Jump to content

रेबीज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रेबीज
----
रेबीजची लागण झालेला कुत्रा

रेबीज हा उष्ण रक्ताचे प्राणी (विशेषतः की कुत्रा , ससा, माकड, मांजर इत्यादी) चावल्यानंतर होणारा रोग आहे. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास असे म्हणतात. रेबीज हा रोग झाल्यास तो प्राणघातक आहे. मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. रेबीज हा रोग कुत्र्यांनाही होतो. हा कुत्र्यांमुळे माणसात पसरणारा रोग आहे. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे ९० ते १७५ दिवसात दिसू लागतात. जंगलातले लांडगे जंगली कुत्र्यांना चावतात त्यामुळे जंगली कुत्र्यांना रेबीज होतो. ही जंगली कुत्री गावातल्या कुत्र्यांना चावतात त्यामुळे त्यांना हा रोग होतो. आणि अशी रेबीज झालेली कुत्री माणसास चावल्यास माणसाना हा रोग होतो. कुत्र्याच्या लाळेद्वारे या रोगाचा प्रसार होतो.

लक्षणे

[संपादन]
रेबीजचा पेशंट, १९५९

साधारणपणे २ ते १२ आठवडे ताप आणि तापाची लक्षणे दिसून येतात. मानसिक त्रास, निद्रानाश, भास होणे, सामान्य माणसासारखे न वागणे, अतिशयोक्ती करत वागणे अशी रोग्यात लक्षणे दिसून येतात. रेबीज झालेल्या माणसाला पाण्याची खूपच भीती वाटते. रेबीज झालेल्या माणसाचा घसा पूर्णपणे खरवडून निघतो व जेव्हा तो माणूस काही बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्वा घसा खरवडलेला असल्यामुळे कुत्र्याच्या भुंकण्याप्रमाणे आवाज येतो. वास्तविक कुत्रा चावला म्हणून असा आवाज येतो असे काही नाही. पण काही अशिक्षित माणसे असा विचार करून कुत्र्यांना मारतात.

उपचार

[संपादन]

प्राणी चावल्याने जखम झाल्यावर लवकरात लवकर साबण व स्वच्छ पाण्याने धुतल्यास जखमेतील रेबीजचे जंतू कमी होण्यास मदत होते. शक्य असल्यास त्यावर ॲंटिसेप्टिक मलम लावावे व त्वरित जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रेबीजवर पीईपी (पोस्ट एक्‍स्पोजर प्रोफायलॅक्सिस) ही प्रभावी लस उपलब्ध असून कुत्रे चावल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने ती टोचून घेणे योग्य आहे.

पेशंटने मानवी रेबीज इम्युनोग्लोबुलिनचा एक डोस व रेबीज लसीचे चार डोस १४ दिवसात घेतले पाहिजेत. रेबीज लसीचा पहिला डोस जखम झाल्यावर लवकरात लवकर दिला पाहिजे. त्यानंतर तीन, सात व चौदा दिवसांनी लसीचे डोस द्यावेत. ज्या पेशंटने जखम व्हायच्या आधीच लसीकरण घेतले असेल, त्याने इम्युनोग्लोबुलीनचा डोस नाही घेतला तरी चालतो. त्याने जखम झाल्यानंतरचे लसीकरण जखम झाल्यावर व दोन दिवसांनी घ्यावे. आजकाल पोटात घ्यायची इंजेक्शने देण्याची गरज नसून दंडावर देण्याचे इंजेक्शन उपलब्ध आहे.

पाळीव कुत्र्याचे रेबीजपासून संरक्षण

[संपादन]
  1. तीन महिन्यापेक्षा मोठ्या वयाच्या पाळीव कुत्र्याला दर सहा महिन्यांनी रेबीजची लस देणे आवश्यक असते.
  2. पाळीव कुत्र्याला कुठल्याही प्रकारे भटक्या कुत्र्यांच्या संपर्कात येऊ देणे धोक्याचे असते.
  3. कुत्र्यात वेगळे असे काही जाणवल्यास पशुवैद्यांशी संपर्क साधणे गरजेचे असते.
  4. भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यास त्यांची संततनियमन शस्त्रक्रिया करतात..
  5. वटवाघळांपासून आपल्या कुत्र्याला दूर ठेवल्यास रेबीजची लागण होण्याची शक्यता दुरावते.

