"अजिंठा लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २३: | ओळ २३: | ||
[[इ.स. १८३९]] मध्ये जाॅॅन स्मिथ या ब्रिटीश लष्करी अधिकाऱ्याला शिकारीच्या निमित्ताने ही लेणी सापडली आहेत.<ref>अजिंंठा वेरूळ(पुस्तिका) मित्तल पब्लिकेशन</ref> |
[[इ.स. १८३९]] मध्ये जाॅॅन स्मिथ या ब्रिटीश लष्करी अधिकाऱ्याला शिकारीच्या निमित्ताने ही लेणी सापडली आहेत.<ref>अजिंंठा वेरूळ(पुस्तिका) मित्तल पब्लिकेशन</ref> |
||
या लेण्यांचा शोध [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश भारताच्या]] [[मद्रास प्रांत|मद्रास इलाख्यातील]] ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ हा वाघाच्या शिकारीसाठी गेल्याने [[२८ एप्रिल]], [[इ.स. १८१९]] रोजी लागला. स्मिथने येथील दहाव्या क्रमांकाच्या लेणीतील एका खांबावर आपले नाव आणि तारीख कोरून ठेवल्याचे आजही अंधुकपणे दिसून येते. पुरातत्त्वशास्त्रीय पुराव्यानुसार ही लेणी दोन वेगवेगळ्या कालखंडात निर्माण केली गेली. ९, १०, १२, १३ व १५-अ ही लेणी [[हीनयान]] कालखंडात कोरली गेली असावीत. हा कालखंड साधारणतः इ.स. पूर्वीच्या दुसऱ्या शतकाच्या सुमारास सुरू झाला.<ref>http://whc.unesco.org/archive/advisory_body_evaluation/242.pdf</ref> या सगळ्या लेण्यांतून [[बुद्ध|बुद्धांचे]] दर्शन स्तूप-रूपांत होते. या व्यतिरिक्त १ ते २९ क्रमांकांची लेणी साधारणतः ८००-९०० वर्षांनंतर (इ.स.च्या सहाव्या व सातव्या शतकाच्या आसपास) [[महायान]] कालखंडात निर्माण केली गेलेली असावीत. या लेण्यांतून बुद्धांचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसून येते. महायान लेणी [[वाकाटक]] राजांच्या राजवटीत निर्मिली गेली, त्यामुळे त्यांस बऱ्याचदा ''वाकाटक लेणी'' असेही संबोधले जाते. [[वाकाटक साम्राज्य]]ाच्या ऱ्हासानंतर यांचे निर्माण अचानक थांबले व ही लेणी योजित भव्यतेपासून वंचितच राहिली. |
या लेण्यांचा शोध [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश भारताच्या]] [[मद्रास प्रांत|मद्रास इलाख्यातील]] ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ हा वाघाच्या शिकारीसाठी गेल्याने [[२८ एप्रिल]], [[इ.स. १८१९]] रोजी लागला. स्मिथने येथील दहाव्या क्रमांकाच्या लेणीतील एका खांबावर आपले नाव आणि तारीख कोरून ठेवल्याचे आजही अंधुकपणे दिसून येते. पुरातत्त्वशास्त्रीय पुराव्यानुसार ही लेणी दोन वेगवेगळ्या कालखंडात निर्माण केली गेली. ९, १०, १२, १३ व १५-अ ही लेणी [[हीनयान]] कालखंडात कोरली गेली असावीत. हा कालखंड साधारणतः इ.स. पूर्वीच्या दुसऱ्या शतकाच्या सुमारास सुरू झाला.<ref>http://whc.unesco.org/archive/advisory_body_evaluation/242.pdf</ref> या सगळ्या लेण्यांतून [[बुद्ध|बुद्धांचे]] दर्शन स्तूप-रूपांत होते. या व्यतिरिक्त १ ते २९ क्रमांकांची लेणी साधारणतः ८००-९०० वर्षांनंतर (इ.स.च्या सहाव्या व सातव्या शतकाच्या आसपास) [[महायान]] कालखंडात निर्माण केली गेलेली असावीत. या लेण्यांतून बुद्धांचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसून येते. महायान लेणी [[वाकाटक]] राजांच्या राजवटीत निर्मिली गेली, त्यामुळे त्यांस बऱ्याचदा ''वाकाटक लेणी'' असेही संबोधले जाते. [[वाकाटक साम्राज्य]]ाच्या ऱ्हासानंतर यांचे निर्माण अचानक थांबले व ही लेणी योजित भव्यतेपासून वंचितच राहिली. |
||
==इतिहासातील नोंदी== |
|||
मध्ययुगातील अनेक चिनी बुद्धधर्मीय प्रवाशांनी अकबराच्या काळापर्यंत उपलब्ध असलेल्या आपल्या प्रवास वर्णनांत या लेण्यांचा उल्लेख केला आहे. प्रवास वर्णनात याचे उल्लेख सापडतात. जंगलाने वेढलेल्या असल्याने या लेण्या अज्ञात होत्या.<ref>Walter M. Spink (2005). Ajanta: History and Development, Volume 5: Cave by Cave. BRILL Academic. pp. 3, 139. ISBN 90-04-15644-5.</ref> |
|||
== रचना == |
== रचना == |
२२:५५, २५ मार्च २०१८ ची आवृत्ती
अजिंठा लेणी ही औरंगाबाद जिल्ह्यापासून १०० ते ११० कि.मी. अंतरावर वाघूर नदीच्या परिसराशेजारी असलेलेली बौद्ध लेणी आहेत. इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सनाचे ४थे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात या लेण्यांची निर्मिती झाली आहे, असे मानले जाते. या लेणीसूमहामध्ये एकूण २९ लेणी आहेत. ही लेणी नदी पात्रापासून १५-३० मीटर (४०-१०० फूट) उंचीवर विस्तीर्ण अशा डोंगररांगामध्ये कोरलेली आहेत. बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी प्रदीर्घ ऐतिहासिक कालखंडाची पाश्वभूमी लाभलेली अजिंठा लेणी ही जगामध्ये भारताला आंतरराष्ट्रीय पर्यटनाची ठळक ओळख करून देणारी महत्त्वपूर्ण लेणी आहे. या लेणी घनदाट जंगलाने वेढलेल्या आहेत.[१] केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या प्रतिष्ठित पर्यटन स्थळ प्रकल्पात देशातील १२ पर्यटन स्थळांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातील अजिंठा व वेरूळ लेण्यांचा या यादीत समावेश आहे. अजिंठा लेण्यांनधील चित्रांपैकी एका लेण्याचे चित्र भारतीय चलनातील २००० रुपयांच्या एका नोटेवर आहे.
अजिंठा लेण्यांत गौतम बुद्धाच्या विविध भावमुद्रा तसेच बौद्ध तत्त्वज्ञानाला चित्रशिल्प रूपात व्यक्त करणाऱ्या शिल्पकलेचा अद्वितीय अविष्कार पाहायला मिळतो. अशी ही अजिंठा लेणी देशी पर्यटकांसोबतच प्रामुख्याने विदेशी पर्यटकांच्या सर्वाधिक प्रसंतीचे पर्यटन स्थळ ठरले आहे. चित्र—शिल्पकलेचा नितांतसुंदर अनुभव देण्याऱ्या या लेण्यांमधून त्या काळात वापरण्यात आलेल्या रंगछटा पर्यटकांना पाहावयास मिळतात.
वैशिष्ट्ये
या लेणींमधील भिंंती आणि छतांवर चितारलेल्या चित्रांमधून भगवान बुद्धांंच्या जीवनातील विविध प्रसंंग आणि अनेक बौद्ध विभूतींचे चित्रण आढळते. जातक कथांच्या आधारे केलेले कथांचे अंंकन या लेण्यांमध्ये दिसून येते.[२] शिल्पकलेचा उत्कृृष्ट नमुना म्हणून येथील शिल्पे जगभरात मान्यता पावली आहेत. चित्रांमधून व्यक्त होणाऱ्या मानवी भावभावना हे या चित्रांचे वैशिष्ट्य सांगता येते.[३] [४]
इतिहास
प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी क्वचित मंदिरेसुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रय स्थान मिळावे असा असे. त्यांना राजाश्रय, धर्माश्रय व लोकाश्रय असे. अजिंठा गावाजवळच्या लेण्यांची निर्मितीही याच उद्देशातून सुरू झाली असावी असे मानले जाते.
