फ्रँक वॉरेल
Appearance
सर फ्रॅंक मॉर्टिमर मॅग्लिन वॉरेल (ऑगस्ट १, इ.स. १९२४:बँक हॉल, सेंट मायकेल, बार्बाडोस - मार्च १३, इ.स. १९६७:किंग्स्टन, जमैका) हा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आणि जमैकाचा सेनेटर होता.
उजव्या हाताने फलंदाजी तर डाव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करणारा वॉरेल इ.स. १९५०मध्ये वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा सर्वप्रथम श्यामवर्णीय नायक झाला. वॉरेल प्रथमवर्गीय क्रिकेटमध्ये ५०० धावांच्या दोन भागीदारी करणारा एकमेव खेळाडू आहे.[१] वॉरेल, एव्हर्टन वीक्स आणि क्लाइड वॉलकॉट या त्रयीला द थ्री डब्ल्युज या नावाने उल्लेखिले जाते.
वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
वेस्ट इंडीजच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
|