वरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वरी किंवा वरई हे भारतात उगवणारे एक तृणधान्य आहे. महाराष्ट्रात याच्यापासून भात, पुऱ्या, भाकरी, थालपिठे आदी उपवासाचे अन्नपदार्थ बनतात.[१] हे धान्य वऱ्याचे तांदूळ किंवा भगर म्हणूनही ओळखले जाते. कांग, कोदरी, कोदो, कुटकी, नाचणी, राळे प्रमाणेच या धान्यालाही कनिष्ठ प्रकारचे धान्य समजतात. प्रथिने व फायबर यांचे प्रमाण जास्त असल्याने आरोग्यास हे धान्य पोषक समजले जाते. महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते.[२]भारतीय केंद्रीय कृषी मंत्रालयाने २०१८ हे वर्ष तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे.[३] तसेच संयुक्त राष्ट्र संघानेही हे वर्ष जाहीर करावे यासाठी प्रयत्न केले. भगर हे उपवास करीता वापर होतो.

अन्य शब्द[संपादन]

  • इंग्रजी : स्मॉल मिलेट
  • गुजराथी : सामो, मोरियो
  • शास्त्रीय नाव : Echinochloa colona
  • हिंदी : मोरधन, सवा का चावल

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "खाद्यवारसा : वरई भाकरी". लोकसत्ता. ४ मे २०१८. २६ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.
  2. ^ संचेती, गौतम (२४ नोव्हेंबर २०१७). "वरई, नागलीला अच्छे दिन?". महाराष्ट्र टाईम्स. २६ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.
  3. ^ "Centre to declare 2018 as national year of millets". द हिंदू. २० जानेवारी २०१८. २६ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.