शेवगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शेवग्याच्या शेंगा

शेवगा (शास्त्रीय नाव: Moringa oleifera, मॉरिंगा ऑलिफेरा ; इंग्लिश: Drumstick, ड्रमस्टिक ;) ही मॉरिंगेशिए कुळातल्या मॉरिंगा प्रजातीतील सर्वाधिक आढळणाऱ्या जातीची वनस्पती असून उष्ण कटिबंधीयसमशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणारा हा वृक्ष १० मी. उंचीपर्यंत वाढतो. याच्या फुले, पाने तसेच शेंगांचा पाककृती बनवण्यासाठी वापर होतो.याला विदर्भातील झाडीप्रांतात मुंगना असं म्हणतात.

दुधाच्या ४पट -मटणाच्या ८00पट कॅल्शियम असलेली, तुरट असुनही चवीचा बादशहा, ३०० विकारांवर मात करणारी, कुपोषण थांबविणारी पोषक- शेवग्याच्या ☘️पानांची भाजी*

         १)रक्तदाब नियंत्रित करणारी, आतड्यांचे व्रण-जखमा बरी करणारी, पित्त नियंत्रित करणारी शेवग्याच्या पानांची भाजी हि सहज उपलब्ध होत असलेली रानभाजी आहे.

   *२)बाळाच्या पाचवीला हि भाजी सटवाईला नैवेद्य म्हणून दाखवितात.तो नैवेद्य बाळाच्या आईला खाण्यास देतात.*

३) अंजन:- शेवग्याच्या पर्णरसात मध घालून अंजन केल्यास डोळ्यांचे सर्व विकार बरे होतात.

४) डोकेदुखी:- शेवग्याच्या पर्णरसात मिरे वाटून लावल्यास डोकेदुखी थांबते.

५) कोंडा:- शेवग्याच्या पर्णरसाने माॅलिश केल्यास केसातील कोंडा जातो.

६) पिसाळलेले जनावर चावल्यास:- शेवग्याच्या पर्णरस,मीठ,काळी मिरी, लसूण, हळद यांचे मिश्रण पोटात घेणे, तसेच जखमेवर लावणे.

७) तोंड येणे, गळ्याची सुज, वांती, खरुज :- शेवग्याच्या पर्णरस चोळणे, गुळण्या करणे, पिणे हे सर्वोत्तम! नसल्यास शेवग्याच्या पर्ण चुर्ण खाल्ली अथवा दररोजच्या भाजीत मिसळली तरी चालेल!

८) जेवल्यावर धाप लागणे,पोटात गॅस धरणे, डोकेदुखी, डोळ्यांचे विकार, तोंडाची चव जाणे, कुपोषण आदि विकारांवर शेवग्याच्या पर्णरसाचे, पावडरचे पोषणमुल्य अनन्यसाधारण आहे.

९) ☘️वायुगोळा:- पोटातील वा स्नायूंचा वायुगोळ्यावर शेवग्याच्या पर्णरसात खडीसाखर मिसळून खाणे फायदेशीर ठरते.

१०) ☘️पोटातील जखमा-व्रण, शारिरीक थकवा, हाडांची कमजोरी, कृमी आदि विकारांवर शेवग्याच्या पर्ण भाजीला तोड नाही.

आयुर्वेदामध्ये 300 रोगांवर शेवग्याने उपचार केले जाऊ शकतात असे सांगण्यात आले आहे. शेवग्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शिअम, पोटॅशिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ए, सी आणि बी कॉम्पलॅक्स भरपूर प्रमाणात आढळून येते.* शेवग्याच्या पानांची भाजी करतात. लोणच्यात, सॅलेडमध्ये, सूप करण्यासाठी त्याचा वापर करतात.

- पचनक्रियेशी संबंधित आजार शेवगा सेवनाने नष्ट होतात. कावीळ या आजारांमध्ये शेवग्याच्या पानांचा ताजा रस, एक चमचा मध आणि नारळ पाणी एकत्र करून पिल्यास आराम मिळतो.

शेवग्याच्या कोवळ्या पानांच्या भाजीने आतड्यांना उत्तेजना मिळून पोट साफ होते. त्यामुळे जठराचा कर्करोग टाळण्यासाठी भाजीचा उपयोग होतो. शेवग्याच्या पानात पीट्रिगोस्पेरमिन नावाचे कार्यकारी तत्व असते. ते जीवाणू प्रतिबंधक म्हणून कार्य करते. त्यामुळे आतड्यातील व्रणास कारणीभूत असणाऱ्या एच पायलोरी या जीवाणूवर ते प्रभावी ठरते व आंतड्यातील व्रण भरून येण्यास मदत होते. *हाडे ठिसूळ होणे, वजन जास्त वाढणे, आळस आदी लक्षणे दिसू लागल्यानंतर शेवग्याची भाजी खावी. ही सर्व लक्षणे कमी होतात. शारिरीक आणि मानसिक थकवा, जडपणा या भाजीने कमी होतो. शेवग्याचा पाला रक्तवर्धक व हाडांना बळकटी देणारा आहे. सर्व प्रकारच्या नेत्ररोगांमध्ये शेवग्याच्या पानांची भाजी लाभदायक ठरते.* शेवग्याच्या फुलांची भाजी ही संधीवातासाठी चांगली आहे. शेंगाची भाजीसुद्धा स्नायूगत संधीवातासाठी तसेच कृमीनाशक आहे.

भाजी कशी करावी?*[संपादन]

शेवग्याचा पाला स्वच्छ धुऊन निथळून घ्यावा. नंतर पाने चिरून घ्यावीत. मूग डाळ एक तास आधी भिजत ठेवावी. नंतर निथळून घ्यावी. जिरे, हिरव्या मिरच्या, लसूण वाटून घ्यावा. फोडणी करून वरील सर्व पदार्थ घालून खमंग परतल्यावर त्यात डाळ घालावी व परतावी. परतल्यानंतर त्यात भाजी घालावी, मीठ घालून झाकण ठेवून मोकळी शिजू द्यावी. शेवग्याचा पाला काहीसा तुरट-कडवट चवीचा असतो मात्र भाजी केल्यानंतर तो खूप चविष्ट लागतो. *शेवग्याच्या ☘️पानांची सुकी भाजी, पातळ भाजी, वड्या, भजी, टिकिया, सूप, झुणका, थालीपीठ, शेवगा पुलाव, शेवगा फुलांची भाजी, फुलांचे भरीत, शेंगेची रसभाजी, पानांची कढी* अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या केल्या जातात.

वनस्पतीची रचना[संपादन]

शेवग्याच्या झाडाला आलेला फुलोरा व पाने

उपयोग[संपादन]

वाळलेल्या शेवग्याच्या बियांचे चूर्ण पाणी निर्जंतुक करण्यासाठी वापरले जाते. तसेच शेवग्याच्या बियांपासून निघणारे तेल, म्हणजे बेन ऑइल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंत तसेच घड्याळात वंगण म्हणून वापरतात. या तेलाचा उपयोग अत्तरात करतात.

शेवग्याच्या पानांमध्ये ब जीवनसत्त्व हे तत्त्व विपुल प्रमाणात असते. त्यामुळे 'तोंड येणे' या आजारात शेवग्याच्या पानांचे आहारातून सेवन लाभदायक आहे[ संदर्भ हवा ]. शेवग्याची मुळे जंतनाशक असतात [ संदर्भ हवा ].

शेवग्याची पाने आरोग्यवर्धक आहेत.

चित्रदालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत