करवंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
करवंद 
species of plant
Carissa spinarum near Hyderabad W IMG 7615.jpg
माध्यमे अपभारण करा

Wikispecies-logo.svg  Wikispecies
प्रकार taxon
Taxonomy
साम्राज्यPlantae
SubkingdomViridiplantae
InfrakingdomStreptophyta
SuperdivisionEmbryophyta
DivisionTracheophyta
SubdivisionSpermatophytina
OrderGentianales
FamilyApocynaceae
SubfamilyRauvolfioideae
TribeCarisseae
GenusCarissa
SpeciesCarissa spinarum
Taxon author कार्ल लिनेयस, इ.स. १७७१ Edit this on Wikidata
अधिकार नियंत्रण
Blue pencil.svg
Carissa spinarum (es); Carissa spinarum (fr); ኣጋም (am); Carissa spinarum (ast); Carissa spinarum (ru); करवंद (mr); Umushubi (rw); Carissa spinarum (vi); 假虎刺 (zh); Carissa spinarum (pt); Carissa spinarum (nl); Ntshuguri (ts); Carissa spinarum (ceb); カリッサ・スピナルム (ja); Carissa spinarum (war); Carissa spinarum (sv); Carissa spinarum (uk); Carissa spinarum (la); Carissa spinarum (bg); Carissa spinarum (it); Enkeldoring-noemnoem (af); ചെറുമുൾച്ചെടി (ml); Carissa spinarum (en); كاريس شوكي (ar); Carissa spinarum (de); சிறு கிளா (ta) species of plant (en); Art der Gattung Wachsbäume (Carissa) (de); taxon (nl); species of plant (en); вид растение (bg); вид рослин (uk); especie de planta (ast) Carissa Spinarum (fr)

करवंद (इंग्रजीत Karanda; हिंदीत करौंदा, करुम्चा: शास्त्रीय नाव: कॅरिसा कंजेस्टा) हे एक काळ्या रंगाचे छोटे फळ आहे. करवंदे महाराष्ट्रातील पश्चिम घाटातकोकणात खूप प्रमाणात मिळतात. डोंगरकपारीत आपोआप उगवणारी करवंदाची काटेरी झुडपे अनेकदा पाहण्यात येतात. एप्रिल आणि मे हा हे फळ लागण्याचा काळ आहे. कच्ची करवंदे तोडल्यानंतर पांढऱ्या रंगाचा चीक येतो आणि तो हाताला चिकटतो. ही फळे जूनच्या सुमारास पाऊस सुरू झाल्यावर गळून जातात. करवंदांची चटणी करतात आणि शिवाय त्यांच्यापासून सरबत, लोणचे, मोरंबा वगैरे करता येतो.

करवंदांची Carissa spinarum नावाची जी जात आहे ती जम्मू-काश्मीरपंजाबमध्ये कुंपणासाठी आणि सुगंधी फुलांसाठी लावतात. हिच्या पानांमध्ये भरपूर टॅनिन असते. Carissaa carandas ही जात भारतात सर्वत्र उगवते.

हे मध्यम आकाराचे काटेरी झाड असते. पण चांगलाच फल्लर(झुडूपासारखे)वाढते. करवंदा झाड लवकर मोठे होत नाही. खूप हळूहळू वाढते. शेळ्या-बकऱ्या या झाडाचा पाला खात नाहीत. तसेच काटेरी झाड असल्याने कुप (कुंपण) करण्याच्या कामी येते.

उपयोग[संपादन]

पावसाळ्यात फळे -करवंद लागतात . सुंदर दिसतात . करवंदाच्या फळांची भाजी,रायता(लोणचे)चटणी , मुरब्बा करतात.कच्चेपण खातात . काहीजण वरणात टाकतात . चटनीने तोंडात चव येते.करवंदे आंबट असतात . त्यामुळे बाळंतीण बाईला देत नाही कारण आई व लेकरू (बाळ) दोघांनाही खोकला होतो.

करवंद हे उतार अन्न आहे . उतार म्हणजे हे खाल्ल्याने इतर ओषधांचा गुण जातो व इतर औषधी, गोळ्या ,इंजेक्शन लागू पडत नाही.उतार अन्न म्हणून करवंद व जांभूळ या जुळ्या बहिणी आशेत. उतार अन्न असल्यामुळे वर्ण (व्रण किंवा जखम) झाल्यास करवंद मुळीच खात नाही.

संदर्भ[संपादन]

पुस्तकाचे नाव - गोईन लेखीकेचे नाव -डॉ. राणी बंग