गूळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


Broom icon.svg
{{{सूचना}}}


उसाचा रस उष्णतेने आटवून तयार केलेला लालसर पिवळ्या रंगाचा एक पदार्थ. हा गोड असतो. गरम असलेला व आटवलेला उसाचा रस थंड होण्यापूर्वी साच्यात ओततात. त्यामुळे गुळाच्या ढेपीला साच्याचा आकार येतो. ज्या ठिकाणी उसाचा रस काढून त्याचा गूळ तयार करतात त्या जागेस 'गुऱ्हाळ' असे म्हणतात. खाद्यपदार्थास गोड चव येण्यासाठी गुळाचा वापर करतात. साखरेचा शोध लागण्यापूर्वी, पक्वान्ने बनविण्यासाठी भारतात गूळ वापरला जाई. आजही, भारतीय स्वयंपाकघरांत गूळ ही एक आवश्यक बाब आहे.

वर्णन[संपादन]

आयुर्वेदानुसार, हा उष्ण प्रकृतीचा असल्यामुळे, हिवाळ्यात शरीरात उर्जा,उष्मा वाढविण्यास याचा उपयोग केल्या जातो.परंतू, मधुमेह असणाऱ्यांनी, हा गोड असल्यामुळे, याचे सेवन करू नये.

घटक[संपादन]

  • सुक्रोज - ५९.७ %
  • ग्लुकोज - २१.८ %
  • खनिज - २६  %
  • पाणि(अंश) - ८.८६ %

या शिवाय कॅल्शियम, फॉस्परस, मॅग्नेशियम, लोहताम्र याचेही प्रमाण त्यात असते.

फायदा[संपादन]

रोगप्रतिकारक शक्तीत वाढ, रक्तदाब कमी, हिमोग्लोबिन व स्मरणशक्तीमध्ये मध्ये वाढ, शरीरातील विषारी तत्त्व बाहेर पडतात.

प्रकार[संपादन]

बाजारात साधारणपणे मिळणाऱ्या रासायनिक गुळांत कॉस्टिक सोडा, ऑक्झॅलिक अ‍ॅसिड, फॉस्फरिक अ‍ॅसिड, बेन्झीन वगैरे रसायने घातलेली असल्याने, शक्य असल्यास सेंद्रिय गूळ घ्यावा.

संदर्भ[संपादन]