Jump to content

सदाशिव अमरापूरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सदाशिव अमरापूरकर
जन्म सदाशिव अमरापूरकर
११ मे १९५० (1950-05-11)
अहमदनगर, महाराष्ट्र, भारत
मृत्यू ३ नोव्हेंबर, २०१४ (वय ६४)
मुंबई
इतर नावे गणेशकुमार नरवाडे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
पत्नी सुनंदा अमरापूरकर
अपत्ये तीन मुली

गणेशकुमार नरवाडे उर्फ सदाशिव अमरापूरकर ( ११ मे १९५०, अमरापूर - ३ नोव्हेंबर २०१४, मुंबई) हे एक मराठी नाट्य अभिनेते तसेच हिंदी, मराठी, ओरिया, हरियाणी, भोजपुरी, बंगाली व गुजराती भाषांतील चित्रपटांत काम करणारे अभिनेते होते.

शेवगाव तालुक्यातील अमरापूर हे त्यांचे मूळ गाव. त्याचे वडील शेती करत. शेत नांगरणे, बैलांना चारा घालणे, मोट चालवणे, गाईचे दूध काढणे, जत्रेत बैल पळविणे या सगळ्या गोष्टी अमरापूरकर यांनी बालपणी केल्या होत्या. त्यांच्याकडे १०० शेळ्या होत्या. रोज त्यांना चरायला घेऊन जाण्याचे काम अमरापूरकर करीत. आपल्या आळंदीला राहणाऱ्या आत्याबरोबर त्यांनी तीन चार वेळेला आळंदी ते पंढरपूर अशी पायी यात्रा केली होती.

त्यांचे मूळचे नाव गणेशकुमार नरवाडे. नाटकांतील भूमिकांसाठी त्यानी सदाशव अमरापूरकर हे नाव घेतले. कॉलेजमध्ये असताना त्यांनी 'पेटलेली अमावास्या' या एकांकितेत नायकाची आणि त्यांची पहिली-वहिली भूमिका केली होती.

सामाजिक जाणिवेतून सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या संस्था-संघटानांशीही अमरापूरकरांचा संबंध होता. सामाजिक कृतज्ञता निधीसाठी 'लग्नाची बेडी' या नाटकाचे गावोगावी प्रयोग झाले होते. त्या नाटकात सदाशिव अमरापूरकर भूमिका करत असत. मेधा पाटकरांच्या नर्मदा आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. वर्ध्याच्या गांधी आश्रमात ते नेहमी जात. अभय बंग, बाबा आढाव, नरेंद्र दाभोलकर आदी सामाजिक कार्यकर्ते यांच्याशीही अमरापूरकरांचे जिव्हाळ्याचे नाते होते.

अमरापूरकरांनी श्याम बेनेगल यांच्या 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या दूरचित्रवाणी मालिकेत महात्मा फुले यांची भूमिका केली होती.

मार्च २०१४ मध्ये होळीच्या उत्सवात पाण्याची नासाडी रोखण्याचा प्रयत्न करीत असताना अमरापूरकर यांना सहा व्यक्तींनी मारहाण केली होती.

नाटके

[संपादन]
 • काही स्वप्नं विकायचीत
 • छिन्न
 • ज्याचा त्याचा विठोबा
 • यात्रिक
 • लग्नाची बेडी
 • हॅन्ड्स अप
 • हवा अंधारा कवडसा

लिहिलेली/दिग्दर्शित नाटके

[संपादन]
 • कन्यादान (दिग्दर्शन)
 • किमयागार (नाट्यलेखन. हे नाटक हेलन केलर आणि तिची शिक्षिका यांच्या जीवनावर आहे.)

चित्रपट

[संपादन]
 • अर्धसत्य (मराठी)
 • आई पाहिजे (मराठी)
 • आखरी रास्ता
 • आँखे
 • आन्टी नंबर १
 • इश्क
 • एलान-ए-जंग
 • कुली नंबर १
 • गुप्त
 • छोटे सरकार
 • जन्मठेप (मराठी)
 • झेडपी (मराठी)
 • नाकाबंदी
 • पैंजण (मराठी)
 • बाॅम्बे टाॅकीज
 • २२ जून १८९७ (मराठी)
 • वास्तुपुरुष (मराठी)
 • सडक
 • हुकुमत
 • होऊ दे जरासा उशीर (मराठी)

मालिका

[संपादन]
 • राज से स्वराज तक
 • डिस्कव्हरी आॅफ इंडिया

अन्य गोष्टी

[संपादन]

सदाशिव अमरापुरकरांना शिसपेन्सिलीने चित्रे काढायचा छंद होता. एका जपानी शेती शास्त्रज्ञाचे पुस्तक वाचून त्यांनी शेती करायचे ठरविले. त्यासाठी अमरापूरकरांनी सिंहगडाच्या पायथ्याशी अर्धा एकर शेतजमीन विकत घेतली होती. तेथे त्यांनी शेताच्या कडेला अनेक झाडे लावली. तीन वर्षे पीक जळून गेल्यावरही प्रयत्न न सोडता ते भुईमुगाची नैसर्गिक शेती करत राहिले आणि चौथ्या वर्षी त्यांनी भरघोस उत्पन्न मिळविले.

पुरस्कार

[संपादन]

सडक या हिंदी चित्रपटात केलेल्या महाराणी या तृतीयपंथी खलनायकाच्या भूमिकेसाठी फिल्मफेर पुरस्कार.[१]

महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History of Maharashtra.....

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
 1. ^ सारिका शर्मा. "रोल्स रिव्हर्स्ड: 'व्हिलन' सदाशिव अमरापूरकर बीटन अप" (इंग्लिश भाषेत). २०१४-१०-२६ रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काइव्हदिनांक= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काइव्हदुवा= ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)