स्ट्रॉबेरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्ट्रॉबेरी


स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी हे एक बेरी वर्गीय फळ आहे. हे लाल रंगाचे फळ आहे. ते थंड प्रदेशात होते. सुगंध, लाल रंग, रसाळपणा आणि गोडवा या मुळे हे फळ प्रसिद्ध आहे. स्ट्रॉबेरी ही झुडुप वर्गिय वनस्पती आहे. फळाचा उगम प्राचीन रोममधे झाला असे मानले जाते. सुरुवातीला स्ट्रॉबेरी हिरव्या रंगाच्या असतात. नंतर जसजशी त्यांची वाढ होत जाते, तसतशा त्या लाल होत जातात. महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरी ची लागवड होते. इतरत्रही लागवडीचे प्रयत्न असतात. एका हंगामात पाच बहर येत असल्याने हे जोडपीक म्हणूनही शेतकऱ्यांना पैसे देऊन जाते. सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथे स्ट्रॉबेरी फेस्टिव्हल साजरा होतो. नंदुरबार जिल्हयातील तोरणमाळ येथेही स्ट्रॉबेरीचे उत्पादन होऊ लागले आहे.

लागवड[संपादन]

स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी साधारणत: थंड तापमान आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते. स्ट्रॉबेरी पासून वाईन बनवली जाते.

वापर[संपादन]

स्ट्रॉबेरीपासून जॅम, आईसक्रिम बनवले जाते. स्ट्रॉबेरी आणि क्रिम हासुद्धा एक लोकप्रिय पदार्थ आहे.

बाह्य दुवे[संपादन]

डॉ. सीमा सोनीस]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.