कफ परेड
Appearance
कफ परेड मुंबईतील एक उच्चभ्रू निवासी भाग आहे. नेव्ही नगर आणि बधवार पार्कच्या मध्ये असलेल्या या भागात अनेक श्रीमंती घरे आहेत.
या भागाचे नाव बॉम्बे सिटी इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट या संस्थेच्या टी.डब्ल्यू. कफ यांच्या नावे ठेवण्यात आले आहे. या संस्थेने १९६० च्या दशकात समुद्रात ७५,००० मी² जागेवर भराव टाकून नवीन जमीन निर्माण केली. त्यानंतर येथे अनेक मोठ्या इमारती बांधल्या गेल्या. त्यातील अनेक इमारती ३० मजल्यांपेक्षा उंच होत्या.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |