काकडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हिरवी काकडी

काकडी हे एक पित्तशामक फळ आहे. ते चवीला रुचकर असून उन्हाळ्याचा त्रास कमी करणारे आणि तृषा भागवणारे आहे. जेवणामध्ये कोशिंबिरीकरता याचा वापर सर्रास केला जातो. दारू पिणारी मंडळीही दारू पितापिता सोबत मीठ लावलेली काकडी काही वेळेला खातात.

काकडीला इतर भाषांतील शब्द :

  • इंग्रजी : Cucumber
  • कानडी : संत्रेकाई
  • गुजराती : काकडी, काकरी, तानसली
  • तामीळ : मुल्लवेल्लरी
  • मराठी : काकडी, खिरा, तारकाकडी, तावसा, वाळुक
  • बंगाली : खिरा
  • लॅटीन : Cucumis sativus; Cucumis melo(Cucumis utilissimus)
  • संस्कृत : एर्वारु, कर्कटी, त्रपुष्पा, मूत्रला, लोमशी, वालुंगी, शंतनू, सुधांसा, सुशीतला
  • हिंदी : ककड़ी, खीरा