उजनी धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उजनी धरण
Ujanidam 16513.jpg
उजनी धरणाचे चित्र
अधिकृत नाव उजनी धरण
धरणाचा उद्देश सिंचन

स्थान[संपादन]

पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यात भीमानगर या गावाजवळ, भीमा नदीवरचे हे एक मोठे धरण आहे. याचे पाणी पुढे नीरा-नृसिंहपूर येथे नीरा नदीला जाऊन मिळते. सोलापूर जिल्ह्यातील एकमेव व एकच धरण उजनी धरणाला 'यशवंतसागर' असेही संबोधले जाते.

उजनी धरणाजवळचे पार्श्वनाथ मंदिर

क्षमता[संपादन]

उजनी धरण या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या धरणाची पाणी साठविण्याची क्षमता 1517 गिगालिटर्स (GigaLitres) एवढी प्रचंड आहे.114 टि.एम.सी

वैशिष्टय[संपादन]

क्षमतेच्या बाबतीतला या धरणाचा क्रमांक कोयनाजायकवाडी यांच्यानंतर तिसरा लागतो. या धरणात पोचणारे पाणी थेट पुण्याच्या मुळामुठा सारख्या अनेक नद्यांमधून येते. एवढी मोठी जलक्षमता असलेला हा तलाव असल्याने येथे मत्स्यपालनाचा व्यवसाय ही मोठ्या प्रमाणात चालतो. या धरणाच्या जलाशयास यशवंतसागर म्हणतात. फ्लेमिंगो (रोहित) हा परदेशी पक्षी हिवाळ्यात या जलाशयावर येतो.

अवैध वाळू उपसा[संपादन]

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बेसुमार वाळू उपसा केल्याने पर्यावरण धोक्यात आले आहे. धरणाच्या क्षमतेवरही अनिष्ट परिणाम होत आहे. महसूल विभागाची धडक मोहीम व बेकायदा बोटी जप्त करणे अशा कारवायांनाही वाळू माफिया दाद देत नाहीत. बोटी राजकीय दबावाखाली पुन्हा ताब्यात घेतल्या जातात. त्यामुळे या बोटी कठोर अधिकाऱ्यांनी स्फोटाने उडवून देण्याच्या घटनाही घडत आहेत.[१] बहुतांश वेळेला अधिकारी, राजकारणी व ठेकेदार यांची अभद्र युती होत असल्याने बेसुमार उपसा सतत होत राहतो.[२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. वाळूचा अवैध उपसा करणाऱ्या ४० बोटी स्फोटाने उडविल्या.
  2. उजनी परिसरातून बेसुमार वाळूउपसा - भिगवण, डिकसळ, कुंभारगाव, डाळज भागांत शेकडो फायबर बोटींचे बस्तान, महसूलचे अर्थपूर्ण दुर्लक्ष.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

बाह्य दुवे[संपादन]

पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या

पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे