मोहरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतीय खाण्यात येणारी एक पालेभाजी. हिला हिंदीत सरसों म्हणतात. पंजाबी लोकांची ही आवडती भाजी आहे. विशेषेकरून ते मक्याच्या भाकरीबरोबर ही भाजी आवडीने खातात. या भाजीच्या रोपांच्या बियांना मोहरी किंवा राई म्हणतात. हा स्वयंपाकात फोडणीसाठी वापरण्यात येणारा एक प्रकारचा मसाला आहे.व मोहरी पासून तेल हि काढतात.

मोहरीमध्ये पांढरी मोहरी(Brassica alba), पिवळी मोहरी(Brassica campestris), काळी मोहरी(Brassica nigra),तेलाची मोहरी-Rape seed(Brassica napus), आणि भाजीची मोहरी(Brassica juncea अशा आणखीही बऱ्याच जाती आहेत.

मोहरीचे पीक
मोहरीच्या रोपा पाने व फुले
मोहरी (बिया)
सरसू (मोहरीचाच एक प्रकार)याचे दाणे मोठे असतात
लोणच्यात वापरण्यात येणारी मोहरीची डाळ