लुआ(Lua) त्रुटी: expandTemplate: template "Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-taxon-depicted/mr" does not exist.
सुरण कंद
सुरण कंद
सुरणाचे फूल
सुरणाचे फूल
सुरणाचे झाड
सुरणाचे झाड
सुरण (वनस्पतीशास्त्रीय नाव: Amorphophallus paeoniifolius; इंग्लिश: Elephant foot yam) ही दक्षिणपूर्व आशिया खंडातील उष्णकटिबंधीय कंदमूळ प्रकारातील वनस्पती आहे. दक्षिणपूर्व आशिया, दक्षिण आशिया, मादागास्कर, न्यू गिनी आणि पॅसिफिक बेटांवर कंदांसाठी या वनस्पतीची लागवड केली जाते. कमी खर्चात वाढणारे हे एक नगदी पीक म्हणून वाढविले जाऊ शकते. या वनस्पतीच्या सर्व भागांचा खाण्यात अन्न तसेच औषध म्हणून वापर होतो. कंद उकडून - कुस्करून किंवा तळून खाल्ला जातो किंवा यांची रस्सा भाजी देखील करतात. भारतात काही ठिकाणी लोणच्यामध्ये किंवा चिप्स बनवण्यासाठी देखील कंद वापरले जातात. याची हिरवी पाने आणि देठ देखील पालेभाज्या म्हणून शिजवल्या जातात.[१][२]
सुरण कांदाचा भारतीय औषधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. आयुर्वेद, सिद्ध आणि युनानी या तीनही प्रमुख भारतीय औषधी पद्धतींमध्ये औषधी कंद म्हणून याची शिफारस केली जाते. विशेष करून मूळव्याधीवर हा कंद उपयुक्त असल्याचे मानले जाते.[३][४]
वनस्पतीशास्त्रीय नाव: Amorphophallus paeoniifolius किंवा Amorphophallus campanulatus.
इतर मराठी नावे: हत्तीचा रताळ (हत्तीच्या पायासारखा दिसणारा रताळ), कंदनायक, कंदवर्धन.
संस्कृत: अर्शोघन, कण्डूल, चित्रदण्डक, कन्दनायक, कंदवर्धन, वातारी, ओल, वज्रकंद, चित्रकंद, सुरकंद, रुच्यकंद, सुकंद, गुदामयहर इ. नावे आहेत. अर्श म्हणजे मूळव्याध. सुरण मूळव्याधीचा नायनाट करते म्हणून त्यास अर्शोघन म्हणतात. कण्दू म्हणजे खाज. सुरण प्रक्रिया न करता खाल्ले असता घशास खाज सुटते, म्हणून त्यास कण्डूल म्हणतात. तसेच त्याच्या पानाच्या हिरव्या देठावर पांढरे चट्टे असल्यामुळे त्यास चित्रदण्डकही म्हणतात. सुरण हे औषधी गुणांनी सर्वात श्रेष्ठ आहे म्हणून त्याची ‘कन्दनायक’ अशी सुद्धा ओळख आहे.[५]
↑Nedunchezhiyan, M.; Misra, R. S. (2008). "Amorphophallus tubers invaded by Cynodon dactylon". Aroideana. International Aroid Society. 31 (1): 129–133.