"बौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धर्माचे थोर उपासक होते, तसेच ते बौ...
(काही फरक नाही)

१६:२२, ६ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धर्माचे थोर उपासक होते, तसेच ते बौद्ध धर्माचे प्रवर्तक व महान बोधीसत्व होते. बाबासाहेबांनी भारतामध्ये बौद्ध धर्म पुनर्जीवीत केला. आज संपूर्ण भारतातील बौद्धांपैकी सुमारे ९० टक्के बौद्ध हे आंबेडकरांच्या नवयान बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात बौद्ध धर्माची बीजं हळूहळू व बालपणापासून रुजत गेली. शेवटी त्यांनी कोटय़वधी अनुयायांसह केलेला बौद्ध धर्माचा स्वीकार ही क्रांतिकारक घटना होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिकजवळील येवला येथे धर्मातराची घोषणा केली. त्या वेळेस आपण कोणत्या धर्माचा स्वीकार करणार हे त्यांनी घोषित केले नव्हते. ३० व ३१ मे १९३६ रोजी मुंबई इलाखा महार परिषद मुंबई येथे घेण्यात आली. या परिषदेत धर्मातराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.