हनुमान फळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हनुमान फळ हे रामफळसीताफळ यांच्या जातीचेच एक फळ आहे. याचे शास्त्रीय नाव Annona Muricata आहे.

हनुमान फळ हे सीताफळाप्रमाणेच असले तरी आकाराने ओबडधोबड असते. ते फळ चवीला अननसाप्रमाणे आंबट-गोड असून त्याचा गर आइस्क्रीमसारखा मऊ असतो, त्यामुळे तो चमच्याने खाता येतो. हनुमान फळात सीताफळापेक्षा खूप कमी बिया असतात.

एका हनुमान फळाचे वजन १०० ग्रॅमपासून दीड ते दोन किलोपर्यंत असते. एका झाडाला सुमारे ४० किलो वजनाची फळे लागतात. फळाचा मौसम नोव्हेंबर ते जानेवारी असा असतो. महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्हयातील बार्शी आणि इंदापूर भागातून हनुमान फळे पुण्याच्या बाजारात येतात.

काही लोक हनुमान फळालाच लक्ष्मण फळ म्हणतात. पण लक्ष्मण फळाचा आकार लंबगोल असतो.