कुत्र्यांमधील लक्षणे

[संपादन]

सतत लाळ गळणे, मलूल पडून राहणे, हालचालींवर ताबा नसणे, ताप येत राहणे, डोकेदुखी, निद्रानाश, पाण्याची भीती वाटणे, आणि नाकातून डोळ्यांतून आणि कानांतून पस तत्सम घाण पाणी बाहेर येणे आणि, उगाचच भुंकणे अथवा भुंकायचा प्रयत्न करणे ही रेबीज ह्या रोगाची लक्षणे आहेत.

प्राण्यातील आक्रमकता वाढणे

[संपादन]
मध्ययुगीन माणसे रेबीज झालेल्या कुत्र्याचा प्रतिकार करत आहेत.

रेबीजमध्ये प्राणी अस्वस्थ आणि बेचैन होतो, आवाज आणि उजेडाचा त्याच्यावर लवकर प्रभाव पडतो, तो तहानभूक सर्व विसरून जातो व कोणतीही वस्तू चावण्याचा प्रयत्न करतो. या रोगात प्राण्याची खूप लाळ गळते, त्याचे डोळे भयानक दिसतात, त्याला पाण्याची भीती वाटते, त्याला ताप येतो व तो कश्याही उड्या मारू लागतो. या प्रकारात प्राण्याला कधी कधी लकवा येतो व मानेचे स्नायू कडक होतात; प्राणी त्याचे शेपूट मागील दोन पायात घालून चालतो.

सुस्त प्रकार

[संपादन]

या प्रकारात प्राण्याला प्रथम मज्जारज्जूला आणि नंतर मेंदूलाही संसर्ग पोहोचतो. नंतर हृदय, फुफ्फुसे यांनापण संसर्ग होतो, अर्धांगवायु होतो, प्राण्याची शुद्ध हरपते व नंतर मृत्यू होतो.

रोग निदान

[संपादन]

प्राण्याच्या मेंदूच्या परीक्षणाद्वारे या रोगाचे निदान करता येते. त्यासाठी प्राण्याचे पाच ते दहा दिवस निरीक्षण करण्याची अत्यंत गरज असते.

रोगाचा प्रसार

[संपादन]
रेबीज मुक्त देश (हिरव्या रंगामध्ये)

रेबीज हा रोग कोणत्याही उष्ण रक्ताच्या प्राण्याला होऊ शकतो, उदा० माणूस. हा रोग पक्ष्यांमध्येसुद्धा आढळून आला आहे.
वटवाघळे , माकडे, कोल्हे, गाईगुरे, लांडगे, कुत्री, मुंगूस अशा काही प्राण्यांपासून माणसाला रेबीजचा धोका संभवतो. इतर जंगली प्राण्यांमुळे सुद्धा रेबीज होऊ शकतो.
खारी, hamsters, guinea pigs, उंदीर ह्या प्राण्यांमध्ये अगदी क्वचितच रेबीज आढळतो.
रेबीजचा जीवाणू प्राण्याच्या नसांमध्ये आणि लाळेत आढळतो. हा रोग बहुधा प्राण्याच्या चावण्यामुळे होतो. बऱ्याच वेळा प्राणी चिडून हल्ला करतो आणि चावा घेतो.
माणसांमधून रेबीजचा प्रसार फारच क्वचित होतो.

जागतिक रेबीज दिन

[संपादन]

जागतिक रेबीज दिन  ही आंतरराष्ट्रीय जागरूकता मोहीम ग्लोबल अलायन्स फॉर रेबीज कंट्रोल या संयुक्त संस्थेने सुरू केली  असून त्या संस्थेचे  मुख्यालय अमेरिकेमध्ये आहे[]. हे संयुक्त राष्ट्रांचे निरीक्षण आहे  आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अ‍ॅनिमल हेल्थ आणि यूएस सेंटर रोग नियंत्रण आणि प्रतिबंध यासारख्या आंतरराष्ट्रीय मानवी आणि पशुवैद्यकीय आरोग्य संस्थांनी त्याचे समर्थन केले आहे[]. जागतिक रेबीज दिन प्रत्येक वर्षी २८ सप्टेंबर रोजी लुई पाश्चरच्या मृत्यूच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केला जातो, ज्यांनी आपल्या सहकार्यांच्या सहकार्याने रेबीजची पहिली प्रभावी लस विकसित केली. जागतिक रेबीज डेचा उद्देश मानव आणि प्राण्यांवर रेबीजच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता वाढविणे, धोकादायक रोग कसा रोखता येईल याविषयी माहिती आणि सल्ला प्रदान करणे आणि रेबीज नियंत्रणातील वाढीव प्रयत्नांसाठी वकिलीचे समर्थन करणे हे आहे[].

पार्श्वभूमी

जगातील बऱ्याच देशांमध्ये रेबीज ही एक महत्त्वाची आरोग्य समस्या आहे. विकसनशील जगात सर्व मानवी मृत्यूंपैकी ९९% मृत्यू  रेबीड कुत्रा चावल्यामुळे होतात[], तर आफ्रिका आणि आशियात 95% मृत्यू होतात. अंटार्क्टिकाचा अपवाद वगळता प्रत्येक खंडातील लोक आणि प्राणी यांना रेबीजचा धोका संभवतो[].

रेबीज प्रतिबंधातील एक मोठी समस्या जोखीम असलेल्या लोकांमध्ये मूलभूत जीवन-रक्षण ज्ञानाचा अभाव ही आहे. या विषयावर काम करणाऱ्या संस्था बऱ्याचदा वेगळ्या वाटू शकतात आणि दुर्लक्षित रोग म्हणून, रेबीजकडे पुरेसे संसाधने आकर्षित होत नाहीत.

आरोग्य जागरूकता दिवस रोगांवरील धोरण सुधारित करण्यात मदत करतात  आणि प्रतिबंधित करण्यासाठी आणि त्यांची संसाधने वाढवू शकतात. या आकलनामुळे रेबीज विरुद्ध जागरूकता दिवस साजरा करण्यात येऊ लागला[].

  1. ^ NEL, L.H. (2018-08-01). "The role of non-governmental organisations in controlling rabies: the Global Alliance for Rabies Control, Partners for Rabies Prevention and the Blueprint for Rabies Prevention and Control". Revue Scientifique et Technique de l'OIE. 37 (2): 751–759. doi:10.20506/rst.37.2.2838. ISSN 0253-1933.
  2. ^ Downes, Kevin; Weiss, Scott; Klieger, Sarah B.; Fitzgerald, Julie; Balamuth, Fran; Kubis, Sherri; Tolomeo, Pam; Bilker, Warren; Han, Xiaoyan (2015). "Developing a Biomarker-Driven Algorithm to Improve Antibiotic Use in the Pediatric Intensive Care Unit: The Optimizing Antibiotic Strategies in Sepsis (OASIS) Study". Open Forum Infectious Diseases. 2 (suppl_1). doi:10.1093/ofid/ofv131.117. ISSN 2328-8957.
  3. ^ Balaram, Deepashree; Taylor, Louise H.; Doyle, Kim A.S.; Davidson, Elizabeth; Nel, Louis H. (2016-09-28). "World Rabies Day – a decade of raising awareness". Tropical Diseases, Travel Medicine and Vaccines. 2 (1). doi:10.1186/s40794-016-0035-8. ISSN 2055-0936.
  4. ^ "Book sources". Wikipedia (इंग्रजी भाषेत).
  5. ^ World Health Organization (2017-03). "Dengue vaccine: WHO position paper, July 2016 – recommendations". Vaccine. 35 (9): 1200–1201. doi:10.1016/j.vaccine.2016.10.070. ISSN 0264-410X. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ Purtle, Jonathan; Roman, Leah A. (2015-06). "Health Awareness Days: Sufficient Evidence to Support the Craze?". American Journal of Public Health. 105 (6): 1061–1065. doi:10.2105/ajph.2015.302621. ISSN 0090-0036. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)