अंजीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अंजीर 
Smokve na grani.jpg
झुडुपाची एक प्रजाती

Wikispecies
प्रकारtaxon
वर्गाचे नावFicus carica (1753, कार्ल लिनेयस)
वर्गिकरणातील प्रतवारीspecies
पालक वर्गFicus
अधिकार नियंत्रण
जीएनडी ओळखण: 4153852-3
विकिडाटा
Blue pencil.svg
अंजिराच्या फांद्या, पर्णसंभार व फळे

अंजीर (शास्त्रीय नाव: Ficus carica, फायकस कॅरिका ; इंग्लिश: Common fig, कॉमन फिग ;) हे एक मोठ्या आकाराचे झुडूप असते. हे झाड नैऋत्य आशिया आणि पूर्व भूमध्य विभागात (ग्रीस ते अफगाणिस्तानापर्यंत) आढळते. हे झाड साधारणत: ३ ते १० मी उंच वाढते. याचा दांडा करड्या रंगाचा असतो. या झुडूपाची पाने १२ ते २५ से.मी. लांब आणि १०-१८ सेंमी रुंद असतात.

अंजिराचे फळ ३-५ सेंमी लांब असते. हे फळ कच्चे असताना त्याची साल हिरवी असते, तर ते पिकू लागल्यावर त्याचा रंग अंजिरी होऊ लागतो. या झाडाच्या चिकाने माणसाची त्वचा जळजळते.

वाढ आणि उपयोग[संपादन]

अंजीराच्या आतील गर आणि बिया
डुमुर या नावाने परिचित बंगाल प्रांतात मिळणारी अंजीरे

अंजीर हे फळ इराण आणि इतर भूमध्यसागरी भागात नैसर्गिकरित्या उगवते आणि तेथील ते मुख्य खाद्य-फळ आहे. याचबरोबर ते या नैसर्गिक पट्ट्याबाहेरही, साधारण सारखे वातावरण असलेल्या ऑस्ट्रेलिया, चिली, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिकेतील कॅलिफोर्निया, ऑरेगॉन, टेक्सासवॉशिंग्टन राज्यांमधेही अंजिराचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. हे फळ हजारो वर्षे माणसाच्या खाद्यजीवनात महत्त्वाचे स्थान टिकवून असून हे फळ अत्यंत पौष्टिक समजले जाते. हे एक उंबरवर्गीय फळ आहे.

फायदे[संपादन]

  • अंजीर साधारण बद्धकोष्ठतेवर औषधी म्हणून वापरले जाते.
  • अंजीर या फळातून शरीराला मुबलक प्रमाणात लोह मिळते.
  • अंजीर फळाच्या सेवनाने पोटातील वात कमी होतो.
  • अंजीर फळातील औषधिगुणामुळे पित्त विकार,रक्तविकार व वात ही दूर होतात.
  • अंजिराच्या सेवनाने मानसिक ताण आणि शाररीक थकवा कमी होतो.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्यदुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.