चांदोली धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून • उखळू(म्हातारकडा)धबधबा*

_*चांदोली परिसरात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असते. त्यामुळे ओढे, नदी, नाले, तुडुंब वाहत असतात. ठिकठिकाणी कोसणारे धबधबे, उडणारे तुशार, पावसाच्या हलक्या सरी यामुळे परिसर नयनरम्य दिसू लागतो.*_

 _सुमारे तीनशे फूट उंचीवरून फेसाळत कोसळणारा हा धबधबा अत्यंत मनमोहक आहे. आजूबाजूची हिरवीगार वनराई. अल्हादायक वातावरण येथील निसर्ग सौंदर्यात भर टाकत आहे. मात्र घनदाट जंगलात असल्याने आणि इथपर्यंत पोहचण्यासाठी मार्गच नसल्यामुळे तो पर्यटकांच्या नजरेपासून वंचित होता. त्यातूनही या धबधब्यापर्यंत  पोचायचचं म्हटलं तर चांदोली धरणाच्या पायथ्याला असणाऱ्या उखळू गावापासून पश्चिमेला साधारण तीन ते चार किलोमीटर अंतर जंगलात जावे लागते. जाताना पायवाट निर्माण करावी लागते._ 
  _नवीन पर्यटकांना जंगलात चुकण्याचा धोकाही संभवतो त्यासाठी स्थानिकांना सोबत घेऊन जावे लागते. घनदाट जंगलातून जाताना रक्त शोषणाऱ्या जळूंचा (कानिट) सामना करत करत इथपर्यंत पोहोचावं लागते. हा अत्यंत खडतर प्रवास  करताना पर्यटक पुन्हा इथपर्यंत येण्याचं धाडस करत नाही. मात्र इथे पोहोचल्यानंतर या धबधब्याचे मनमोहक रूप पाहिल्यानंतर केलेला खडतर प्रवास तो विसरून जातो. डोळ्यांत साठवून ठेवावं असं येथील सौंदर्य पाहिल्यावर पर्यटकांचा थकवा निघून जातो.
 _पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने हा धबधबा कोसळत असल्यामुळे तो अत्यंत मनमोहक वाटतो. गेल्या चार वर्षांपासून या धबधब्याचं सौंदर्य येथील दुरावस्था, इथपर्यंत पोहोचण्यासाठी येणाऱ्या अडचणी   प्रसारमाध्यमांनी शासन तसेच  प्रशासनापुढे मांडल्या आहेत. मात्र याची कोणीही दखल घेतलेली नाही आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने याकडे लक्ष देऊन या धबधब्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग केला तर अनेक पर्यटक या धबधब्यापर्यंत पोहोचतील एकूणच चांदोलीच्या वैभवात भर पडेल._
 • कसे जाल?*
 _मुंबई वरून येताना पुणेमार्गे कराड ते उखळू ५७ किमी. अंतर आहे._
 _सांगली वरून येताना शिराळा ते उखळू ५० किमी. अंतर आहे._
  _कोल्हापूर वरून येताना शिराळा ते उखळू ५० किमी.अंतर आहे._
  _रत्‍नागिरी वरून येताना आंबा घाट मार्गे मलकापूर ते उखळू ४७ किमी अंतर आहे._
 • राहण्याची सोय*

_उखळू गावच्या अलीकडे वारणावती वसाहत मध्ये शासकीय विश्रामगृह आहे,तिथे राहण्याची सोय आहे_

 • हे पण बघा*

_धबधब्याच्या शेजारी चांदोली धरण आहे चांदोली अभयारण्य ही आहे... त्यामुळे चांदोलीचा निसर्गरम्य परिसर देखील पाहायला मिळतो._

 • स्थानिकांच्या मदतीनेच धबधब्यापर्यंत पोहोचायला हवा*

_गेल्या दोन वर्षांपूर्वी बागणी येथील काही तरुण या धबधब्यापर्यंत पोहोचले होते. येथील परिस्थितीचा त्यांना अंदाज नसल्यामुळे यातील एक पर्यटक येथील पाण्यात वाहून गेला होता त्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांनी येथील स्थानिक नागरिकांच्या मदतीनेच या धबधब्यापर्यंत पोहोचायला हवा._

_शिराळा तालुक्याच्या पश्चिमेला असणाऱ्या उखळू धबधबा,चांदोली धरण, चांदोली राष्ट्रीय उद्यानाला एकवेळ अवश्य द्या भेट_