Jump to content

महाराष्ट्राचे विशेष दिवस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र शासनाने काही 'विशेष दिवस' जाहीर केले आहेत. हे दिवस राज्यात अनेक ठिकाणी साजरे होतात. हे सर्व दिवस प्रादेशिक स्वरूपाचे असून महाराष्ट्रापुरतेच मर्यादित आहेत.[१]

यादी[संपादन]

महाराष्ट्राचे विशेष दिन
अ.क्र. तारीख नाव टीप
३ जानेवारी बालिका दिन सावित्रीबाई फुले जयंती
६ जानेवारी पत्रकार दिन[२] बाळशास्त्री जांभेकर स्मृतिदिन
२६ फेब्रुवारी सिंचन दिन शंकरराव चव्हाण स्मृतिप्रीत्यर्थ
२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन कुसुमाग्रज जयंती
१० मार्च उद्योग दिन लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर स्मृतिप्रीत्यर्थ
१२ मार्च समता दिन यशवंतराव चव्हाण स्मरणार्थ
११ एप्रिल शिक्षक हक्क दिन महात्मा फुले जयंती
१४ एप्रिल ज्ञान दिन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
१ मे महाराष्ट्र दिन , मराठी राजभाषा दिन महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस
१० १० मे जलसंधारण दिन सुधाकरराव नाईक स्मृतिप्रीत्यर्थ
११ २६ जून सामाजिक न्याय दिन शाहू महाराज जयंती
१२ १ जुलै कृषि दिन वसंतराव नाईक जयंती
१३ २९ ऑगस्ट शेतकरी दिन विठ्ठलराव विखेपाटील स्मरणार्थ
१४ १ सप्टेंबर रेशीम दिन
१५ २२ सप्टेंबर श्रमप्रतिष्ठा दिन कर्मवीर भाऊराव पाटिल स्मरणार्थ
१६ २८ सप्टेंबर राज्य माहिती अधिकार दिन
१७ ५ नोव्हेंबर रंगभूमी दिन विष्णूदास भावे जयंती
१८ ७ नोव्हेंबर विद्यार्थी दिन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मरणार्थ
१९ १४ नोव्हेंबर जैवतंत्रज्ञान दिन
२० २६ नोव्हेंबर हुंडाबंदी दिन

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ जाधवर, देवा (२०१९). चालु घडामोडी (५० वी आवृत्ती). पुणे: युनिक ॲकॅडमी पब्लिकेशन प्रा. लि. pp. १२८.
  2. ^ "Navabharat भारत में पहली बार 'रोडिओ' नामक यह रोबोट संभालेगा ट्रैफिक, ऐसे करेगा काम".[permanent dead link]