चंद्रशेखर आझाद (रावण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
चंद्रशेखर आझाद

चंद्रशेखर आझाद उर्फ रावण हे वकील, सामाजिक कार्यकर्ते व भीम आर्मी या संघटनेचे अध्यक्ष व संस्थापक आहेत. २०१५ मध्ये चंद्रशेखर यांनी अनुसूचित जातींच्या तरुणांची ‘भीम आर्मी’ ही संघटना स्थापन केली, ही संघटना उत्तरेतील सात राज्यांत सक्रियपणे कार्यरत आहे.[१][२] फेब्रुवारी २०२१ मध्ये, 'टाइम' नियतकालिकाने जगभरातील १०० उदयोन्मुख नेत्यांच्या यादीत चंद्रशेखर आझाद यांचा समावेश केला आहे.[३][४][५] भविष्यावर परिणामकारक ठरू शकणाऱ्या शंभर व्यक्तिंच्या कार्याचा आढावा 'टाइम'कडून घेण्यात आला होता.[३]

अनुसूचित जातींवर (दलितांवर) झालेल्या अन्यायाच्या विरूद्ध चंद्रशेखर व भीम आर्मी संघटना कार्य करते. चंद्रशेखर व भीम आर्मी हे दोघेही आंबेडकरवादी विचारधारा मानणारे आहेत. सहारनपूरमधील जातीय हिंसाचारानंतर ‘भीम आर्मी’ चर्चेत आली होती. सहारनपूरच्या भदो गावामध्ये शाळा स्थापन करून अनुसूचित जातीच्या मुलांना नि:शुल्क शिक्षण देण्याचा उपक्रम या संघटनेने केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक राजपूतांनी रोखल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ‘भीम आर्मी’ प्रकाशझोतात आली. ५ मे २०१७ रोजी झालेल्या जातीय हिंसाचारात सामील असल्याचा आरोपावरून २०१७ च्या जूनमध्ये चंद्रशेखर आझाद यांना अटक करण्यात आली आणि २०१८ च्या सप्टेंबर महिन्यात त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे.[६] चंद्रशेखर आझाद यांनी १५ मार्च २०२० रोजी 'आझाद समाज पार्टी'ची स्थापना केली.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "My Son a Dalit Revolutionary, Says Bhim Army Chief's Mother". News18. 2019-07-30 रोजी पाहिले.
  2. ^ "What is the Bhim Army?". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2018-05-18. 2018-11-24 रोजी पाहिले.
  3. a b "'टाइम'च्या उदयोन्मुख नेत्यांच्या यादीत चंद्रशेखर 'रावण'; 'या' पाच भारतीयांचाही समावेेश". Maharashtra Times.
  4. ^ "Bhim Army Chief Chandrashekhar Azad in TIME magazine's list of 100 emerging leaders". The Indian Express. 18 फेब्रु, 2021. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ "Bhim Army chief Chandra Shekhar Aazad, 5 Indian-origin persons, feature in TIME magazine's list of 100 emerging leaders". 18 फेब्रु, 2021 – www.thehindu.com द्वारे. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ "चलो पुणे! 'भीम आर्मी'ची ३० डिसेंबरला भीमा कोरेगाव संघर्ष महासभा". Loksatta. 2018-11-22. 2018-11-24 रोजी पाहिले.