शाकाहारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

शाक/भाजी, हिरव्या वा वाळलेल्या वनस्पती, बिगरमांस (दुग्धजन्य पदार्थ) इत्यादीच फक्त ज्यांच्या आहारात आहे ते (बहुधा सस्तन) प्राणी. शाकाहारी अन्नासाठी ते बंदिस्त केलेल्या पिशवी-डबा इत्यादींच्या वेष्टनावर तसे नमूद करणे अनिवार्य असते. वेष्टनावर पुरशी जागा नसेल तर त्यावर एक हिरव्या रंगाची पट्टी किंवा हिरव्या रंगाचे भरीव वर्तुळ असले तरी काम भागते.

शाकाहारींचे प्रकार :-

  • पेसेटेरियन : ह्यांच्या अन्नात वनस्पतिजन्य पदार्थ, दूध, दुधाचे पदार्थ, अंडी आणि मासे असतात. भारतातले बंगाली ब्राह्मण पेसेटेरियन आहेत.
  • फ्लेक्सिटेरियन : एरवी दूध, दुधाचे पदार्थ आणि वनस्पतिजन्य पदार्थांचे सेवन करणारे लोक प्रसंगी अंडी खातात किंवा मांसाहार करतात.
  • राॅ व्हेगन : या लोकांच्या अन्नात दूध किंवा मांसाहारी पदार्थ नसतात. आणि वनस्पतिजन्य पदार्थही कच्चे (४५ अंश सेल्सियसपेक्षा कमी तापमानाचे) असतात. त्यांच्यामते ह्याहून जास्त गरम असलेल्या पदार्थांमधून सर्व पौष्टिकता निघून गेलेली असते.
  • लॅक्टो-ओव्हो : हे वनस्पतिजन्य पदार्थ, दूध, दुधाचे पदार्थ आणि अंडी खातात. (लॅक्टो म्हणजे दूध व ओव्हो म्हणजे अंडे!) जगातील बहुतेक शाकाहारी असे असतात.
  • व्हेगन : हे जनावरांपासून मिळणारे पदार्थ (दुधासकट) खात नाहीत, मासेही खात नाहीत. फक्त.वनस्पतिजन्य पदार्थच खातात. हे लोक चामड्याचे पट्टे, चामड्याचैची पादत्राणे आदी वस्तूही वापरत नाहीत.
  • हिंदू शाकाहारी : हे मटण, चिकिन, मासे, अंडी खात नाहीत. फक्त वनस्पतिजन्य पदार्थ आणि दूध किंव दुधापासून केले पदार्थ खातात. भारतातील राजस्थानी, गुजराथी, हिंदीभाषक, कानडी, तेलुगू, तमीळ, मराठी ब्राह्मण, जैनधर्मीय हे हिंदू शाकाहारी असतात. अशा लोकांनी परदेशी प्रवासाचे तिकीट काढताना त्यावर 'अन्नाची निवड' या पुढे 'हिंदू व्हेजिटेरियन' असे नमूद करणे जरूरीचे असते.


अन्नसाखळी