गवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गवार किंवा गोवार (इंग्लिश: Cluster Beans) एक पलाश(Papilionaccea) कुळातली वेलवनस्पती आहे. हिच्या शेंगांची भाजी करतात. शास्त्रीय नांव : Cyamopsis psoralioides किंवा Cyamopsis tetragonoloba.

गोवारीचे झुडुप साधारणपणे एक मीटर उंचीचे असते. कांडावर बहुश: अंगासरसे केस असतात गवारीच्या शेंगाना कप्पे असतात. एकेक्या कप्प्यात ७ ते ११ बिया असतात. बिया बहुधा हिरव्या, क्वचित काळ्या रंगाच्या असतात. गवार द्विदल पिकांच्या श्रेणीत मोडते. उत्तर भारतात गवारीचे जास्त उत्पादन केले जाते. गवार शुष्कतेबाबत खूप सहनशील असल्यामुळे कमी पावसाच्या प्रदेशात प्रामुख्याने हिची शेती केली जाते. गवारीच्या बियांच्या सालीपासून डिंक तयार केला जतो.


गवार


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.