"माधुरी दीक्षित" च्या विविध आवृत्यांमधील फरक
removed Category:हिंदी चित्रपट अभिनेते - हॉटकॅट वापरले |
No edit summary |
||
ओळ ४९: | ओळ ४९: | ||
== व्यक्तिगत आयुष्य == |
== व्यक्तिगत आयुष्य == |
||
१७ ऑक्टोबर, [[इ.स. १९९९]] रोजी माधुरी दीक्षित डॉ. [[श्रीराम माधव नेने]] यांच्याशी विवाहबद्ध झाली. डॉ. नेने हे हृदयविकार तज्ज्ञ आहेत. जवळ जवळ १२ वर्षे अमेरिकेमध्ये राहिल्यानंतर माधुरी आपल्या कुटुंबासमवेत ऑक्टोबर २०११मध्ये मुंबई मध्ये परत आली.<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=Finally! Madhuri Dixit is back in India{{मृत दुवा}}|दुवा=http://www.hindustantimes.com/Finally-Madhuri-Dixit-is-back-in-India/Article1-754969.aspx|ॲक्सेसदिनांक=१० ऑक्टोबर २०११|प्रकाशक=[[हिंदुस्तान टाईम्स]]|भाषा=इंग्रजी}}</ref> |
१७ ऑक्टोबर, [[इ.स. १९९९]] रोजी माधुरी दीक्षित डॉ. [[श्रीराम माधव नेने]] यांच्याशी विवाहबद्ध झाली. डॉ. नेने हे हृदयविकार तज्ज्ञ आहेत. जवळ जवळ १२ वर्षे अमेरिकेमध्ये राहिल्यानंतर माधुरी आपल्या कुटुंबासमवेत ऑक्टोबर २०११मध्ये मुंबई मध्ये परत आली.<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=Finally! Madhuri Dixit is back in India{{मृत दुवा}}|दुवा=http://www.hindustantimes.com/Finally-Madhuri-Dixit-is-back-in-India/Article1-754969.aspx|ॲक्सेसदिनांक=१० ऑक्टोबर २०११|प्रकाशक=[[हिंदुस्तान टाईम्स]]|भाषा=इंग्रजी}}</ref> |
||
==आंतरराष्ट्रीय दूरचित्रवाणी मालिका== |
|||
एकोणीसशे नव्वदीचा काळ गाजवलेल्या धकधक गर्ल माधुरी दीक्षित-नेने हिच्या आयुष्यावर एक आंतरराष्ट्रीय मालिका येणार आहे. यानिमित्त कार्यकारी निर्माता म्हणून प्रियांका चोप्रा आणि एबीसी स्टुडियोज हिची निर्मिती करत आहे. |
|||
माधुरीने अमेरिकेत स्थायी झाल्यावर तिच्या कुटुंबासोबत जगत असताना काय गमतीजमती घडल्या हे या कॉमेडी सीरिजमध्ये दाखवण्यात येईल. ही सिंगल कॅमेरा सीरिज असेल. 'ग्रेज अॅनाटॉमी', 'क्वांटिको' यांसारख्या मालिकांना सुपरहिट करणारी टीम या आगामी प्रोजेक्टसाठी काम करते आहे. (ऑगस्ट २०१७ची बातमी). |
|||
== पुरस्कार == |
== पुरस्कार == |
१२:१९, ३१ जुलै २०१७ ची आवृत्ती
माधुरी दीक्षित | |
---|---|
माधुरी दीक्षित | |
जन्म |
१५ मे, १९६७ मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनेत्री |
कारकीर्दीचा काळ | इ.स. १९८४ - |
भाषा | हिंदी भाषा, इंग्लिश भाषा , मराठी भाषा |
पती | श्रीराम नेने |
अपत्ये | रयान, अरीण |
अधिकृत संकेतस्थळ | www.madhuridixit-nene.com |
माधुरी दीक्षित (मे १५, इ.स. १९६७ - हयात) ही हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी अभिनेत्री आहे. माधुरीने इ.स. १९८० च्या दशकाची शेवटची काही वर्षे आणि इ.स. १९९० च्या दशकात हिंदी चित्रपटांतील एक नावाजलेली अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून आपले स्थान पक्के केले. व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरलेल्या बऱ्याच चित्रपटांत तिने काम केले. त्यांत तिच्या अभिनयाची व नृत्यकौशल्याची खूप वाहवा झाली. इ.स. २००८ मध्ये भारत सरकारतर्फे तिला भारताचा चौथा महत्त्वाचा नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
आरंभीचे आयुष्य
माधुरी दीक्षित हिचा जन्म मुंबईमध्ये शंकर आणि स्नेहलता दीक्षित या मराठी मातापित्यांच्या घरी झाला. माधुरीने डिव्हाइन चाइल्ड हायस्कूल शाळेमध्ये आपले प्राथमिक शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतल्यावर सूक्ष्मजीवतज्ज्ञ होण्याचा तिचा मानस होता. ती तरबेज कथक नृत्यांगना आहे. तिने सुमारे ८ वर्षे नृत्याचे शिक्षण घेतले होते.
