मांजरा धरण
मांजरा धरण | |
अधिकृत नाव | मांजरा |
---|---|
धरणाचा उद्देश | सिंचन |
अडवलेल्या नद्या/ प्रवाह |
मांजरा |
स्थान | गाव: धणेगाव, तालुका: केज , जिल्हा: बीड |
सरासरी वार्षिक पाऊस | ७०० मिमी |
बांधकाम सुरू | आ. केशवराव सोनवणे (१९६६) |
उद्घाटन दिनांक | १९८०-१९८४ |
जलाशयाची माहिती | |
क्षमता | ३७१.२७ दशलक्ष घनमीटर |
मांजरा धरण मांजरा नदीवरील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील धरण आहे. प्रकल्पिय साठा क्षमता, एकूण साठा = 224.09 दलघमी (8 TMC), उपयुक्त साठा = 176.96 दलघमी, मृत साठा = 47.130 दलघमी, पूर्ण संचय पातळी = 642.37 मी.
मांजरा धरणाचे पाणलोट क्षेत्र महासांगवी,पाटोदा,पांढरेवाडी,चौसाळा,पारगाव(वाशी),केज,नेकनूर,कळंब या ठिकाणी पाऊस पडल्यास मांजरा धरणाच्या पाणी पातळीत वाढ होते.
कृष्णा-नीरा-सीना-मांजरा नदीजोड प्रकल्पाद्वारे बोगद्यातून कृष्णा,नीरा नदी खोऱ्यातील पाणी मांजरा धरणात आणण्यासाठी काम सुरू आहे.
धरणाची माहिती
[संपादन]बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची : 42.10 मी (सर्वोच्च)
लांबी : ४२०३ मी
दरवाजे
[संपादन]प्रकार : S - आकार
लांबी : २६० मी.
सर्वोच्च विसर्ग : ६००० घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : १८, (१२ X ५ मी)
पाणीसाठा
[संपादन]क्षेत्रफळ : ४३.९२३ वर्ग कि.मी.
क्षमता : २५०.७० दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : १७३.३२ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : ४३४९.३० हेक्टर
कालवा
[संपादन]डावा कालवा
[संपादन]लांबी : ९० कि.मी.
क्षमता : ८ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : २३६९० हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : २१३२१ हेक्टर
उजवा कालवा
[संपादन]लांबी : ७८ कि.मी.
क्षमता : ८ घनमीटर / सेकंद
धरणाचे वैशिष्ट्य
[संपादन]लातूर शहर, अंबाजोगाई, धारूर, केजसह, ७२ गावांना पाणीपुरवठा मांजरा धरणातून होतो. या धरणाची ओळख त्याच्या स्थानिक गावावरून "धनेगाव धरण" अशीही होते. हे धरण मुख्यतः दुष्काळी ओळखल्या जाणाऱ्या भागात असल्यामुळे ते जास्त रिकामेच असते. १४ सप्टेंबर २०१६ रोजी धनेगाव धरणात थेंबरही पाणी नव्हते. केवळ १० दिवसांत हे धरण ७७ टक्के भरले. २००७ सालानंतर पहिल्यांच या धरणात एवढा मोठा पाणीसाठा झाला[१]