भोपळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
वेलीवरील भोपळा

तांबडा भोपळा ( वनस्पतीशास्त्रीय नाव:Cucurbita maxima; कुळ:Cucurbitaceae ;इंग्लिश:Pumpkin(पमकिन) ; हिंदी: कद्दू ;) ही वेलवर्गातील वनस्पती आहे. याच्या मोठया आकाराच्या फळाची भाजी वा भरीत करतात किंवा भोपळघारगे नावाचा गोड पदार्थही करतात.तसेच भोपळ्याची खीर ,पराठे, इत्यादि पदार्थ करतात.तसेच भोपळा आरोग्यासाठी खूप महत्वांचा आहे.

हा पुष्टीदायक आहे.मोठ्या आजारानंतर शरीर क्षीण झाले तर, जेवणात भोपळा घेतला असता,काही दिवसांनी दौर्बल्य नाहीसे होते.