इ.स. १८३९ मध्ये जाॅॅन स्मिथ या ब्रिटीश लष्करी अधिकाऱ्याला शिकारीच्या निमित्ताने ही लेणी सापडली आहेत.[५] या लेण्यांचा शोध ब्रिटिश भारताच्या मद्रास इलाख्यातील ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ हा वाघाच्या शिकारीसाठी गेल्याने २८ एप्रिल, इ.स. १८१९ रोजी लागला. स्मिथने येथील दहाव्या क्रमांकाच्या लेणीतील एका खांबावर आपले नाव आणि तारीख कोरून ठेवल्याचे आजही अंधुकपणे दिसून येते. पुरातत्त्वशास्त्रीय पुराव्यानुसार ही लेणी दोन वेगवेगळ्या कालखंडात निर्माण केली गेली. ९, १०, १२, १३ व १५-अ ही लेणी हीनयान कालखंडात कोरली गेली असावीत. हा कालखंड साधारणतः इ.स. पूर्वीच्या दुसऱ्या शतकाच्या सुमारास सुरू झाला.[६] या सगळ्या लेण्यांतून बुद्धांचे दर्शन स्तूप-रूपांत होते. या व्यतिरिक्त १ ते २९ क्रमांकांची लेणी साधारणतः ८००-९०० वर्षांनंतर (इ.स.च्या सहाव्या व सातव्या शतकाच्या आसपास) महायान कालखंडात निर्माण केली गेलेली असावीत. या लेण्यांतून बुद्धांचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसून येते. महायान लेणी वाकाटक राजांच्या राजवटीत निर्मिली गेली, त्यामुळे त्यांस बऱ्याचदा वाकाटक लेणी असेही संबोधले जाते. वाकाटक साम्राज्याच्या ऱ्हासानंतर यांचे निर्माण अचानक थांबले व ही लेणी योजित भव्यतेपासून वंचितच राहिली.
इतिहासातील नोंदी
मध्ययुगातील अनेक चिनी बुद्धधर्मीय प्रवाशांनी अकबराच्या काळापर्यंत उपलब्ध असलेल्या आपल्या प्रवास वर्णनांत या लेण्यांचा उल्लेख केला आहे. प्रवास वर्णनात याचे उल्लेख सापडतात. जंगलाने वेढलेल्या असल्याने या लेण्या अज्ञात होत्या.[७]
रचना
अजिंठा येथे एकूण २९ लेणी आहेत. ही सर्व लेणी वाघुर नदीच्या आसपास विखुरलेली आहेत. लेणी नदीच्या पात्रापासून १५-३० मीटर (४०-१०० फूट) उंचीवर कातळात आहेत.
हीनयान कालखंडातील लेण्यांपैकी ९ व १० क्रमांकाची लेणी ही चैत्यगृह आहेत व १२, १३, आणि १५-अ क्रमांकाचे लेणे विहार आहे. महायान कालखंडातील लेण्यांपैकी १९, २६ व २९ क्रमांकाची लेणी चैत्यगृहे असून १, २, ३, ५, ६, ७, ८, ११, १४, १५, १६, १७, १८, २०, २१, २२, २३, २४, २५, २७ व २८ क्रमांकाची लेणी विहार आहेत.
या लेण्यांचे क्रमांक त्यांच्या निर्मितीच्या काळानुसार अनुक्रमे दिले आहेत असे असेलच असे नाही. ते सोयीसाठी दिलेले असू शकतात.[८]
- लेणे क्र.१—
येथे वीस खांबांवर आधारित एक दालन आहे. भगवान बुद्धांंच्या पूर्वजन्मावर आधारित जातक कथा येथे दिसून येतात. बुद्धाच्या विविध मुद्रा, पद्मपाणी, दरबार दृृश्य, पक्षी, फुले,फळे यांचे छतांवरील अंंकन या लेण्यात पहायला मिळते.[९]
- लेणे क्र.२—
हंंसाच्या जन्माची कथा, बुद्धांचा जन्म, छतावरील नक्षी यांचे अंंकन या लेण्यात केलेले दिसते.
- लेणे क्र.३—
सदर लेणे अपूर्णावस्थेत आहे.
- लेणे क्र.४—
हे सर्वात मोठे लेणे आहे. यामध्ये २८ खांब असून दरवाजावर द्वारपालांची जोडी आहे. बुद्धाच्या सहा मोठ्या मूर्ती येथे आहेत.
- लेणे क्र.५—
ही लेणी अपूर्णावस्थेत आहेत. बुद्धाच्या काही आकृती येथे कोरलेल्या आहेत.
- लेणे क्र.६—
हे लेणे दोन मजली असून सभागृहात बुद्धाची पद्मासनातील मूर्ती आहे.
- लेणे क्र.७—
आसनस्थ बुद्धाची मूर्ती आणि त्याभोवती प्रभामंडळ आहे.
- लेणे क्र.८—
या लेण्यात काहीही नाही.
