सातूचे पीठ
Jump to navigation
Jump to search
सातूचे पीठ करण्यासाठी गहू/जवस आणि/किंवा हरबऱ्याची डाळ लालसर खरपूस भाजतात व मग त्यात चवीला जिरे टाकतात. हे मिश्रण दळून आणतात. तयार झालेले हे पीठ पाण्यात भिजवून साखर टाकून खातात. क्वचित कोणी त्याऐवजी तिखट, मीठ टाकूनही खातात. सातूचे पीठ पौष्टिक असते. यात भरपूर पोषणमूल्ये असतात. जुन्या काळात, जेंव्हा वाहने उपलब्ध नव्हती तेंव्हाच्या पायी वा बैलगाडीच्या प्रवासात न्याहारीसाठी याचा वापर होत असे. हिंदी भाषेत-" सत्तू मनमत्तू, चट् घोले तब खाय ।" असे याबद्दल म्हणतात.
मध्य प्रदेशात आणि बिहारमध्ये आजही प्रखर उन्हात जाण्यापूर्वी पाण्यात मिसळलेल्या सत्तूच्या पिठाचे पातळसर पेय पिऊन जाण्याची प्रथा आहे.