चित्रपट कारकीर्द
माधुरीने इ.स. १९८४ साली "अबोध" या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. "दयावान (हिंदी चित्रपट)" आणि "वर्दी" यांसारख्या चित्रपटांमध्ये दुय्यम भूमिका केल्यावर इ.स. १९८८ साली तिला तिचा पहिला मोठा चित्रपट तेजाब मिळाला. त्यात तिची प्रमुख भूमिका होती. ह्या चित्रपटाद्वारे तिला खूप प्रसिद्धी मिळाली; तसेच तिला तिचे पहिले फिल्मफेअर पुरस्कारांचे नामांकनदेखील मिळाले. त्यानंतर तिने बऱ्याच हिट चित्रपटांमध्ये कामे केली. "राम लखन" (इ.स. १९८९), "परिंदा" (इ.स. १९८९), "त्रिदेव" (इ.स. १९८९), "किशन कन्हय्या" (इ.स. १९९०) आणि "प्रहार" (इ.स. १९९१), हे तिचे या काळातील प्रमुख चित्रपट होते. यापैकी काही चित्रपटांत अनिल कपूर तिचा सहकलाकार होता.
इ.स. १९९० मध्ये तिने इंद्रकुमार याच्या दिल चित्रपटात आमिर खान याच्या नायिकेची भूमिका साकारली. त्या वर्षी हा चित्रपट तिकीट खिडकीवरचा सर्वांत यशस्वी चित्रपट ठरला. या चित्रपटातील अभिनयासाठी माधुरीला तिचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
दिल चित्रपटाच्या यशानंतर माधुरीच्या हिट चित्रपटांची जणू काही मालिकाच सुरू झाली. "साजन" (इ.स. १९९१), "बेटा" (इ.स. १९९२),"खलनायक" (इ.स. १९९३), "हम आप के है कौन" (इ.स. १९९४), " राजा" (इ.स. १९९५) असे अनेक लोकप्रिय चित्रपट तिने दिले. बेटा चित्रपटामधील अभिनयासाठी तिला तिचा दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
"हम आप के है कौन" या चित्रपटाने तर विक्रमी उत्पन्न कमवीत हिंदी चित्रपटसृष्टीच्या तत्कालीन इतिहासात सर्वाधिक कमाई करण्याचा उच्चांक गाठला. या चित्रपटाने भारतात ६५ कोटीं रुपयांहून अधिक, तर परदेशांत १५ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटातील अभिनयाने तिला तिचा तिसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. तसेच त्याच वर्षी आलेल्या "अंजाम" या सिनेमातील तिच्या भूमिकेसाठीही तिला पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. "अंजाम" चित्रपटामधील अभिनयाबद्दल समीक्षकांकडून तिला प्रशंसा लाभली.
इ.स. १९९६ या थोड्याशा अयशस्वी वर्षानंतर माधुरी यश चोप्रांच्या इ.स. १९९७ च्या "दिल तो पागल है" या चित्रपटात "पूजा" ही व्यक्तिरेखा साकारताना दिसली. या चित्रपटाने व्यावसायिक यशासोबतच समीक्षकांची प्रशस्तीही मिळवली. याच वर्षी प्रकाश झा यांच्या "मृत्युदंड" या चित्रपटातही तिने अभिनय केला. या चित्रपटाने जिनीव्हा तसेच बँकॉक येथील चित्रपट महोत्सवांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक पटकावले.
माधुरी ही गुणी अभिनेत्री तर आहेच, शिवाय एक चांगली नर्तकी म्हणूनदेखील प्रसिद्ध आहे. एक दो तीन (तेजाब), हम को आज कल है (सैलाब), बडा दुख दिन्हा (राम लखन), धक धक (बेटा), चने के खेतमे (अंजाम), दीदी तेरा देवर दीवाना (हम आपके है कौन ), चोली के पीछे (खलनायक ), अखिया मिलाऊ (राजा), मेरा पिया घर आया (याराना), के सेरा सेरा (पुकार), मार डाला (देवदास) या गाण्यांमधील तिने केलेल्या नृत्यांची प्रशंसा झाली.
व्यक्तिगत आयुष्य
१७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ रोजी माधुरी दीक्षित डॉ. श्रीराम माधव नेने यांच्याशी विवाहबद्ध झाली. डॉ. नेने हे हृदयविकार तज्ज्ञ आहेत. जवळ जवळ १२ वर्षे अमेरिकेमध्ये राहिल्यानंतर माधुरी आपल्या कुटुंबासमवेत ऑक्टोबर २०११मध्ये मुंबई मध्ये परत आली.[१]
आंतरराष्ट्रीय दूरचित्रवाणी मालिका
एकोणीसशे नव्वदीचा काळ गाजवलेल्या धकधक गर्ल माधुरी दीक्षित-नेने हिच्या आयुष्यावर एक आंतरराष्ट्रीय मालिका येणार आहे. यानिमित्त कार्यकारी निर्माता म्हणून प्रियांका चोप्रा आणि एबीसी स्टुडियोज हिची निर्मिती करत आहे.
माधुरीने अमेरिकेत स्थायी झाल्यावर तिच्या कुटुंबासोबत जगत असताना काय गमतीजमती घडल्या हे या कॉमेडी सीरिजमध्ये दाखवण्यात येईल. ही सिंगल कॅमेरा सीरिज असेल. 'ग्रेज अॅनाटॉमी', 'क्वांटिको' यांसारख्या मालिकांना सुपरहिट करणारी टीम या आगामी प्रोजेक्टसाठी काम करते आहे. (ऑगस्ट २०१७ची बातमी).
पुरस्कार
वर्ष | पुरस्कार | चित्रपट | निकाल |
---|---|---|---|
१९८९ | सर्वोत्तम अभिनेत्री | तेजाब | नामांकीत |
१९९० | प्रेमप्रतिज्ञा | नामांकीत | |
१९९१ | दिल | विजयी | |
१९९२ | साजन | नामांकीत | |
१९९३ | बेटा | विजयी | |
१९९४ | खलनायक | नामांकीत | |
१९९५ | अंजाम | नामांकीत | |
हम आपके है कौन...! | विजयी | ||
१९९६ | राजा | नामांकीत | |
याराना | नामांकीत | ||
१९९८ | दिल तो पागल है | विजयी | |
२००१ | पुकार | नामांकीत | |
२००८ | आजा नच ले | नामांकीत | |
२०१५ | डेढ इश्किया | नामांकीत | |
२००२ | सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री | लज्जा | नामांकीत |
२००३ | देवदास | विजयी | |
२०११ | फिल्मफेअर विशेष पुरस्कार | Overall contribution | विजयी |
मिळालेले स्टार स्क्रीन पुरस्कार
- १९९४: स्टार स्क्रीन पुरस्कार - उत्कृष्ट अभिनेत्री - चित्रपट हम आपके हैं कौन
- १९९५: स्टार स्क्रीन पुरस्कार - उत्कृष्ट अभिनेत्री - चित्रपट राजा
- १९९७: स्टार स्क्रीन पुरस्कार - उत्कृष्ट अभिनेत्री - चित्रपट मृत्य़ुदंड
- २००२: देवदास मधील भूमिकेसाठी स्टार स्क्रीनकडून उत्कृष्ट सहकलाकारासाठीचे पारितोषिक
मिळालेली नामांकने
- २०००: स्टार स्क्रीन पुरस्कार - उत्कृष्ट अभिनेत्री - चित्रपट पुकार
मिळालेले झी सिने पुरस्कार
- १९९८: झी सिने पुरस्कार - उत्कृष्ट अभिनेत्री - चित्रपट दिल तोपागल हैi
- २००२: झी सिने उत्कृष्ट स्त्री सहकलाकार पुरस्कार - चित्रपट लज्जा
मिळालेली नामांकने
- २०००: झी सिने पुरस्कार - उत्कृष्ट अभिनेत्री - चित्रपट पुकार
- २००३: झी सिने पुरस्कार - उत्कृष्ट अभिनेत्री - चित्रपट देवदास'
आयफा पुरस्कार
नामांकने
- २००१: आयफा पुरस्कार - उत्कृष्ट अभिनेत्री - चित्रपट पुकार
- २००३: आयफा पुरस्कार - उत्कृष्ट अभिनेत्री - चित्रपट देवदास
स्टार डस्ट पुरस्कार
नामांकन
- २००८: स्टारडस्ट स्टार ऑफ दी इयर - चित्रपट आजा नचले
सन्मान आणि पुरस्कार
- १९९७: आंध्र प्रदेश सरकारने कलाभिनेत्री" पुरस्कार दिला.[२]
- २००१: राष्ट्रीय नागरीक पुरस्कार
- २००१: फोर्ब्सने माधुरी दीक्षितला हिंदी चित्रपटसृष्टीतील शिखरावरील ५ ताकदवर लोकांत स्थान दिले[३]
- २००८: भारतीय चित्रपट उत्सव, लॉस एंजल्स येथे सत्कार[४]
- २०११: पर्ल्स वेव्ह पुरस्कार - "वेव्ह सिल्व्हर क्वीन सन्मान"
- २०११: HindiFilmNews.Com ने घेतलेल्या मतदानात माधुरी दीक्षित हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात आकर्षक नटी ठरली[५]
फिल्मोग्राफी
संदर्भ
- ^ (इंग्रजी भाषेत) http://www.hindustantimes.com/Finally-Madhuri-Dixit-is-back-in-India/Article1-754969.aspx. १० ऑक्टोबर २०११ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ (इंग्रजी भाषेत) http://www.expressindia.com/news/ie/daily/19971124/32850403.html. ४ जानेवारी २००९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ (इंग्रजी भाषेत) http://www.forbes.com/2001/03/09/0309bollywood.html. ३ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.indianfilmfestival.org/movies08/tribute2008-madhuridixit.html. ४ जानेवारी २००९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)[मृत दुवा] - ^ (इंग्रजी भाषेत) http://hindifilmnews.com/polls-2/poll-6-the-most-desirable-bollywood-actress/. Missing or empty
|title=
(सहाय्य)
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील माधुरी दीक्षित चे पान (इंग्लिश मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |