वाघाटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वाघाटी (शास्त्रीय नाव - Capparis zeylanica) ही महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या रांगांत उगवणारी एक रानभाजी आहे. कोकण, खोपोली, रायगड, तसेच पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, वेल्हे भागांत ही रानभाजी पावसाळ्यात येते. हिचा वेल काटेरी असून फुले उभयलिंगी व गुलाबी रंगाची असतात. आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उपास सोडताना वाघाटीची भाजी करतात. वर्षातील एकच दिवस ही फळभाजी बाजारांत दिसते. वाघाटीच्या फळांना गोविंदी किंवा गोविंदफळ अशीही नावे आहेत.

वाघाटी आणि करटोली या दोन्ही फळांत काहीसे साम्य आहे. करटूलला काटे असतात, वाघाटीच्या फळाला नसतात. वाघाटीचे फळ आकाराने छोट्या पेरूसारखे दिसते. दोन्ही फळे रंगाने हिरवी असतात.