महालक्ष्मी (मुंबई)
Appearance
महालक्ष्मी हा दक्षिण मुंबईमधील एक भाग आहे. येथे महालक्ष्मीचे देउळ आहे. वरळीपासून पुढे हाजी अली मार्गे हे मंदिर लागते. टेकडीच्या उतारावर समुद्र किनाऱ्यावर हे मंदिर आहे. दुर्गेचे प्रतिक असलेल्या महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती अशा तीन देवींच्या मूर्ती या मंदिरात आहेत. साधारणपणे २०० वर्षां पेक्षा जास्त जुन्या असलेल्या या मंदिरातील मूर्ती वरळी समुद्रातून काढण्यात आल्याचे सांगितले जाते. नवरात्रोत्सवात येथे नऊ दिवस मोठा उत्सव असतो.