Jump to content

महिला आणि बाल विकास मंत्रालय (भारत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महिला आणि बाल विकास मंत्रालय, भारत सरकार
संस्थेचे अवलोकन
अधिकारक्षेत्र भारतभारतीय प्रजासत्ताक
मुख्यालय महिला आणि बाल विकास मंत्रालय, शास्त्री भवन,
डॉ राजेंद्र प्रसाद मार्ग, नवी दिल्ली
वार्षिक अंदाजपत्रक २४,७०० कोटी (US$५.४८ अब्ज) (2018-19 est.)[]
जबाबदार मंत्री
  • स्मृती इराणी, कॅबिनेट मंत्री
  • महेंद्र मुंजपरा, केंद्रीय राज्यमंत्री
संकेतस्थळ

wcd.nic.in

[]
खाते

महिला आणि बाल विकास मंत्रालय हे एक भारत सरकारचे मंत्रालय असून महिला आणि बालके यांच्या कल्याणासाठी संबंधित कायदे तयार करणारी आणि प्रशासकीय यंत्रणा राबवणारी ही एक शिखर संस्था आहे. महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या सध्याच्या मंत्री स्मृती इराणी असून त्या ३१मे २०१९ पासून या विभागाचे कामकाज सांभाळत आहेत.

इतिहास

[संपादन]

महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तेवढी प्रेरणा देण्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाचा एक भाग म्हणून इ.स. १९९५ साली महिला आणि बाल विकास विभागाची स्थापना करण्यात आली. ३० जानेवारी २००६ पासून या विभागाला मंत्रालयाचा दर्जा देण्यात आला..[]

धोरणात्मक उपक्रम

[संपादन]

मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी हे मंत्रालय 'एकात्मिक बाल विकास सेवा' (ICDS)चा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम राबवत आहे ज्यामध्ये पूरक पोषण, लसीकरण, आरोग्य तपासणी आणि रेफरल सेवा, पूर्व शालेय अनौपचारिक शिक्षण अशा सेवांचे पॅकेज प्रदान केले जाते. मंत्रालयाचे बहुतेक कार्यक्रम बिगर सरकारी संस्थांमार्फत चालवले जातात. स्वयंसेवी संस्थांचा अधिक प्रभावी सहभाग असावा यासाठी प्रयत्न केले जातात. अलिकडच्या काळात मंत्रालयाने हाती घेतलेल्या प्रमुख धोरणात्मक उपक्रमांमध्ये आयसीडीएसचे सर्वत्रीकरण आणि किशोरी शक्ती योजना, किशोरवयीन मुलींसाठी पोषण कार्यक्रम सुरू करणे, बाल हक्कांच्या संरक्षणासाठी आयोगाची स्थापना आणि घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा आदित्यादीचा समावेश आहे.[]

या मंत्रालया तर्फे दरवर्षी 'देवी अहिल्याबाई होळकर पुरस्कार', 'कन्नगी पुरस्कार', 'माता जिजाबाई पुरस्कार', रा'णी गायदीनलिउ झेलियांग पुरस्कार', 'राणी लक्ष्मीबाई पुरस्कार' आणि 'राणी रुद्रम्मा देवी पुरस्कार (पुरुष आणि महिला दोघांसाठी)' अशा सहा श्रेणींमध्ये वार्षिक नारी शक्ती पुरस्कार देण्यात येतो .[]

संस्थात्मक

[संपादन]

महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अध्यक्षा स्मृती इराणी आहेत. इंदेवर पांडे महिला व बाल विकास मंत्रालयाचे सचिव आहेत. या मंत्रालयाच्या अंतर्गत सहा स्वायत्त संस्था कार्यरत आहेत.

  1. राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य आणि बाल विकास संस्था (NIPCCD)
  2. राष्ट्रीय महिला आयोग (NCW)
  3. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (एनसीपीसीआर)
  4. केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (CARA)
  5. केंद्रीय समाज कल्याण मंडळ (CSWB)
  6. राष्ट्रीय महिला कोश (RMK)


मंत्री

[संपादन]
क्र. मंत्री चित्र कार्यकाळ पंतप्रधान पक्ष
रेणुका चौधरी २९ जानेवारी २००६ २२ मे २००९ 3 years, 3 months and 23 days मनमोहन सिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
कृष्णा तीरथ २८ मे २००९ २६ मे २०१४ 4 years, 11 months and 28 days
मनेका गांधी २६ मे २०१४ ३० मे २०१९ 5 years and 4 days नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्ष
स्मृती इराणी ३० मे २०१९ विद्यमान 5 years, 6 months and 17 days

राज्यमंत्री

[संपादन]
क्र. मंत्री चित्र कार्यकाळ पंतप्रधान पक्ष
कृष्णा राज ५ जुलै २०१६ ३ सप्टेंबर २०१७ 1 year, 1 month and 29 days नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्ष
वीरेंद्र कुमार खटीक ३ सप्टेंबर २०१७ ३० मे २०१९ 1 year, 8 months and 27 days
देवश्री चौधुरी ३० मे २०१९ ७ जुलै २०२१ 2 years, 1 month and 7 days
महेंद्र मुंजपारा - ७ जुलै २०२१ विद्यमान 3 years, 5 months and 10 days

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "DEMAND NO. 98 : Ministry of Women and Child Development" (PDF). Indiabudget.gov.in. 15 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "Meet the Minister of State - Ministry of Women & Child Development - GoI". WCD.access-date=15 September 2018.
  3. ^ a b "Homepage : Ministry of Women & Child Development". Wcd.nic.in. 15 September 2018 रोजी पाहिले.
  4. ^ "Stree Shakti Puraskar" (PDF). Ministry of Women and Child Development. 2014-03-14 रोजी पाहिले.