forms 14-member coordination panel, says seat-sharing formula for 2024 Lok Sabha polls soon". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 1 September 2023.
- ^ "I.N.D.I.A Opposition bloc 2-day meet ends, resolution adopted, coordination committee formed". IndiaTV (इंग्रजी भाषेत). 1 September 2023.
- ^ "The 26 Opposition Parties That Have Formed Mega Alliance for 2024 Polls".
- ^ "The 26 Opposition Parties That Have Formed Mega Alliance For 2024 Polls". एनडीटीव्ही. 22 February 2019. 20 July 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 July 2023 रोजी पाहिले.