डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चंद्रपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. आंबेडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हे चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने इ.स. १९७० मध्ये केवळ ४२० विद्यार्थ्यांसह स्थापन केलेले महाविद्यालय आहे. आता हे भव्य बनले आहे. आज सुमारे ४,५०० विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये शिकत आहेत. गरीब व वंचित विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आणि भारतीय संविधानाच्या प्रस्तावनामध्ये समाविष्ट असलेली स्वतंत्रता, समानता आणि बंधुता ही मानवी मूल्ये त्यांच्यात रूजवण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न आहे.[१] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर १६ ऑक्टोबर १९५६ रोजी ३ लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती, त्याच मैदानावर हे महाविद्यालय उभारले गेले आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Dr.Ambedkar College". www.dacchanda.ac.in (इंग्रजी भाषेत). 2018-06-22 रोजी पाहिले.