टोमॅटो
| टोमॅटो | ||||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
Full and cross-section of a ripe supermarket tomato | ||||||||||||||
| शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||||
| ||||||||||||||
| इतर नावे | ||||||||||||||
|
Lycopersicon lycopersicum |
टोमॅटो ही एक फळभाजी आहे. मराठीत या फळाला टोमॅटो, भेदरे किंवा बेलवांगे म्हणतात. ब्रिटीशकाळात टोमॅटोला 'तांबेटे' असेही म्हणले जात. संस्कृतमध्ये याला हिण्डीरः, रक्तमाचे व रक्तवृत्नाक असे शब्द वापरले जातात. यातील मुख्य पोषक घटक म्हणजे व्हिटॅमिन C, पोटॅशियम आणि लायकोपीन. टोमॅटोत थोड्या प्रमाणात कैल्शियम, व फास्फोरस असते. टोमॅटोमध्ये बीटा-कॅरोटीन असते, जे शरीरात व्हिटॅमिन A मध्ये रूपांतरित होऊन डोळ्यांसाठी लाभदायी ठरते. यातील स्वाद आंबट (अम्लीय) असला तरी शरीरात क्षारीय प्रतिक्रिया निर्माण करतो. आंबट चवीचे कारण यात असलेले साइट्रिक व मॅलिक आम्ल आहे. टोमॅटोतील प्रमुख रंगद्रव्य म्हणजे लायकोपीन. लाल टोमॅटोमध्ये हे प्रामुख्याने all-trans स्वरूपात असते, जे शरीरात कमी प्रमाणात शोषले जाते; तर नारिंगी टोमॅटो किंवा प्रक्रियायुक्त टोमॅटोमध्ये cis-lycopene स्वरूप असते, जे शरीरात सहज शोषले जाते.
इतिहास
[संपादन]मानवाला टोमॅटोची ओळख १६व्या शतकाच्या मध्यास झाली. ही वनस्पती मूळची दक्षिण अमेरिकेतील (पेरू, इक्वाडोर, चिली) आहे. इ.स. १५४४ मध्ये इटालियन वनस्पतिशास्त्रज्ञ पिएत्रो आंद्रेआ मत्तीओली यांनी याचा प्रथम उल्लेख केला. लवकरच इटलीत सजावटी व औषधी म्हणून लागवड सुरू झाली, त्यानंतर स्पेन, ब्रिटन व इतर युरोपियन देशांत पसरली.
सुरुवातीला युरोपियन समाज टोमॅटोला विषारी समजत असे, परंतु १८व्या शतकाच्या शेवटी अन्नपदार्थ म्हणून स्वीकारण्यात आला. अमेरिकेत १७व्या शतकात टोमॅटो आला आणि १७८१ मध्ये थॉमस जेफरसन यांनी व्हर्जीनियातील आपल्या बागेत त्याची लागवड केली होती. भारतात टोमॅटो पोर्तुगीजांनी १६व्या शतकाच्या शेवटी आणला व पुढे १९व्या शतकात त्याची लागवड सर्वत्र सुरू झाली.
महाराष्ट्रातील टोमॅटोच्या जाती
[संपादन]
- चेरी - ही तैवानहून येणारी जात आहे. ही जात साधारण जंगली प्रकारची असून फळांचा आकार गोलाकार टूटी-फ्रूटीसारखा असतो. पाण्याची कमतरता असल्यास रंग फिकट तांबूस, तर थंडीमध्ये लागवड केल्यास गर्द लाल असतो. पंचतारांकित हॉटेलांत चेरी फळाच्या ऐवजी ठेवण्याची प्रथा आहे.
- धनश्री - टोमॅटो नारंगी रंगाचे, मध्यम आकाराचे व जास्त गराचे
- नामधारी - फळ कडक, चौकोनी गोल (किंवा अंडाकृती गोल), गर्द लाल व वजनदार
- भाग्यश्री - टोमेटो मोठ्या आकाराचे, लांबट गोल लांबट व पूर्ण लाल रंग
- रुपाली - गर भरपूर असलेली जात
- शिवाजी - फळ लंबगोलाकार, गर्द लाल रंगाचे, कडक व ८५ ते ९० ग्रॅम वजनाचे
टोमॅटो लागवडीसाठी हवामान
[संपादन]टोमॅटो हे समशीतोष्ण हवामानात येणारे नाजूक पीक असल्याने बदलत्या हवामानातले कडक ऊन, ढगाळ हवा, मुसळधार पाऊस, धुके, कडाक्याची थंडी अथवा ढगाळ हवेतील गरम व दमटपणा या पिकास मानवत नाही. महाराष्ट्रातील टोमॅटोची विविधता ही तैवानची 'चेरी' नावाची टोमॅटो पंचतारांकित हॉटेल्स मध्ये चेरी फ्रुटच्या ऐवजी ठेवण्याची प्रथा आहे. आशियाई संशोधन विकास केंद्र, तैवान यांची ही प्रजाति निर्माण केली असून तिचा जगभर प्रसार होत आहे. ही प्रजाति साधारण जंगली प्रकारची असून फळांचा आकार गोलाकार फळ मिश्रित आईस्क्रीम सारखा असतो. पाण्याची कमतरता असल्यास रंग फिकट तांबूस तर थंडीमध्ये लागवड केल्यास गर्द लाल असतो.
