चहा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
हिरव्या चहाचा पेला

चहा (शास्त्रीय नाव: Camellia sinensis, कॅमेलिया सिनेन्सिस ; संस्कृत- श्यामपर्णी ,चविका ;चिनी: 茶 , छा ; जपानी: 茶 ;) चहा हे एक झुडपांच्या पानांपासून मिळणारे कृषी उत्पादन आहे. चहा ही संज्ञा कॅमेलिया सिनेन्सिस वनस्पतीसाठी, तसेच त्या वनस्पतीच्या पाने/पानांपासून बनवलेली भुकटी उकळते पाणी अथवा दूध यांच्यासोबत मिसळून बनवलेल्या पेयासाठीही योजली जाते. चहापत्तीपासून निरनिराळ्या प्रक्रिया करून चहा हे पेय उत्पादन बनवले जाते. पाण्याखालोखाल हे जगातील लोकप्रिय पेय आहे असे मानले जाते. चहा या नावाचे मूळ चिनी भाषेत आहे. चिनी भाषांत चहाला छा असे संबोधतात. या नावावरून जगातील बहुतेक भाषांमध्ये चहा, छा, चा, चाय अश्या नावांनी संबोधतात. इंग्रजी व काही पश्चिम युरोपीय भाषांमध्ये दक्षिणेकडील चिनी भाषांमधल्या ते या नावाशी उच्चारसाधर्म्य असलेले टे/ टी हे नाव प्रचलित आहे. चहा आजही लोक आवडीने घेतात. कारण चहा पिल्याने ताजेतवाने होतो किंवा एक प्रकारचा आळस जातो असा देखील समज असल्याचे पाहायला मिळतो.

सोलापूर शहरामध्ये कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर असून आठ तास कामगार काम करत असून त्यामुळे ९० % कामगार हे चहा या पेयाला जास्त प्राधान्य देतात. सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर चहाची दुकाने दिसतील. त्यामुळे बऱ्याच दुकानामध्ये गर्दी देखील हि जास्त दिसते.

चहाचा एक कप


चहाचे प्रकार[संपादन]

बदाम पिस्ता चहा, बिरयानी चहा, गुलाबी चहा, ईराणी चहा, बुरंश चहा, हाजमोळा चहा, सुलेमानी / लेबु चहा.

बदाम पिस्ता चहा[संपादन]

अमृतसर हे बदाम पिस्ता चहासाठी फार प्रसिद्ध आहे. साहित्य: १/२ कप पाणी १ कप मलई दूध साखर २ चमचे चहा पावडर ३-४ केशर बदाम आणि पिस्ता १ चमचा २ ईलायची.

कृती : पाणी उकळत ठेवून त्यामध्ये चहा पाने टाका. उकळी आल्यावर केशर टाका. पुन्हा उकळी काढा.एका भांड्यात मलई दूध उकळून ते वरील चहाच्या मिश्रणात घाला. नंतर साखर घालून पुन्हा उकळी घ्या. हे छोट्या काचेच्या ग्लासात भरून त्यामध्ये किसलेला पिस्ता, बदाम आणि वेलची पूड पसरवून चहा प्यायला द्या.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत