शिंगाडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिंगाड्याच्या रोपाचे चित्र

शिंगाडा (शास्त्रीय नाव: Eleocharis dulcis , इलेओकरिस डल्सिस; इंग्लिश: water chestnut, वॉटर चेस्टनट ;) ही पूर्व आशिया, आग्नेय आशियादक्षिण आशियात उगवणारी एक तृणवर्गीय वनस्पती आहे. ही पाणथळ जागी वाढणारी वनस्पती आहे, याचे पर्णहीन देठ सुमारे १.५ मीटर उंचीपर्यंत वाढतात. अनेक संस्कृत्यांमध्ये याचे कंद खाद्य समजले जातात. दोन सेंटिमीटर जाडीचे मऊ गर असलेल्या शिंगाड्याच्या फळाची चव किंचित गोड असते.

आढळ[संपादन]

शिंगाड्यात अनेक आयुर्वेदिक गुणधर्म असल्याचे सांगितले जाते [ संदर्भ हवा ]. म्हणूनच त्यांची शेती उत्तर भारतात व विदर्भात मोठ्या प्रमाणावर केली जाते.पूर्व विदर्भात व मध्यप्रदेशात अनेक तलाव आहेत. तेथेही याची शेती केली जाते[ संदर्भ हवा ]

खाद्य उपयोग[संपादन]

शिंगाड्याचा कंद

शिंगाड्याचे कंद हा महाराष्ट्रात एक उपवासासाठीचा खाद्यपदार्थ आहे. शिंगाडे उकडून खाल्ले जातात तसेच शिंगाड्याच्या पीठापासून शिरा केला जातो.चीनमध्ये कंद कच्च्या, भाजलेल्या किंवा वाफवलेल्या स्वरूपात खाल्ले जातात. शिंगाड्याचे पीठ काही चिनी (उदा० तिम सुम )पदार्थांमध्ये वापरले जाते.यात आयोडिनचे प्रमाण जास्त असते.[ संदर्भ हवा ]

काढलेले शिंगाडे (कच्चे)
उकडलेले व खाण्यास तयार शिंगाडे.डावे बाजूस उकडलेले पूर्ण शिंगाडे आहेत, तर ट्रेच्या उजव्या बाजूस कापलेले. त्याचे वरचे काळे साल काढून यातील पांढरा भाग खातात.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]