भेंडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भेंडी

भेंडी ही एक फळभाजी आहे. ही भाजी जवळ जवळ वर्षभर बाजारात उपलब्ध असते.

भेंडीची लागवड[संपादन]

भेंडी या भाजीच्या लागवडीतून शेतकर्याआला चांगले उत्पन्न मिळू शकते असे सिद्ध झाले आहे. या पिकाची लागवड करण्यासाठी जुलैचा पहिला आठवडा हा खरीप हंगाम चांगला ठरतो. उन्हाळी हंगामात भेंडीची लागवड करायची असेल तर जानेवारीच्या तिसर्या आठवड्यात केली पाहिजे. लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करावी आणि हेक्टरी 20 टन एवढे शेणखत मिसळावे. फुले उत्कर्षा, परभणी क्रांती, अर्काअभय, अर्काअनामिका या जातींची लागवड फायदेशीर ठरते. लागवडीसाठी हेक्टरी 15 किलो एवढे बियाणे आवश्यक असते. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणाला 25 ग्रॅम झोटोबॅक्टर आणि 25 ग्रॅम स्फूरद विरघळवणार्या जीवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. 30 सेंटीमीटर 15 सेंटीमीटर या अंतराने लागवड करावी. मातीपरीक्षणानुसार खताची मात्रा द्यावी लागते. त्यानुसार हेक्टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फूरद, 50 किलो पालाश या प्रमाणात खत द्यावे लागते. लागवडीनंतर एक महिन्याने 50 किलो नत्र द्यावे लागते. दर पंधरा दिवसांनी खुरपणी करावी लागते.

हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून भेंडीची ओळख आहे. राज्यात भेंडीची लागवड साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रात केली जाते असा अंदाज आहे. बहुतेक सर्व जिल्ह्यात भेंडीची लागवड कमी जास्त प्रमाणात केली जाते. सातारा, नाशिक, नगर, धुळे, जळगाव आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये भेंडीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. भेंडीमध्ये दोन टक्के प्रोटिन्स 1.2 टक्के फायबर, .4 टक्के मॅग्नेशीयम, कार्बोहायड्रेडस् 6.4 टक्के, कॅल्शियम .7 टक्के असते. आरोग्यासाठी भेंडी नियमित खाणे उपयुक्त ठरते. भेंडीकरिता मध्यम काळ्या किंवा पोयट्याची जमीन लागते. अशा जमिनीमध्ये भेंडी पिकाची वाढ चांगली होते. हलकी जमीन घेतल्यास त्यात पिकाची वाढ चांगली होत नाही. त्यामुळे उत्पादन कमी मिळते. उत्पादन चांगले येण्यासाठी अधिकाधिक प्रमाणात सेंद्रिय खताचा वापर करावा. ज्या जमिनीत भेंडी लागवड करणार असाल त्या जमिनीचा सामू 6 ते 7 दरम्यान असला पाहिजे. भेंडीच्या पिकाला दमट आणि उष्ण हवामान मानवते असा अनुभव आहे. या पिकाची पेरणी तापमान कसे आहे हे पाहूनच करावी लागते. 15 अंश सेल्सियसपेक्षा कमी तापमान असेल तर बियांची उगवन चांगली होत नाही. तापमानाचा पारा 42 अंश सेल्सियसपेक्षा अधिक झाला तर फुलांची गळ होते. 20 ते 40 अंश सेल्सियस या दरम्यानच्या तापमानात भेंडीचे पीक चांगले येते. वातावरणात खूप दमटपणा असेल तर भेंडीवर भुरी रोग पडतो. ज्या ठिकाणी थंडी अधिक असते अशा ठिकाणी रब्बीमध्ये हे पीक घेता येत नाही. मात्र कोकणात समुद्रकिणार्या जवळ असणार्याह भागात हिवाळा सुरू होण्यापूर्वी पेरणी केल्यास भेंडीचे पीक घेता येते. उन्हाळ्यातील वातावरण भेंडीच्या वाढीला उपयुक्त ठरते. उष्ण हवामानामुळे भेंडीचे उत्पादन चांगले येते. भेंडीच्या लागवडीसाठी अनेक जाती उपलब्ध आहेत. काही संकरीत वाणही बाजारात उपलब्ध आहेत. अर्काअनामिका ही जात बंगळुरू येथील आयआयएचआर मध्ये विकसित करण्यात आली आहे.

फायदे[संपादन]

भेंडी सेवन केल्याने कँसर होत नाही

भेडी हृदयाला देखील स्वस्थ ठेवते

डायबेटीज होण्याची शक्यता नसते

भेंडी ऍनिमियामध्ये फारच लाभदायक असते

पोटफुगी, कब्ज, पोट दुखणे आणि गॅस सारख्या समस्या होत नाही.

हाड मजबूत होतात

संदर्भ[संपादन]

http://marathi.webdunia.com/article/marathi-home-remedies