- लेणे क्र.९—
या लेण्याची रचना काटकोनात केलेली आहे.चैत्याच्या मध्यभागी अखंड दगडात कोरलेला स्तूप आहे.भिंतीवर बुद्धाचे भावदर्शन घडविणारी अस्पष्ट चित्रे आहेत.
- लेणे क्र.१०—
हे हीनयान मंदिर आहे. यात ४० खांब असून त्यावर कोरीव काम केलेले आहे. या लेण्यातील स्तूपावर पाली भाषेतील लेख ब्राह्मी लिपीत कोरलेला आहे. या लेण्याची निर्मिती इ.स.पू. दुसऱ्या शतकाच्या आधी झाली असे या लेखावरून दिसून येते.[१०]
- लेणे क्र.११—
सभामंडपात पूजास्थानी बुद्धाची मूर्ती आहे.
- लेणे क्र.१२ ते १५—
या लेण्यांमध्ये विशेष काही नाही.
- लेणे क्र.१६—
या लेण्यात महत्वाची चित्रे आहेत. बुद्धाच्या जीवनातील घटना येथे दाखविण्यात आल्या आहेत. कथकली नृत्याचे येथील चित्रे उल्लेखनीय आहे.
- लेणे क्र.१७—
या लेण्यात बुद्धाच्या जीवनातील प्रसंग कोरले आहेत. भगवान बुद्ध आपली पत्नी यशोधरा आणि मुलगा राहुल यांच्याकडे भिक्षा मागत असल्याचे प्रसिद्ध चित्र या लेण्यात आहे. पूवजन्मी बुद्ध अनेक तोंडी हत्ती असल्याचे चित्रही या लेण्यात दिसते. याथील छतावर परीकथा चित्रित केल्या आहेत.[११]
- लेणे क्र.१८—
हे लेणे रिकामे आहे.
- लेणे क्र.१९—
हे घोड्याच्या नालेच्या आकाराचे मंदिर आहे. तीन छत्रींचा एक स्तूप येथे असून त्यावर बुद्धमूर्ती कोरलेल्या आहेत.
- लेणे क्र.२१—
हा अंशतः अपूर्ण राहिलेला विहार आहे. या विहारात नक्षीकाम केलेले स्तंभ आहेत. भगवान बुद्ध आपल्या शिष्यांना प्रवचन देत असल्याचे चित्रपट येथील भिंतीवर पहायला मिळते. समृद्धीची देवता हरिती, तिचे सेवक, सर्पराज नागाचा दरबार अशी शिल्पे येथे दिसून येतात.[१२]
- लेणे क्र.२२—
यामध्ये सात मानुषी बुद्ध बोधिवृक्षाखाली मैत्रेयासह चित्रित केलेले दिसतात. उर्वरित लेणे अपूर्ण आहे.
- लेणे क्र.२३—
हे लेणे अपूर्ण आहे.
- लेणे क्र.२४—
क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे लेणे मोठे आहे. याची भव्यता आणि कलात्मकता वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. जलदेवता, नागराज, द्वारपाल अशी शिल्पे येथे दिसून येतात.
- लेणे क्र.२५—
हा अपूर्ण विहार आहे.
- लेणे क्र.२६—
भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण शिल्पांकित केलेले या लेण्यात दिसून येते.
- लेणे क्र.२७—
हे लेणे दोन मजली असून अपूर्णावस्थेत आहे.
- लेणे क्र.२८—
२८ क्रमांकाच्या लेण्यात स्तंभ व अंगण आहे.
- लेणे क्र.२९–
२९ क्रमांकाच्या लेण्यात फक्त खोदकाम झालेले दिसते.[१३]
विहार साधारणपणे चौरस आकाराचे असून त्यांची लांबी-रुंदी १७ मीटर (५२ फूट) पर्यंत आहे. हे विहार मुख्यत्वे भिक्खूंना राहण्यासाठी होते तर चैत्यगृह हे पारंपरिकरीत्या पूजाअर्चेसाठी वापरण्यात येत. कालांतराने विहारांतही मूर्तींची स्थापना झाली. बऱ्याच विहारांना सोपा व आंगण करण्यात आले व तेथे दगडात कलाकुसर व चित्रे काढण्यात आली.
जागतिक वारसा स्थान
अजिंठा लेणी ही जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने इ.स. १९८३ साली घोषित केली आहे.[१४] आणि या लेणीला भारतातील पहिल्या जागतिक वारसा स्थळाचा मान आहे.[१५]
महाराष्ट्राचे आश्चर्य
महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी अजिंठा लेण्या हे एक आश्चर्य ठरले आहे.[१६] महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. शांती-सद्भावनेचं प्रतीक ग्लोबल पॅगोडा, मुंबईच्या मध्य रेल्वेचं मुख्यालय सीएसटी स्टेशन, मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला दौलताबादचा किल्ला, पश्चिम घाटातील कास पठार, स्वराज्याची पहिली राजधानी रायगड किल्ला, बुलडाण्यातील लोणार सरोवर, औरंगाबादमधील अजिंठा लेणी ही महाराष्ट्राची सात आश्चर्ये आहेत. जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात आश्चर्य निवडली गेली आहेत. जागतिक स्तरावर जशी सात आश्चर्ये निवडली गेली, त्याच धर्तीवर ‘एबीपी माझा’ने महाराष्ट्रातूनही सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्रा[१७] कार्यक्रमाच्या माध्यमातून सात आश्चर्य निवडली. डॉ. जगदीश पाटील, डॉ. अरुण टीकेकर, राजीव खांडेकर, श्री. अरविंद जामखेडकर, डॉ. निशीगंधा वाड, श्री. विकास दिलावरी, श्री. व्ही. रंगनाथन या सात ज्युरीने निवडलेल्या १४ आश्चर्यांपैकी सात वंडर्सची निवड करण्यात आली.
सुद्धा पहा
- रॉबर्ट गिल
- वेरूळ (औरंगाबाद जिल्ह्यातील गाव)
- वेरूळ लेणी
- अजिंठा (औरंगाबाद जिल्ह्यातील गाव)
- अजिंठा-वेरुळची लेणी
संदर्भ
- ^ Gopal, Madan (1990). K.S. Gautam, ed. India through the ages. Publication Division, Ministry of Information and Broadcasting, Government of India. p. 173.
- ^ Richard S. Cohen (1998), Nāga, Yakṣiṇī, Buddha: Local Deities and Local Buddhism at Ajanta, History of Religions, University of Chicago Press, Vol. 37, No. 4 (May, 1998), pages 360–400 Benoy K. Behl; Sangitika Nigam (1998). The Ajanta caves: artistic wonder of ancient Buddhist India. Harry N. Abrams. pp. 164, 226. ISBN 978-0-8109-1983-9.
- ^ Trudy Ring; Noelle Watson; Paul Schellinger (2012). Asia and Oceania. Routledge. pp. 17, 14–19. ISBN 978-1-136-63979-1. Hugh Honour; John Fleming (2005). A World History of Art. Laurence King. pp. 228–230. ISBN 978-1-85669-451-3
- ^ अजिंंठा वेरूळ,मित्तल पब्लिकेशन,पृृष्ठ ३—४
- ^ अजिंंठा वेरूळ(पुस्तिका) मित्तल पब्लिकेशन
- ^ http://whc.unesco.org/archive/advisory_body_evaluation/242.pdf
- ^ Walter M. Spink (2005). Ajanta: History and Development, Volume 5: Cave by Cave. BRILL Academic. pp. 3, 139. ISBN 90-04-15644-5.
- ^ https://en.m.wikipedia.org/wiki/Special:BookSources/978-1-884964-04-6
- ^ अजिंठा वेरूळ, मित्तल प्रकाशन, पृष्ठ ७
- ^ अजिंठा वेरूळ,मित्तल प्रकाशन,पृष्ठ १०
- ^ अजिंठा वेरूळ,मित्तल प्रकाशन,पृष्ठ १२
- ^ अजिंठा वेरूळ,मित्तल प्रकाशन,पृष्ठ १४
- ^ अजिंठा वेरूळ, मित्तल प्रकाशन
- ^ स्पिंक, वॉल्टर एम. (इंग्रजी भाषेत) http://books.google.co.in/books?id=UPqUHXlwXdcC&pg=PA3&redir_esc=y#v=onepage&q&f=false. २६ एप्रिल, २०१२ रोजी पाहिले.
Going down into the ravine where the caves were cut, he scratched his inscription (John Smith, 28th Cavalry, 28th April, 1819) across the innocent chest of a painted Buddha image on the thirteenth pillar on the right in Cave 10..
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ http://asi.nic.in/asi_monu_tktd_maharashtra.asp
- ^ महाराष्ट्रातील सात आश्चर्यांची घोषणा
- ^ https://www.adgully.com/abp-majha-launches-seven-wonders-of-maharashtra-campaign-54575.html