रॉबर्ट गिल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रॉबर्ट गिल
Robert Gill.jpg
अजिंठा लेणीत रॉबर्ट गिल (इ.स. १८६९ मधील छायाचित्र)
जन्म २६ सप्टेंबर, १८०४
लंडन, इंग्लंड
मृत्यू १० एप्रिल, १८७५ (वय ७०)
अजिंठा ते भुसावळ मार्गावर
प्रसिद्ध कलाकृती अजिंठा लेणीतील चित्रांच्या प्रतिकृती.

रॉबर्ट गिल (२६ सप्टेंबर, इ.स. १८०४ - १० एप्रिल, इ.स. १८७५) हा ब्रिटिश भारतातील एक सैन्याधिकारी, चित्रकार तसेच छायाचित्रकार होता. अजिंठा येथील चित्रशिल्पांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांची प्रतिकृती तयार करण्यासाठी इंग्रजांनी इ.स. १८४४ मध्ये त्यांच्या सैन्यातील चित्रकार रॉबर्ट गिल याची नेमणूक केली. ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’त चित्रकला शिकलेला मेजर गिल हा अजिंठय़ाच्या पायथ्याशी असलेल्या लेणापूर गावी दाखल झाल्यानंतर त्याची भेट पारो या स्थानिक तरुणीशी झाली. लेण्यांचे आणि या चित्रांचे महत्त्व जाणणाऱ्या पारोने त्याला नैसर्गिक रंगसाहित्य पुरवण्यापासून सर्वतोपरी सहाय्य केले. या दोघांत एक प्रकारचे नाते निर्माण झाले. मात्र या नात्याला काही नाव नसल्याने ग्रामस्थांकडून त्यांना जोरदार विरोध झाला.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ अनिरुद्ध भातखंडे (२५ मे २०१२). "गीतशिल्प अजिंठय़ाचे!" (मराठी मजकूर). लोकप्रभा. १३ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.