धनश्री - टोमॅटो नारंगी रंगाचे, मध्यम आकाराचे व जास्त गराचे नामधारी - फळ कडक, चौकोनी गोल (किंवा अंडाकृती गोल), गर्द लाल व वजनदार भाग्यश्री - टोमेटो मोठ्या आकाराचे, लांबट गोल लांबट व पूर्ण लाल रंगाचे रुपाली - गर भरपूर असलेली जात शिवाजी - फळ लंबगोलाकार, गर्द लाल रंगाचे, कडक व ८५ ते ९० ग्रॅम वजनाचे
टोमॅटो फळातील रंगद्रव्य
[संपादन]लाल रंगाच्य़ा टोमॅटोचय़ा तुलनेत नारंगी रंगाचे टोमॅटो मधील लायकोपिन हे रंगद्रव्य शरीरात सहजपणे शोषले जाते. लाल रंगाच्या टोमॅटोमधे लायकोपिन हे रंगद्रव्य टेत्रा-सिस्(?) मधे उपलब्ध असते. ते शरीरात सहजपणे शोषले जात नाही. टोमॅटो खाण्याची फायदे रसाळ आणि लाल टोमॅटो जेवनातील चव वाढवितात. टोमॅटोचे अनेक फायदे आहेत. टोमॅटोला लाल रंग देणारा तत्त्व लाइकोपीन, जे आरोग्यासाठी फायदेमंद आहे. कच्चे टोमॅटो पेक्षा कच्चे टोमॅटो पिकल्यावर जास्त प्रभावी असते. तसे तर टोमॅटो प्रत्येक ऋतुत फायदेमंद असतो. टोमॅटोचा उपयोग त्वचा साठी ही खूप लाभकारी आहे. हे सुरकुत्या कमी करते आणि रोम छिद्रांना मोठे करते.
संदर्भ
टोमॅटोचे महत्त्व व प्रक्रिया उद्योग
[संपादन]
टोमॅटोचे आहारात विशेष औषधी महत्त्व नसले तरी त्याच्या सुधारित जातींचा लालभडक आकर्षक रंग, आकार व चव यांमुळे सर्व हॉटेलांत, शहरी वातावरणातील घरांमध्ये टोमॅटोचा तोंडी लावण्यासाठी व कोशिंबिरी मध्ये सर्रास वापर केला जातो. शहरातील हॉटेलमध्ये फ्रेंच फ्राय (बटाट्याचे तळलेले उभे तुकडे) वा बटाटा चिप्सबरोबर टोमॅटो केचप देण्याची रीत आहे. टोमॅटोमध्ये 'अ' (०.६४%) व 'क' (२.८२%) जीवनसत्त्व असते. 'लायकोपिन' या घटकामुळे टोमॅटोस लाल रंग येतो. टोमॅटोपासून पेस्ट (प्यूरी) व त्यापासून टोमॅटो सूप, केचप, ज्यूस, टोमॅटोपुरी लोणचे इत्यादी पदार्थ तयार करतात. टोमॅटोची चटनी भारतात खूप लोकप्रिय टोमॅटोची चटणी आहे सुद्धा खूप कमी वेळात बनते. ही चटनी लोक नाश्टा मध्ये सामोसा, बटाटा वडा, भजी, डबलरोटी इत्यादी बरोबर आवडीने खातात. तसे टोमॅटोची गोड चटणी टोमॅटो कैचप किंवा सॉसच्या रूपात साधारण बाज़ारात मिळते. आता तर याचा व्यावसायिक दृष्टि ने उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे.याचे जास्त उपयोग नाश्ट्याची चटणी बनविण्यासाठी होतो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |